मानवी आयुष्यातील कष्ट कमी व्हावेत म्हणून मानवाने आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर मशीन्स व विविध यंत्रे तयार केलीत... निर्माण केलेल्या मशीन्स व यंत्रे इतक्या 'बुद्धिमान' होऊ लागल्यात की आता 'कृत्रिम' बुद्धिमत्तेमुळे मानवांना त्या सहज हाताळू शकतात व आवश्यकतेनुसार सूचना पण देऊ शकतात.. एक वेळ अशी येईल की सर्व माणसे अगदी 'तंतोतंत' मशीन व यंत्राप्रमाणे काम करायला लागतील... व आपणच निर्माण केलेले मशीन्स व यंत्रे आपल्यालाच मानवी संवेदना, प्रेम, काळजी, आपुलकी, स्नेह, जिव्हाळा, मैत्री, विश्वास, सुखदुःखाच्या अनुभूती या सर्वांचं 'महत्त्व' पटवून सांगतील... कित्येक दशानंतर माणसांनी यंत्रे तयार केलीत...की यंत्रांनी माणसं हा मात्र वादविवादाचा मोठा विषय ठरेल... हे जर खरंच थांबवण्याची माणसाला इच्छा असेल ..तर त्याने आपल्या आजूबाजूच्या माणसांना खरंच आपण 'यंत्रा' सारखं वापरतोय का?.. याचा विचार करायला हरकत नाही...😊😊 have a wonderful day to all of you.. ©️ डॉ. जितेंद्र गांधी मानसिक आरोग्य कौन्सिलर मनोसंतुलन उपक्रम
गेल्या कित्येक दशकापासून वैद्यकीय शास्त्राला औषध- निर्मात्या संशोधकांना कायमस्वरूपी चकवा देण्यात स्किझोफ्रेनिया (schizophrenia) या मानसिक आजाराला यश मिळालेले आहे... आजही मनोविकार तज्ञामध्ये मोठ्या प्रमाणात स्किझोफ्रेनिया बाबत हाती आलेल्या तथ्याबाबत सहमती बरोबरच मतभिन्नता पण तेवढ्याच प्रमाणात कायम आहे... मानसिक आजाराची उच्चतम पातळी गाठणाऱ्या स्किझोफ्रेनिया या आजार होण्याच्या कारणा बाबत ठोस असे काही हातात लागलेले नाही... यावरूनच या आजाराची गंभीरता लक्षात येते...
माणसाच्या भावनांमध्ये (emotions), वर्तणूकमध्ये (behaviour), विचारांमध्ये (thought process) व एकंदरीतच संपूर्ण मनो-विश्वामध्ये प्रचंड उलथापालथ करून स्किझोफ्रेनिया थांबत नाही तर असलेल्या लक्षणांमध्ये नेहमीच उलटपालट/ बदल करत राहून मनोविकारतज्ञ, कुटुंबाला व स्वतः रुग्णाला सुद्धा दिशाहीन करण्याची क्षमता या आजारामध्ये आहे... आजच्या घडीला स्किझोफ्रेनियाच्या उपचाराकरिता परिणामकारक औषधे उपलब्ध असली तरी रुग्णांच्या लक्षणांमध्ये घट करण्याच्या क्षमते पर्यंतच ती उपयोगाची आहे... स्किझोफ्रेनियाला मोठ्या प्रमाणात अटकाव घालू शकणारे औषधोपचार आजही उपलब्ध नाही...
स्किझोफ्रेनियाच्या रुग्णांना औषधोपचार बरोबर पुनर्वसन उपचारपद्धतीची (rehabilitation therapy) मोठ्या प्रमाणात गरज असते..( उदा.. स्नायूंच्या दुखापतीनंतर फिजिओथेरपीची जितकी गरज असते तितकीच)...वर्षानुवर्ष आजारपणामुळे व्यक्ती आपले सामाजिक कौशल्य (social skills) गमावून बसतो व एकूणच स्थितीमध्ये अधिकच घसरण सुरू होते.. आजही जवळपास 90 ते 95 % स्किझोफ्रेनिया रुग्णाला पुनर्वसनाच्या सुविधा तसेच कुटुंबाला समुपदेशन (counselling ) व मनोरुग्ण सोबत राहण्याचे प्रशिक्षण दिल्या जात नाही...
येणाऱ्या काळामध्ये स्किझोफ्रेनिया रुग्णांची संख्या वाढणार आहे हे स्पष्ट असताना सुद्धा उपचारांमध्ये सर्वसमावेशकता (comprehensive approach) येत नाही हे या आजाराचे अजून एक दुर्दैव आहे... या आजारातून बाहेर पडण्याचा एकच मार्ग म्हणजे लेटस फाईट टुगेदर विथ स्किझोफ्रेनिया... बिफोर इट पझल्स ऑल ऑफ अस...
©️ डॉ. जितेंद्र गांधी
मानसिक आरोग्य समुपदेशन व पुनर्वसन विषयतज्ञ
9420461580
Comments
Post a Comment