आपल्याकडे जे काही आज उपलब्ध आहे त्याची मुळातच आपल्याला 'किंमत' नाही...
आई-वडील असताना त्यांच्याकडे आपण 'दुर्लक्ष' करतो व ती गेल्यानंतर मात्र आपण ओक्षाबोक्षी रडतो..
आपल्या जोडीदारांमध्ये आपला 'रस' दिवसेंदिवस कमी होत जातो व दुसऱ्या जोडीदारांमध्ये रमबाण होण्याची 'स्वप्न' आपण बघत राहतो...
आपल्या मुलांपेक्षा इतरांची मुलं आपल्याला 'अधिक' सरस, हुशार व तरबेज भासतात...
आपली आर्थिक स्थिती इतरांपेक्षा खूपच 'कमकुवत' आहे असं नेहमीच आपल्याला वाटत राहतं..
आज आपण 'सुरक्षित' आहोत या भावनेपेक्षा..उद्याचा भविष्यकाळ खूपच 'चिंतायुक्त' आहे असा आपल्याला सतत वाटत राहतं..
आज शरीराची 'काळजी' न घेता अचानक हॉस्पिटलमध्ये जावं लागेल यासाठी इन्शुरन्स पॉलिसी किंवा पैसे जमा करणे आपण 'महत्त्वाचे' समजतो...
आज उपलब्ध असलेल्या नातेसंबंधांमध्ये 'कमतरता' किंवा उणिवा 'शोधत' राहतो व नाते संपुष्टात आल्यानंतर किमान नाते तरी 'जिवंत' असायला पाहिजे होतं! असं मनात हजार वेळा 'विचार' करतो...
आपल्या मनाला प्रत्येक ठिकाणी 'भटकून' ठेवतो, वेगवेगळ्या व्यसन, विचाराने 'गोंधळून' जातो.. अति विचाराने त्रस्त होतो, लैंगिक विषय वासनेमध्ये गुरफटवून घेतो, मनाला वाटेल तसं वागतो, मनाची अशांती स्वीकारतो... हे सर्व झाल्यानंतर मात्र मनाची शांतता व एकाग्रता शोधण्याचा 'अभ्यास' करतो..
आजचा दिवस 'आनंदाने' घालवण्यापेक्षा उद्याचा दिवस अधिक आनंदी होण्यासाठी विनाकारण 'धडपडत' राहतो...
या सर्व बाबींचा सारांश म्हणजे आपलं जगणं ज्या गोष्टीने 'परिपूर्ण' असतं त्या सर्व गोष्टी आपल्याला 'अपूर्ण' वाटतात... आपण आपल्याला न मिळालेल्या 'अपूर्ण' गोष्टीमागे पळत राहतो व आपलं परिपूर्ण असलेला आयुष्य सुद्धा 'गमावतो'...😊 😊 have a wonderful day to all of you....
©️ डॉ. जितेंद्र गांधी
मानसिक आरोग्य कौन्सेलर
Mob-9420461580
सकारात्मक मानसिक आरोग्य माहितीसाठी *"मनोसंतुलन"* व्हाट्सअप उपक्रम जॉईन करू शकता...
https://chat.whatsapp.com/ByyMuwEerNWKZ31fBgaD59
Comments
Post a Comment