Skip to main content

आजूबाजूच्या माणसांना खरंच आपण 'यंत्रा' सारखं वापरतोय का?..

 मानवी आयुष्यातील कष्ट कमी व्हावेत म्हणून मानवाने आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर मशीन्स व विविध यंत्रे तयार केलीत... निर्माण केलेल्या मशीन्स व यंत्रे इतक्या 'बुद्धिमान' होऊ लागल्यात की आता 'कृत्रिम' बुद्धिमत्तेमुळे मानवांना त्या सहज हाताळू शकतात व आवश्यकतेनुसार सूचना पण देऊ शकतात.. एक वेळ अशी येईल की सर्व माणसे अगदी 'तंतोतंत' मशीन व यंत्राप्रमाणे काम करायला लागतील... व आपणच निर्माण केलेले मशीन्स व यंत्रे आपल्यालाच मानवी संवेदना, प्रेम, काळजी, आपुलकी, स्नेह, जिव्हाळा, मैत्री, विश्वास, सुखदुःखाच्या अनुभूती या सर्वांचं 'महत्त्व' पटवून सांगतील... कित्येक दशानंतर माणसांनी यंत्रे तयार केलीत...की यंत्रांनी माणसं हा मात्र वादविवादाचा मोठा विषय ठरेल... हे जर खरंच थांबवण्याची माणसाला इच्छा असेल ..तर त्याने आपल्या आजूबाजूच्या माणसांना खरंच आपण 'यंत्रा' सारखं वापरतोय का?.. याचा विचार करायला हरकत नाही...😊😊 have a wonderful day  to all of you.. ©️ डॉ. जितेंद्र गांधी मानसिक आरोग्य कौन्सिलर मनोसंतुलन उपक्रम

मुलांना मानसिक समस्या असू शकतात काय?



लहान मुले ही मुळातच  इतरांपेक्षा अधिक संवेदनशील असल्यामुळे आजूबाजूच्या घडणाऱ्या छोट्या छोट्या घटनांचाही प्रभाव लहान मुलांवर विलक्षण पद्धतीने होत असतो. लहानपणी बिघडलेल्या मानसिक आरोग्याचे संतुलन वेळेतच न साधल्यास त्याचे रूपांतर कालांतराने चुकीची विचार प्रणाली, व्यक्तिमत्व निर्मिती व चुकीच्या वर्तनाला जन्म देणारी घटना ठरू शकते. पालकत्वाची जबाबदारी आनंद व तणाव या दोन्ही भावनांच्या मिश्र प्रवाहातून जात असताना  आपल्या मुलाचा मानसिक आरोग्याचा क्षणभर का होईना विचार करणे खूप गरजेचे असल्याचे जाणवत आहे . आणि म्हणूनच शालेय मुलांना विविध मानसिक, बौद्धिक, वर्तनात्मक व   विचारात्मक समस्या असू शकतात हे सर्व पालकांनी जाणून घेतले पाहिजे.  मुलांच्या विविध मानसिक समस्या जर पालकांनी लक्षात घेतल्यास स्वतः पालकांना  व आपल्या मुलाला योग्य ते मानसशास्त्रीय मदत व समुपदेशन  मिळू शकते. शालेय मुलांच्य विविध  मानसिक समस्यांना सामोरे जावे लागते त्यांपैकी महत्त्वाच्या मानसिक समस्या वा आजार पुढीलप्रमाणे असू शकतात.  
 
(1) स्पेसिफिक रीडिंग डिसॉर्डर: या प्रकाराला डिस्लेक्सिया म्हणून पण पर्यायी शब्दाने ओळखले जाते. या प्रकारात मुलांना वाचण्यास, लेखन शिकण्यास अतिशय विलंब होतो. शब्द गहाळ करणे, चुकीचे शब्द बनवणे, उलट शब्द लिहिणे, परत परत एकच शब्द लिहिणे, अतिशय मंद गतीने वाचणे वा  लिहिण्याची क्षमता अतिशय मंदावणे या सर्व कारणांमुळे त्याचा सरळ परिणाम मुलांच्या शैक्षणिक प्रगती पुस्तकावर पडून वारंवार नापास किंवा एकाच वर्गात बरीच वर्षे घालण्याचे प्रकार सुरू होतात.
 
