Skip to main content

Posts

Showing posts from April, 2021

आजूबाजूच्या माणसांना खरंच आपण 'यंत्रा' सारखं वापरतोय का?..

 मानवी आयुष्यातील कष्ट कमी व्हावेत म्हणून मानवाने आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर मशीन्स व विविध यंत्रे तयार केलीत... निर्माण केलेल्या मशीन्स व यंत्रे इतक्या 'बुद्धिमान' होऊ लागल्यात की आता 'कृत्रिम' बुद्धिमत्तेमुळे मानवांना त्या सहज हाताळू शकतात व आवश्यकतेनुसार सूचना पण देऊ शकतात.. एक वेळ अशी येईल की सर्व माणसे अगदी 'तंतोतंत' मशीन व यंत्राप्रमाणे काम करायला लागतील... व आपणच निर्माण केलेले मशीन्स व यंत्रे आपल्यालाच मानवी संवेदना, प्रेम, काळजी, आपुलकी, स्नेह, जिव्हाळा, मैत्री, विश्वास, सुखदुःखाच्या अनुभूती या सर्वांचं 'महत्त्व' पटवून सांगतील... कित्येक दशानंतर माणसांनी यंत्रे तयार केलीत...की यंत्रांनी माणसं हा मात्र वादविवादाचा मोठा विषय ठरेल... हे जर खरंच थांबवण्याची माणसाला इच्छा असेल ..तर त्याने आपल्या आजूबाजूच्या माणसांना खरंच आपण 'यंत्रा' सारखं वापरतोय का?.. याचा विचार करायला हरकत नाही...😊😊 have a wonderful day  to all of you.. ©️ डॉ. जितेंद्र गांधी मानसिक आरोग्य कौन्सिलर मनोसंतुलन उपक्रम

पेनकिलर आणि मानसशास्त्र...

  आपल्यापैकी बरेच जण पेनकिलर (वेदना शामक) औषधे नित्यनियमाने घेत असतील. सतत काहीतरी दुखत राहणे मुख्यतः डोके (अर्धशिशी), पाठ, पाय, पोट  व अंगदुखी अशा दुखण्यावर आपण सर्वजण सहज उपलब्ध असलेले पेनकिलर  औषधे घेत राहतो. अल्पावधीसाठी ते गरजेचं असलं तरी मानसशास्त्राच्या संशोधनानुसार पेनकिलर आणि आपलं मानसशास्त्र यांचा खूप जवळचा संबंध मानण्यात आले आहे. मानसशास्त्र अनुसार आपल्या अंतर्गत मनाच दुखणं,निराशा, राग, आक्रोश  वा तान-तणाव या सर्व मानसशास्त्रीय घटकांचे व्यवस्थितपणे निचरा होत नसेल तर त्याचेच परिवर्तन शारीरिक दुखण्यात होत असतं. आपलं स्वतःचं शारीरिक दुखण आपल्या मानसिक आरोग्याचा आरसाच असतो.  32 वर्षीय विजय (नाव बदललेले आहे) समुपदेशनासाठी जेव्हा आला तेव्हा तो सतत आपल्या डोकेदुखी साठी सतत पेनकिलरचा वापर करीत होता. समुपदेशन अंतर्गत जेव्हा विजयच्या   मानसशास्त्रीय अंतरंग जाणून घेण्यात आले तेव्हा व्यक्तिगत व व्यावसायिक पातळीवर आलेल्या  नैराश्यातून विजयचे मानसशास्त्रीय खच्चीकरण झाल्याचे निष्पन्न झाले. समुपदेशन प्रक्रिये अंतर्गत विजयला त्याचे पेन (व...