समुद्रकिनारी वाळूचे घर बनवताना ते येणाऱ्या पुढच्या लाटेमध्ये वाहून जाईल याची आपल्याला 'पूर्व' कल्पना असते....तरी आपण अतिशय मन लावून आनंदाने समुद्रकिनारी वाळूचं घर बनवतो..
ठरल्याप्रमाणे पुढच्या काही लाटांमध्ये ते घर वाहून जात..
बऱ्याच एकाग्रतेने व जिद्दीने बनवलेलं ते वाळूचे घर वाहून जाताना त्रास पण होतो.. आणि आनंद सुद्धा...
आपल्या 'वैयक्तिक' आयुष्यातही आपण 'निर्माण' केलेल्या आपल्या कल्पनांना, भावनांना, कृतींना, विचारांना व बऱ्याच संकल्पनांना वेळोवेळी तयार करणे हे 'नैसर्गिक' असलं तरी... काळाच्या व परिस्थितीच्या ओघामध्ये वाहून जाताना आपल्याला त्रास कमी व आनंद अधिक व्हायला हवा..
कारण समुद्रकिनारी जसे वाळूचे घर कधीही टिकू शकत नाही... तसेच आपण निर्माण केलेल्या व गरज नसलेल्या संकल्पना, कृती, विचार व वेगवेगळ्या कल्पना यांना विसर्जित करून देण्यामध्येच जीवनाचं 'नैसर्गिक' तत्व समाविष्ट आहे... 😊 have a wonderful day to all of you....
©️ डॉ. जितेंद्र गांधी
मानसिक आरोग्य कौन्सेलर
Mob-9420461580
सकारात्मक मानसिक आरोग्य माहितीसाठी *"मनोसंतुलन"* व्हाट्सअप उपक्रम जॉईन करू शकता...
https://chat.whatsapp.com/ByyMuwEerNWKZ31fBgaD59
Comments
Post a Comment