दैनंदिन आयुष्यामध्ये आपण सर्वजण वेगवेगळ्या स्तरांवर ताण तणावाला सामोरे जात असतो... आयुष्यात निर्माण होणारे विविधरंगी प्रश्न सोडवताना, समजून घेताना किंवा समजावून सांगताना आपली सर्वांची दमछाक होत असते.... आणि मग आपलंच सैरावैरा झालेलं मन व मानसिक स्थिती आपल्याला नको त्या वाटेवर किंवा निर्णयावर घेऊन जाण्याचा प्रयत्न करीत असते...
अशावेळी आपणच स्वतःला व आपल्या आजूबाजूला निर्माण झालेल्या परिस्थितीला मानसशास्त्रीय स्तरावर समजून घेण्याची नितांत आवश्यकता असताना आपलंच मन आपल्यासाठी योग्य व अयोग्य काय ? याची नीट जाणीवही होऊ देत नाही....
आपल्या कुटुंबापासून तर आपल्या दैनंदिन जीवनातील सर्वच स्तरांमधून संपत चाललेला आपला "मानवी सुसंवाद" दिवसेंदिवस हरवत चालला आहे..... हे खरे असताना त्याची आजच्या घडीला नितांत आवश्यकता आहे असे मानायला सुद्धा आज आपण तयार नाहीत....
एक त्रासलेलं, सैरावैरा झालेलं, आजारी पडलेलं, द्विधा मनस्थितीत अडकलेलं, संशयग्रस्त, एकलकोंड, अविश्वासी झालेलं मन जगातील कुठलाच व्यक्ती स्वतः समजू शकत नाही... आणि म्हणूनच गुरफटलेलं मानवी मन पर्यायाने संपूर्ण कुटुंब व आपल्या आजूबाजूला सर्वच व्यक्तींना थोड्या अधिक मोठ्या प्रमाणात मानसिक आजारी केल्याशिवाय राहत नाही....
या सर्व परिस्थितीमध्ये सुरुवात करावयाची झाल्यास ती मानवी मनाच्या समुपदेशनातूनच व्हायला हवी... आपलीच हरवलेली व गुंतागुंतीची झालेली मानसिक स्थिती सावरण्यासाठी स्वतः व्यक्तीच व त्याच्या कुटुंबाने पुढाकार घेणे गरजेचे ठरते...
अशा मनाच्या सर्वांगीण बाबतीत जाणून घ्यायचं असेल तर मनमोकळेपणाने मानवी संवाद व्हायला हवा आणि म्हणूनच त्यासाठी सहज व सोपी समुपदेशन होणे गरजेचे ठरते...
आपणच निर्माण केलेला किंवा निर्माण झालेला मानसिक गुंतागुंतीची उकल करून घ्यायची असेल तर आपण सर्वांचे "मनोसंतुलन" उपक्रमामध्ये स्वागत आहे....
©️ डॉ. जितेंद्र गांधी
Mob 9420461580
बारा वर्षीय अनिकेत (नाव बदललेले आहे) समुपदेशनासाठी त्याच्या शाळेमार्फत पाठविण्यात आला होता... शाळेमार्फत पाठविल्यामुळे त्याचे आई-वडील सुद्धा वेळ काढून त्याच्यासोबत उपस्थित होते... साधारणतः वर्गातील हुशार विद्यार्थ्यांपैकी एक असणारा अनिकेत गेल्या दोन वर्षापासून एका वेगळ्याच "जगात" वावरत असल्याचे त्याच्या शिक्षकांना जाणवले... गेल्या दोन वर्षापासून अभ्यासामध्ये टप्प्याटप्प्याने तो मागे पडत होता... शिकवताना वर्गात लक्ष न देणे, वर्ग शिक्षकांचे न ऐकणे, खिडकीतून सतत बाहेर बघत राहणे, इतरांशी हिंसक पद्धतीने वागणे, इतर मुलांना शिवीगाळ करणे,आपल्या ड्रेस व शालेय साहित्याची योग्य निगा न राखणे, चिडचिड करणे, वर्गात झोपणे, इतर विद्यार्थ्यांच्या खोड्या काढणे, दिलेला गृहपाठ पूर्ण न करणे अशा अनेक कारणामुळे शिक्षकांना त्याला मानसशास्त्रीय मदतीची गरज असल्याचे ओळखून समुपदेशनासाठी पाठविले होते... शाळेतील या सर्व बाबतीची पुसटशी कल्पना आई-वडिलांना होती...पण वयानुरूप हे सर्व व्यवस्थित होईल असे त्यांना वाटत होते...अचानक उद्भवलेल्या या प्रसंगामुळे ती दोघेही घाबरलेली व अस्वस्थ होती... समुपदेशन प्रक्...
Comments
Post a Comment