Skip to main content

Posts

Showing posts from April, 2020

आजूबाजूच्या माणसांना खरंच आपण 'यंत्रा' सारखं वापरतोय का?..

 मानवी आयुष्यातील कष्ट कमी व्हावेत म्हणून मानवाने आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर मशीन्स व विविध यंत्रे तयार केलीत... निर्माण केलेल्या मशीन्स व यंत्रे इतक्या 'बुद्धिमान' होऊ लागल्यात की आता 'कृत्रिम' बुद्धिमत्तेमुळे मानवांना त्या सहज हाताळू शकतात व आवश्यकतेनुसार सूचना पण देऊ शकतात.. एक वेळ अशी येईल की सर्व माणसे अगदी 'तंतोतंत' मशीन व यंत्राप्रमाणे काम करायला लागतील... व आपणच निर्माण केलेले मशीन्स व यंत्रे आपल्यालाच मानवी संवेदना, प्रेम, काळजी, आपुलकी, स्नेह, जिव्हाळा, मैत्री, विश्वास, सुखदुःखाच्या अनुभूती या सर्वांचं 'महत्त्व' पटवून सांगतील... कित्येक दशानंतर माणसांनी यंत्रे तयार केलीत...की यंत्रांनी माणसं हा मात्र वादविवादाचा मोठा विषय ठरेल... हे जर खरंच थांबवण्याची माणसाला इच्छा असेल ..तर त्याने आपल्या आजूबाजूच्या माणसांना खरंच आपण 'यंत्रा' सारखं वापरतोय का?.. याचा विचार करायला हरकत नाही...😊😊 have a wonderful day  to all of you.. ©️ डॉ. जितेंद्र गांधी मानसिक आरोग्य कौन्सिलर मनोसंतुलन उपक्रम

सुरवंट ते फुलपाखरू एक मानसशास्त्रीय प्रवास...

आपण सर्वांनाच सुंदर, रंगबिरंगी व आकर्षक असणारे फुलपाखरू आवडतात... पण फुलपाखरू बनण्याचा जीवनप्रवास खूपच खडतर व क्लेशदायक असतो... साधारण एका छोट्याशा बीजांडा पासून सुरवंटाचा (caterpillar) फुलपाखरू बनवण्याचा जीवन प्रवास सुरू होतो....   हळूहळू शारीरिक आकारमान वाढत राहिल्यामुळे छोट्याशा बीजांडा राहणे त्या सुरवंटाला असाह्य  होत राहतं...हा त्रास कमी कि काय जेव्हा  बीजांडा मधून बाहेर पडण्याची यायची वेळ होते तेव्हा... बीजांडाचे कवच  फुटता फुटत नाही... एकीकडे  सुरवंटाचे वाढलेले शारीरिक आकारमान  व बीजांडाचे न फुटणे त्यामुळे त्याला प्रचंड कोंडमारा सहन करणे  क्रमप्राप्त असते... पण तरीही सुरवंट आपला प्रयत्न सोडत नाही..     पूर्ण ताकदीनिशी बीजांडाला धडक मारत राहतो...  व एक दिवशी यशस्वी पण होतो... जो सुरवंट हे करू शकला नाही त्याला बिजांडातुन बाहेर येणे शक्य नसतं... ह्या सर्व जीवन  प्रवासात एक महत्त्वाची बाब लक्षात घेणे गरजेचे आहे की... शारीरिक क्षमतेपेक्षा मानसिक क्षमतेवरच ह्या सुरवंटाचे जन्म व फुलपाखरू बनणे अवलंबून असतं... जे सुरवंट आपली मान...

विचारांचे च्युंगम...

विचार करण्याची क्षमता हा मानवी उत्क्रांतीचा महत्त्वाचा पाया आहे... आज तंत्रज्ञानाच्या युगात सुद्धा मानवी विचारांचे महत्त्व अबाधित आहे... विचारांची शृंखला पुढे जाऊन कृतीत परावर्तित होत असते (our thoughts reflects in our action and behaviour) त्यामुळे आपली कृती ही आपल्या विचारांचेच प्रतिनिधित्व करीत असते...सर्वसाधारणपणे दैनंदिन जीवनात वेगवेगळे विचार आपल्या मेंदूमध्ये येणे स्वाभाविक असले तरी त्यावरचे नियंत्रण सतत राखणे मानसिक आरोग्यासाठी खूप महत्त्वाचे असते...    जेव्हा व्यक्ती आपल्या सतत येणाऱ्या विचारांवर नियंत्रण ठेवण्यास अयशस्वी ठरतो व सततचा अतीविचारांचा ओघ वाढत राहतो तेव्हा निर्माण झालेला एक विचार... पुढच्या दुसऱ्या विचाराला निर्मित करतो व विचारांची ही सर्कस सुरू होते... महत्त्वाची बाब म्हणजे निर्माण झालेल्या अतिविचारांची ही मालिका त्या व्यक्तीच्या वैचारिक पद्धतीचा मुख्य भाग बनते... निर्माण झालेले अतिरिक्त विचार हे मुळातच कुचकामी, निरर्थक व दिशाहीन असतात...    सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत अतिशय निरर्थक विचारांच्या ट्रॅफिक मुळे व्यक्तीचा चिडचिडेपणा वाढणे,...

कौन्सिलीग इन पॉर्नोग्राफी एडिक्शन....

