मानवी आयुष्यातील कष्ट कमी व्हावेत म्हणून मानवाने आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर मशीन्स व विविध यंत्रे तयार केलीत... निर्माण केलेल्या मशीन्स व यंत्रे इतक्या 'बुद्धिमान' होऊ लागल्यात की आता 'कृत्रिम' बुद्धिमत्तेमुळे मानवांना त्या सहज हाताळू शकतात व आवश्यकतेनुसार सूचना पण देऊ शकतात.. एक वेळ अशी येईल की सर्व माणसे अगदी 'तंतोतंत' मशीन व यंत्राप्रमाणे काम करायला लागतील... व आपणच निर्माण केलेले मशीन्स व यंत्रे आपल्यालाच मानवी संवेदना, प्रेम, काळजी, आपुलकी, स्नेह, जिव्हाळा, मैत्री, विश्वास, सुखदुःखाच्या अनुभूती या सर्वांचं 'महत्त्व' पटवून सांगतील... कित्येक दशानंतर माणसांनी यंत्रे तयार केलीत...की यंत्रांनी माणसं हा मात्र वादविवादाचा मोठा विषय ठरेल... हे जर खरंच थांबवण्याची माणसाला इच्छा असेल ..तर त्याने आपल्या आजूबाजूच्या माणसांना खरंच आपण 'यंत्रा' सारखं वापरतोय का?.. याचा विचार करायला हरकत नाही...😊😊 have a wonderful day to all of you.. ©️ डॉ. जितेंद्र गांधी मानसिक आरोग्य कौन्सिलर मनोसंतुलन उपक्रम
अचानक अखाद्या व्यक्तीची विशेषताह ( सेलिब्रिटीची )आत्महत्या झाल्यानंतर संपूर्ण जनमानस विविध स्तरावर चर्चा , विचार मंथन व व चर्चासत्राच्या माध्यमातून आपआपली प्रतिक्रिया व्यक्त करत असतो. कालांतराने समस्या जैसे थे ....समस्या तश्याच रहतात व प्रतिक्रिया हवेत उड्न जातात. शारीरिक आरोग्या बाबतीत आपण सर्वजन मोठ्या प्रमाणात जागरूक असल्याचे स्पष्टपने लक्षात येते पण मानसिक आरोग्या बाबतीत चित्र अगदी उलट आहे.
शरीर आणी मन (मे़दुं) ह्या दोन्ही अविभकक्त बाबी आहेत आणी उत्तम आरोग्य साठी दोघांचे संवर्धन करने हिच आरोग्याची गुरुकिल्ली आहे. आधुनिक जिम, योगा केंद्र, न्यूट्रीशन डायट क्लिनिक, शारीरिक आरोग्य सुविधा पुरवणारे डॉक्टर्स, क्लीनिकस, हॉस्पिटल्स, मॉर्निंग वॉक साठी वाढणारी गर्दी आपनास शारीरिक आरोग्य जपण्यास भाग पाडते. पण मानसिक आरोग्य बाबतीत परिस्थिति अगदी उलट आहे.
आपला दैनंदिन ताण तनाव, चिंता, डिप्रेशन ,भीती, मानसिक द्वंद, कौटुंबिक तनाव ,व्यसन , बिघडलेले नातेसंबंध , वाढती स्पर्धा, द्वेष, मत्सर, ईर्ष्या आशा एक ना अनेक मानसिक अग्निदिव्यातून अपल्याला रोज जाने भाग पडते. शारीरिक आजार जसे अचानक उद्भ्वत नाहीत तसेच मानसिक आजार पण. व्यक्ति कधी आपले मानसिक आरोग्य गमावुन बसतो हे त्याला व पर्यायाने कुटुंबाला ही उमगत नाही .गंभीर मानसिक आजारपणाच्या अवस्थे अगोदर व्यक्तीला मोठ्या प्रमाणात प्राथमिक मानसिक उपचार ची गरज भासते... काउंसलिंग, साइकोथेरेपी, सपोर्टिव थेरेपी, कॉग्निटिव बिहेवियर थेरेपी, बिहेवियर थेरेपी ,फैमिली इंटरवेंशन, बिहेवियर मोडिफिकेशन, रेशनल इमोटिव बिहेवियर थेरेपी अशा एक ना अनेक थेरपीजच्या माध्यमातून व्यक्ति व कुंटूबाला मदद करता येते .
प्राथमिक मानसिक आजाराचे शिक्षण आणी प्रशिक्षण (mental health education)सुध्दा व्यक्तीला मानसिक आजाराशी लढण्यास मोठ्या प्रमाणात मदद करतात हे संशोधनाने सिध्द झालेले असताना गरज आहे अशा सहज, सोपी व उपलब्ध होवु शकणारया प्रतिबंधात्मक मानसिक आरोग्य सुविधा समाजात सार्वजनिक ठिकानी निर्माण करण्याची. जागतिक स्तरावर डिप्रेशन ग्रस्त रुग्णांच्या संख्येत अग्रेसर असणाऱ्या आपल्या देशामध्ये अभिनेता सुशांतच्या आत्महत्येनंतर आपला समाज खडबडून मानसिक आरोग्याबद्दल सजग होईल याची शक्यता अतिशय धूसर आहे तरी सुद्धा हा लेखप्रपंच...
©️ डॉ. जितेंद्र गांधी
मानसिक आरोग्य समुपदेशन व पुनर्वसन विषयतज्ञ
9420461580
Comments
Post a Comment