मानवी आयुष्यातील कष्ट कमी व्हावेत म्हणून मानवाने आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर मशीन्स व विविध यंत्रे तयार केलीत... निर्माण केलेल्या मशीन्स व यंत्रे इतक्या 'बुद्धिमान' होऊ लागल्यात की आता 'कृत्रिम' बुद्धिमत्तेमुळे मानवांना त्या सहज हाताळू शकतात व आवश्यकतेनुसार सूचना पण देऊ शकतात.. एक वेळ अशी येईल की सर्व माणसे अगदी 'तंतोतंत' मशीन व यंत्राप्रमाणे काम करायला लागतील... व आपणच निर्माण केलेले मशीन्स व यंत्रे आपल्यालाच मानवी संवेदना, प्रेम, काळजी, आपुलकी, स्नेह, जिव्हाळा, मैत्री, विश्वास, सुखदुःखाच्या अनुभूती या सर्वांचं 'महत्त्व' पटवून सांगतील... कित्येक दशानंतर माणसांनी यंत्रे तयार केलीत...की यंत्रांनी माणसं हा मात्र वादविवादाचा मोठा विषय ठरेल... हे जर खरंच थांबवण्याची माणसाला इच्छा असेल ..तर त्याने आपल्या आजूबाजूच्या माणसांना खरंच आपण 'यंत्रा' सारखं वापरतोय का?.. याचा विचार करायला हरकत नाही...😊😊 have a wonderful day to all of you.. ©️ डॉ. जितेंद्र गांधी मानसिक आरोग्य कौन्सिलर मनोसंतुलन उपक्रम
गेल्या कित्येक दशकापासून वैद्यकीय शास्त्राला औषध- निर्मात्या संशोधकांना कायमस्वरूपी चकवा देण्यात स्किझोफ्रेनिया (schizophrenia) या मानसिक आजाराला यश मिळालेले आहे... आजही मनोविकार तज्ञामध्ये मोठ्या प्रमाणात स्किझोफ्रेनिया बाबत हाती आलेल्या तथ्याबाबत सहमती बरोबरच मतभिन्नता पण तेवढ्याच प्रमाणात कायम आहे... मानसिक आजाराची उच्चतम पातळी गाठणाऱ्या स्किझोफ्रेनिया या आजार होण्याच्या कारणा बाबत ठोस असे काही हातात लागलेले नाही... यावरूनच या आजाराची गंभीरता लक्षात येते... माणसाच्या भावनांमध्ये (emotions), वर्तणूकमध्ये (behaviour), विचारांमध्ये (thought process) व एकंदरीतच संपूर्ण मनो-विश्वामध्ये प्रचंड उलथापालथ करून स्किझोफ्रेनिया थांबत नाही तर असलेल्या लक्षणांमध्ये नेहमीच उलटपालट/ बदल करत राहून मनोविकारतज्ञ, कुटुंबाला व स्वतः रुग्णाला सुद्धा दिशाहीन करण्याची क्षमता या आजारामध्ये आहे... आजच्या घडीला स्किझोफ्रेनियाच्या उपचाराकरिता परिणामकारक औषधे उपलब्ध असली तरी रुग्णांच्या लक्षणांमध्ये घट करण्याच्या क्षमते पर्यंतच ती उपयोगाची आहे... स्किझोफ्रेनियाला मोठ्या प्रमाणात अटकाव घालू शकणारे औषधो...