Skip to main content

आजूबाजूच्या माणसांना खरंच आपण 'यंत्रा' सारखं वापरतोय का?..

 मानवी आयुष्यातील कष्ट कमी व्हावेत म्हणून मानवाने आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर मशीन्स व विविध यंत्रे तयार केलीत... निर्माण केलेल्या मशीन्स व यंत्रे इतक्या 'बुद्धिमान' होऊ लागल्यात की आता 'कृत्रिम' बुद्धिमत्तेमुळे मानवांना त्या सहज हाताळू शकतात व आवश्यकतेनुसार सूचना पण देऊ शकतात.. एक वेळ अशी येईल की सर्व माणसे अगदी 'तंतोतंत' मशीन व यंत्राप्रमाणे काम करायला लागतील... व आपणच निर्माण केलेले मशीन्स व यंत्रे आपल्यालाच मानवी संवेदना, प्रेम, काळजी, आपुलकी, स्नेह, जिव्हाळा, मैत्री, विश्वास, सुखदुःखाच्या अनुभूती या सर्वांचं 'महत्त्व' पटवून सांगतील... कित्येक दशानंतर माणसांनी यंत्रे तयार केलीत...की यंत्रांनी माणसं हा मात्र वादविवादाचा मोठा विषय ठरेल... हे जर खरंच थांबवण्याची माणसाला इच्छा असेल ..तर त्याने आपल्या आजूबाजूच्या माणसांना खरंच आपण 'यंत्रा' सारखं वापरतोय का?.. याचा विचार करायला हरकत नाही...😊😊 have a wonderful day  to all of you.. ©️ डॉ. जितेंद्र गांधी मानसिक आरोग्य कौन्सिलर मनोसंतुलन उपक्रम

मनाचा डस्टबिन...

 आपल्या घरामध्ये जसा डस्टबिन (कचरा डबा) ठेवलेला असतो.. अगदी त्याचप्रमाणे आपल्या मनामध्ये सुद्धा एक 'डस्टबिन' तयार करणे अत्यावश्यक आहे...

आपल्या मनामध्ये येणारे निगेटिव्ह, निरर्थक, भीती, चिंता, दडपण, राग निर्माण करणारे, भूतकाळातील घटना, पश्चाताप, आपल्या नातेसंबंधातील ताण तणाव अशा अनेक मनाला 'आजारी' करणाऱ्या गोष्टी त्यामध्ये थोड्या थोड्या प्रमाणात टाकत राहिल्या हव्यात.. 

आणि आपल्या मनाचा डस्टबिन 'पूर्णपणे' भरला की तो स्वच्छ व रिकामा सुद्धा करता आला पाहिजे...

पूर्णपणे भरलेला, अतिशय दुर्गंधीयुक्त मनाचा डस्टबिन आम्ही कौन्सिलर म्हणून 'सहज' स्वीकारतो..त्याला स्वच्छ करण्याच्या वेगवेगळ्या टेक्निक्स सुद्धा शिकवतो.. 'अट' एकच आहे की त्या व्यक्तीला आपल्या मनाचा डस्टबिन 'खरच' स्वच्छ करायचा असायला हवा.. 

😊 have a wonderful day to all of you....


©️ डॉ. जितेंद्र गांधी

मानसिक आरोग्य कौन्सेलर

Mob-9420461580


सकारात्मक मानसिक आरोग्य   माहितीसाठी *"मनोसंतुलन"* व्हाट्सअप उपक्रम जॉईन करू शकता...

https://chat.whatsapp.com/ByyMuwEerNWKZ31fBgaD59

Comments