माणसाच्या मानसशास्त्रीय प्रमुख लक्षणांमध्ये व्यक्तीची भावनाप्रधानता (emotional being) हे सर्वात महत्त्वाचे लक्षण मानले गेले पाहिजे. माणसाच्या जगण्याचे व अस्तित्वाचे महत्त्वाचे घटक त्या व्यक्तीच्या भावनाकोशात दडून असतात.
मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून एकूणच व्यक्तिमत्वाच्या विश्लेषणमध्ये त्या व्यक्तीच्या इमोशनल घटकांना दुर्लक्षित करून चालणार नाही. भीती (fear) राग (anger) दुःख (sadness) आनंद(happiness) कीळसपणा (disgust) आश्चर्य (surprise) व विश्वास (trust) अशा विविध भावनांच्या मिश्रणातून आपण सर्वजण आपले भावविश्वाचे जाळे विणत असतो.
आपले इमोशन्स आपले आयुष्य मोठ्या प्रमाणात "ड्राईव्ह" करतात की काय? हेही आपण अनुभवत असतो. भावनाच्या या नैसर्गिक व वातावरण निर्मित प्रक्रियेत त्याचे योग्य व्यवस्थापनामुळे आपण अधिक आनंदी , निखळ व निरोगी आयुष्य जगू शकतो असे संशोधनाअंती मान्य झाल्यामुळे जगभरात " इमोशनल मॅनेजमेंट", "इमोशनल इंटेलिजन्स", "इमोशनल डायटिंग" असे अनेक मानसशास्त्रीय संकल्पनांनी जन्म घेतला व त्याचा जोमाने प्रचार व प्रसार पण मोठ्या प्रमाणात करण्यात आला.
बऱ्याचअंशी व्यक्तीचे, कुटुंबाचे वा गटाचे सुद्धा "इमोशनल पॅटर्न" चुकीचे वा त्याचे योग्य व्यवस्थापन नसल्यामुळे त्याना बऱ्याच मानसिक, शारीरिक, सामाजिक, आर्थिक व कौटुंबिक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. आणि म्हणूनच "इमोशनल मॅनेजमेंट" हे खूप महत्त्वाचे मानसशास्त्रीय प्रशिक्षण घेणे आवश्यक ठरेल. त्याचीच पहिली पायरी म्हणजे "इमोशनल डायटिंग" होय . यामध्ये साध्या, सरळ व सोप्या मानसशास्त्रीय बाबींचा समावेश करून त्याची अंमलबजावणी करण्यास सांगण्यात येते व नंतर व्यक्तीला मिळालेले अनुभवावर चर्चा करता येते. उदा.
(१)React vs responce- कोणत्याही गोष्टीसाठी एकदम रिएक्शन देण्याऐवजी रिस्पॉन्स करायला शिकवले जाते.
(२)Ask for clarification- कोणत्याही ठाम मतावर येण्याअगोदर त्या बाबतीत सर्व बाबींचे विश्लेषण करून घेण्याची मानसशास्त्रीय सवय लावली जाते.
(३)Forget past experiences-आजच्या निर्णयाला मागील अनुभवांची जोड असावी पण तेच निर्णायक असू नये. एक ना अनेक बाबींचा प्रशिक्षणामध्ये समावेश केला जातो अशा अनेक मानसशास्त्रीय कसोट्यांवर व व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वानुसार या प्रशिक्षणाची निर्मिती केली जाते. एकूणच या प्रशिक्षणादरम्यान व इमोशन्सच्या या तारेवरच्या कसरती मध्ये "माझ्या इमोशन्स चा वापर मी करायला पाहिजे की... की माझ्या इमोशन्स नी माझा वापर करायला पाहिजे" हे ठरवणे व्यक्तीला क्रमप्राप्त ठरते.....
आजच्या परिस्थितीमध्ये आपल्या जीवनात अशा प्रकारच्या "इमोशनल मॅनेजमेंट" च्या प्रशिक्षणाची गरज वाटते का? कृपया प्रतिक्रिया कळवावी.....
😊😊 have a wonderful day to all of you....
©️ *डॉ. जितेंद्र गांधी*
मानसिक आरोग्य कौन्सेलर
Mob-9420461580
सकारात्मक मानसिक आरोग्य माहितीसाठी *"मनोसंतुलन"* उपक्रम जॉईन करू शकता...
https://chat.whatsapp.com/ByyMuwEerNWKZ31fBgaD59
Comments
Post a Comment