मानवी आयुष्यातील कष्ट कमी व्हावेत म्हणून मानवाने आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर मशीन्स व विविध यंत्रे तयार केलीत... निर्माण केलेल्या मशीन्स व यंत्रे इतक्या 'बुद्धिमान' होऊ लागल्यात की आता 'कृत्रिम' बुद्धिमत्तेमुळे मानवांना त्या सहज हाताळू शकतात व आवश्यकतेनुसार सूचना पण देऊ शकतात.. एक वेळ अशी येईल की सर्व माणसे अगदी 'तंतोतंत' मशीन व यंत्राप्रमाणे काम करायला लागतील... व आपणच निर्माण केलेले मशीन्स व यंत्रे आपल्यालाच मानवी संवेदना, प्रेम, काळजी, आपुलकी, स्नेह, जिव्हाळा, मैत्री, विश्वास, सुखदुःखाच्या अनुभूती या सर्वांचं 'महत्त्व' पटवून सांगतील... कित्येक दशानंतर माणसांनी यंत्रे तयार केलीत...की यंत्रांनी माणसं हा मात्र वादविवादाचा मोठा विषय ठरेल... हे जर खरंच थांबवण्याची माणसाला इच्छा असेल ..तर त्याने आपल्या आजूबाजूच्या माणसांना खरंच आपण 'यंत्रा' सारखं वापरतोय का?.. याचा विचार करायला हरकत नाही...😊😊 have a wonderful day to all of you.. ©️ डॉ. जितेंद्र गांधी मानसिक आरोग्य कौन्सिलर मनोसंतुलन उपक्रम
कोरोना संक्रमण नंतर जगभर कधी नव्हे तेवढी भीती, चिंता, नैराश्य व उदासीनता आपण सर्वजण अनुभवत आहोत.... या सर्व शारीरिक, मानसिक, आर्थिक व राजकीय उलथापालथ नंतर सुद्धा आपण शांतपणे विचार केला तर असे लक्षात येईल की आपल्या आजूबाजूला असलेल्या निसर्ग आजही तेवढाच शांत व स्थितप्रज्ञ आहे... सूर्य आपल्या वेळेवर उगवतोय व मावळतोय सुद्धा... पक्षी आजही तेवढ्याच आत्मविश्वासाने गगनभरारी मारताना दिसतात... सकाळचा मंद वारा आजही तेवढाच हवाहवासा वाटतो... रात्रीचा चंद्र आजही तेवढाच शितल आहे...
झाडांची सळसराट... फळां व फुलांचे बहरुन घेणे... यावरून स्पष्ट होते की आपल्या आजूबाजूला एक आश्वासक निसर्ग आहे.... या आश्वासक निसर्गात आपल्यालाही वास्तव्याचा तेवढाच अधिकार आहे जेवढा चंद्र, सूर्य व ताऱ्यांना कारण आपण या सर्वांचाच एक अविभाज्य घटक आहोत... पण ही भीती, चिंता, नैराश्य व उदासीनता याचा खरा निर्माता कोण?...तर उत्तर आपण सर्वांना माहिती आहे... आपण नैसर्गिक नियमाचे कायम उल्लंघन करीत करीत आलेले आहोत... एवढेच नव्हे तर पर्यावरणीय, राजकीय आर्थिक, सामाजिक व नैतिक मूल्यांना कायम पायी तुडवत आलेलो आहोत... या सर्वांचाच एकत्रित परिणाम म्हणजे आज निर्माण झालेल्या जागतिक समस्या होय...
भविष्यात समस्या मुखवटे बदलत निर्माण होत राहतील व मनुष्य त्यावर उपायोजना शोधत राहील.... पण तोपर्यंत आपण हे विसरलेले असु की एक आश्वासक निसर्ग आपल्या आजूबाजूला असताना... आपण एका कृत्रिम व काल्पनिक जगाच्या निर्मितीत गुंतलो होतो... आणि म्हणूनच गरज आहे वेळीच खऱ्याखुऱ्या आपल्या आश्वासक निसर्गाला ओळखण्याची व त्याच्याशी आश्वासक बनण्याची...आपण आपल्या निसर्गाची काळजी घेत राहिल्यास आपली काळजी घेण्यास तो परिपूर्ण व समर्थ आहे... अन्यथा आपल्या विनाशाच्या वेळीसुद्धा तो असाच शांत व स्थितप्रज्ञ असेल जसा आज आहे....
©️ डॉ. जितेंद्र गांधी
मानसिक आरोग्य समुपदेशन व पुनर्वसन विषयतज्ञ
9420461580
Comments
Post a Comment