मानवी आयुष्यातील कष्ट कमी व्हावेत म्हणून मानवाने आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर मशीन्स व विविध यंत्रे तयार केलीत... निर्माण केलेल्या मशीन्स व यंत्रे इतक्या 'बुद्धिमान' होऊ लागल्यात की आता 'कृत्रिम' बुद्धिमत्तेमुळे मानवांना त्या सहज हाताळू शकतात व आवश्यकतेनुसार सूचना पण देऊ शकतात.. एक वेळ अशी येईल की सर्व माणसे अगदी 'तंतोतंत' मशीन व यंत्राप्रमाणे काम करायला लागतील... व आपणच निर्माण केलेले मशीन्स व यंत्रे आपल्यालाच मानवी संवेदना, प्रेम, काळजी, आपुलकी, स्नेह, जिव्हाळा, मैत्री, विश्वास, सुखदुःखाच्या अनुभूती या सर्वांचं 'महत्त्व' पटवून सांगतील... कित्येक दशानंतर माणसांनी यंत्रे तयार केलीत...की यंत्रांनी माणसं हा मात्र वादविवादाचा मोठा विषय ठरेल... हे जर खरंच थांबवण्याची माणसाला इच्छा असेल ..तर त्याने आपल्या आजूबाजूच्या माणसांना खरंच आपण 'यंत्रा' सारखं वापरतोय का?.. याचा विचार करायला हरकत नाही...😊😊 have a wonderful day to all of you.. ©️ डॉ. जितेंद्र गांधी मानसिक आरोग्य कौन्सिलर मनोसंतुलन उपक्रम
दरवर्षीप्रमाणे दहावी व बारावी परीक्षेचे निकाल जाहीर झालेले असतील... शाळा, महाविद्यालये, खाजगी शिकवणी वर्ग व पालक यशस्वी विद्यार्थ्यांच्या कौतुकात दंग असतील... त्याचबरोबर नापास, अयशस्वी व कमी मार्क्स मिळवलेल्या विद्यार्थी व त्यांच्या पालकांचे जगच पूर्णपणे बदललेले असेल...आयुष्यात सर्व काही संपलं अशी मनोभूमिका विद्यार्थी व पालकांच्या मनात उचंबळून येत असेल... पण शांत डोक्याने विचार केल्यास असे लक्षात येईल की गेल्या दशकात शिक्षणातील अमुलाग्र बदलामुळे विद्यार्थ्यांच्या टक्केवारीत भरघोस वाढ झालेली असली तरी गुणवत्तेच्या नावाने आजही बोंबाबोंब आहे.. (बेस्ट ऑफ फाईव्ह व अंतर्गत गुण यांच्यामुळे विद्यार्थ्यांच्या टक्केवारीत मध्ये प्रचंड वाढ झालेली आहे) आजचा यशस्वी विद्यार्थी अधिक टक्केवारी मुळे गुणवत्ता प्राप्त झाला असे ठामपणे सांगता येणार नाही.. एकूणच शिक्षण पद्धतीत दिलेला अभ्यासक्रम कोण किती अचूक पद्धतीने पूर्ण करतो याला अफलातून महत्त्व आले असतांना... विद्यार्थ्यांनी जीवन कौशल्य (life skills), नवनिर्मिती (innovations), संशोधनवृत्ती (research aptitude), मूल्य संव...