 माझ्याकडे समुपदेशनासाठी वय 14 (इयत्ता ८) ते 56 वर्षांचे गृहस्था पर्यंत पॉर्नोग्राफी अडिक्शनशी झुंजत असलेल्याचा  समावेश असून... पॉर्नोग्राफीने  मानवी मनावर किती व्यापक परिणाम केल्याचे यावरून स्पष्ट होते....मुळातच मानवी लैंगिकता हा कुतूहलाचा, अंतर्गत आनंदाचा व स्व-प्रगटीकरण्याचा मूळ स्तोत्र म्हणून आपण सर्वांना परिचित असला तरी व्यापक दृष्टिकोनातून बघितल्यास व्यक्तीची लैंगिकता अनेक बाबींवर अवलंबून असते उदाहरणार्थ..  व्यक्तीची मानसशास्त्रीय जडणघडण, जैविक (biological), सामाजिक, भावनिक, आर्थिक, कौटुंबिक, मित्रमंडळी,  पूर्वानुभव, दृष्टिकोण, लैंगिकतेबाबत चे ज्ञान व त्याचे  व्यक्तीमत्व  अशा अनेक गोष्टींचा यात समावेश करता येईल ...    मुळातच आपली लैंगिकता ही एक सर्वसामान्य मानवी गरजेचा भाग असला तरी त्याचे प्रकटीकरण वैयक्तिक स्तरावर होत असल्यामुळे त्याच्यातील दोषाचे  परिणाम त्या व्यक्तीवर, त्याच्या जोडीदारावर व एकूणच संपूर्ण कुटुंब व्यवस्थेवर पडत असतात....    आणि म्हणूनच पॉर्नोग्राफी एडिक्शनशी झुंजत असलेल्या व्यक्तीला पारंपारिक पद्धतीने द...

फॉलो द नेचर.....

कोरोना संक्रमण नंतर जगभर कधी नव्हे तेवढी भीती, चिंता, नैराश्य व उदासीनता आपण सर्वजण अनुभवत आहोत.... या सर्व शारीरिक, मानसिक, आर्थिक व राजकीय उलथापालथ  नंतर सुद्धा आपण शांतपणे विचार केला तर असे लक्षात येईल की आपल्या आजूबाजूला असलेल्या निसर्ग आजही तेवढाच  शांत व स्थितप्रज्ञ आहे... सूर्य आपल्या वेळेवर उगवतोय व मावळतोय सुद्धा... पक्षी आजही तेवढ्याच आत्मविश्वासाने गगनभरारी मारताना दिसतात... सकाळचा मंद वारा आजही तेवढाच हवाहवासा वाटतो... रात्रीचा चंद्र आजही तेवढाच शितल आहे...    झाडांची सळसराट... फळां व फुलांचे बहरुन घेणे...‌ यावरून स्पष्ट होते की आपल्या आजूबाजूला एक आश्‍वासक निसर्ग आहे.... या आश्वासक निसर्गात आपल्यालाही वास्तव्याचा तेवढाच अधिकार आहे जेवढा चंद्र, सूर्य व ताऱ्यांना कारण आपण या सर्वांचाच एक अविभाज्य घटक आहोत... पण ही भीती, चिंता, नैराश्य व उदासीनता याचा खरा निर्माता कोण?...तर उत्तर आपण सर्वांना माहिती आहे... आपण नैसर्गिक नियमाचे कायम उल्लंघन करीत करीत आलेले आहोत... एवढेच नव्हे तर पर्यावरणीय, राजकीय आर्थिक,  सामाजिक व नैतिक मूल्यांना कायम पायी तुडवत आलेल...

मानसिक उपचाराची सद्यस्थिती

मानसिक आरोग्याच्या उपचार, पुनर्वसन, समुपदेशन व प्रतिबंध या सर्वच घटकांमध्ये भारताची आरोग्य व्यवस्थेची परिस्थिती अतिशय बिकट आहे... एकूणच प्रशिक्षित मानसिक आरोग्य  कर्मचाऱ्यांची कमतरता, सामाजिक जागृतीचा अभाव, वाढते ताणतणाव व मानसिक आरोग्याकडे बघण्याच्या कलंकित दृष्टिकोनामुळे (stigma) दिवसेंदिवस मानसिक आरोग्याची सार्वजनिक उपचार व्यवस्था ढासळतच राहणार आहे यात दुमत नाही....    आणि म्हणूनच परिणाम स्वरूपी डिप्रेशन आणि सुसाईड याबाबतीत भारताने जागतिक अग्रक्रम राखलेला आहे.... मानसिक अनारोग्याच्या उच्चतम धोक्याच्या  पातळीवर असणाऱ्या आपल्या देशाला,  समाजाला व पर्यायाने आरोग्य प्रशासनाला याबाबतचे गांभीर्य नसावे ही शोकांतिकेची बाब आहे.... मानसिक आजार हे जितके जैविक (biological) असतात....त्यापेक्षा कित्येक पटीने  ते मानसिक (psychological), प्रासंगिक (situational/environment al), आजूबाजूच्या वातावरणातून (surroundings) , व्यक्तिमत्त्वाच्या जडणघडणीतुन (personality factors) व भावनिक (emotional) प्रश्नांमुळे सुद्धा निर्माण होत असतात... उपलब्ध असलेल्या मानसिक आरोग्य उपचार प्रा...