Skip to main content

Posts

Showing posts from April, 2023

आजूबाजूच्या माणसांना खरंच आपण 'यंत्रा' सारखं वापरतोय का?..

 मानवी आयुष्यातील कष्ट कमी व्हावेत म्हणून मानवाने आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर मशीन्स व विविध यंत्रे तयार केलीत... निर्माण केलेल्या मशीन्स व यंत्रे इतक्या 'बुद्धिमान' होऊ लागल्यात की आता 'कृत्रिम' बुद्धिमत्तेमुळे मानवांना त्या सहज हाताळू शकतात व आवश्यकतेनुसार सूचना पण देऊ शकतात.. एक वेळ अशी येईल की सर्व माणसे अगदी 'तंतोतंत' मशीन व यंत्राप्रमाणे काम करायला लागतील... व आपणच निर्माण केलेले मशीन्स व यंत्रे आपल्यालाच मानवी संवेदना, प्रेम, काळजी, आपुलकी, स्नेह, जिव्हाळा, मैत्री, विश्वास, सुखदुःखाच्या अनुभूती या सर्वांचं 'महत्त्व' पटवून सांगतील... कित्येक दशानंतर माणसांनी यंत्रे तयार केलीत...की यंत्रांनी माणसं हा मात्र वादविवादाचा मोठा विषय ठरेल... हे जर खरंच थांबवण्याची माणसाला इच्छा असेल ..तर त्याने आपल्या आजूबाजूच्या माणसांना खरंच आपण 'यंत्रा' सारखं वापरतोय का?.. याचा विचार करायला हरकत नाही...😊😊 have a wonderful day  to all of you.. ©️ डॉ. जितेंद्र गांधी मानसिक आरोग्य कौन्सिलर मनोसंतुलन उपक्रम

आधुनिक मनाची अवस्था..

 दैनंदिन आयुष्यामध्ये आपण सर्वजण वेगवेगळ्या स्तरांवर ताण तणावाला सामोरे जात असतो... आयुष्यात निर्माण होणारे विविधरंगी प्रश्न सोडवताना, समजून घेताना किंवा समजावून सांगताना आपली सर्वांची दमछाक होत असते.... आणि मग आपलंच सैरावैरा झालेलं मन  व मानसिक स्थिती आपल्याला नको त्या वाटेवर किंवा निर्णयावर घेऊन जाण्याचा प्रयत्न करीत असते... अशावेळी आपणच स्वतःला व आपल्या आजूबाजूला निर्माण झालेल्या परिस्थितीला मानसशास्त्रीय स्तरावर समजून घेण्याची नितांत आवश्यकता असताना आपलंच मन  आपल्यासाठी योग्य व अयोग्य काय ? याची नीट जाणीवही होऊ देत नाही.... आपल्या कुटुंबापासून तर आपल्या दैनंदिन जीवनातील सर्वच स्तरांमधून संपत चाललेला आपला "मानवी सुसंवाद" दिवसेंदिवस हरवत चालला आहे..... हे खरे असताना त्याची आजच्या घडीला नितांत आवश्यकता आहे असे मानायला सुद्धा आज आपण तयार नाहीत.... एक त्रासलेलं, सैरावैरा झालेलं, आजारी पडलेलं, द्विधा मनस्थितीत अडकलेलं, संशयग्रस्त, एकलकोंड, अविश्वासी झालेलं मन जगातील कुठलाच व्यक्ती स्वतः समजू शकत नाही... आणि म्हणूनच गुरफटलेलं मानवी मन पर्यायाने संपूर्ण कुटुंब व आपल्या आजूबाज...