(2)स्पेसिफिक अर्थमॅटिक डिसॉर्डर:  या प्रकारात मुलांची गणिताची क्षमता अतिशय कमी असते. सोपी गणिते समजणे, गणितातील चिन्हांचा योग्य वापर करणे, अंकांना ओळखणे या सर्व गणितीय क्षमता पूर्णपणे कार्य करत नाही.  अशी मुले गणित या विषयात हमखास नापास होताना दिसतात. 
 
(3) स्पेसिफिक डेव्हलपमेंटल डिसॉर्डर ऑफ स्पीच अँड  लांग्वेज:  आवाजाची चढ-उतार करताना भाषेचा वापर करताना अशा पद्धतीने करतात की दुसऱ्यांना वा ऐकणाऱ्यांना बोलण्याचा अर्थ नीट समजून घेणे जमत नाही उदाहरणार्थ रॅबिट  या शब्दाऐवजी व्याबीट असा उच्चार मुलांकडून होत असतो.
 
(4) स्पेसिफिक डेव्हलपमेंटल डिसॉर्डर ऑफ मोटर फंक्शन: रोजच्या दैनंदिन काम करताना, शारीरिक हालचाली करताना अडचणी येतात उदाहरणार्थ स्वतःचे कपडे घालने, शर्टाचे बटन लावणे, धावणे,  खेळणे अशा विविध ठिकाणी मुलांना शारीरिक अवयवांची हालचाल करताना अडचणी असतात. 
 
(5)ऑटिझम: साधारण अडीच वर्षांपूर्वी ऑटिझमची सुरुवात होते पण नंतरही ऑटिझमची शक्यता टाळता येत नाही. या प्रकारात मुलांना चारचौघात मिसळण्याचे, देवाण-घेवाण कौशल्याचे तसेच अंतर व्यक्ती (interpersonal relationship) संबंध निर्माण करण्यात खूप अडचणी येतात उदाहरणार्थ नवीन व्यक्ती वा इतर कोणी घरात आल्यास हसून प्रतिसाद देत नाहीत,  डोळे  न मिळवणे (lack of eye contact), आपल्या आजूबाजूला कोणी तरी आहे याबाबतचे भान ही मुले हरवून बसतात, आपल्या पालकांशी सुद्धा अलिप्तपणे वागतात, खेळांमध्ये रमत नाही, अनुकरण वर्तन अजिबात आवडत नाही अश्या विविध बाबतीत मुलांना अडचणींना सामोरे जावे लागते बऱ्याचदा विचित्र वर्तन (odd and eccentric behavior) सुद्धा आढळून येते 
 
(6) हायपर केनेटिक डिसऑर्डर: या प्रकाराला अटेन्शन डेफिसिट अँड हायपर ऍक्टिव्हिटी म्हणून पण ओळखले जाते सुमारे तीन टक्के मुलांमध्ये हा आजार आढळून येतो. या प्रकारात एकाच गोष्टीवर जास्त वेळ लक्ष केंद्रित करण्याची क्षमता मुलांमध्ये अजिबात नसते, वस्तूंची तोडफोड, आदळाआपट सारखी चालू असते, शारीरिक हालचाली अतिशय जलद गतीने करतात, एकाच जागी स्वस्थ बसून राहण्याचा कमालीची असमर्थता असते, इकडून तिकडे फिरणे, आज्ञा न पाळणे, एखादी गोष्ट करत असताना दुसऱ्या गोष्टीकडे आकृष्ट होणे, विचारा पूर्वी कृती करणे अशा अनेक समस्यांना मुलांना सामोरे जावे लागते. 
 
आजच्या या स्पर्धेच्या युगात मुलांच्या मानसिक आरोग्य बाबतीत पालकांनी संपुर्णपणे सुजाण व जागरूक असणे गरजेचे आहे कदाचित आज लक्षात आलेल्या मानसिक, बौद्धिक वर्तनात्मक अडचणी समुपदेशनाने व गरज पडल्यास मानसोपचाराने  मोठ्या प्रमाणात टाळता येऊ शकतात. आणि विशेष म्हणजे समस्याग्रस्त मुलाच्या पालकांचे समुपदेशनच  अतिशय महत्वाचे ठरते.  अलीकडे पालकांना मुलांकडे लक्ष देण्यास पुरेसा वेळ नसला तरीही आपल्या मुलांच्या मानसिक आरोग्याबाबत  चर्चा करण्याची मानसिकता निर्माण करण्यास हा लेख उपयोगी पडेल अशी आशा वाटते...


Comments

Popular posts from this blog

मुलांना सतत मारहाण करणारे आई-वडील....

बारा वर्षीय अनिकेत (नाव बदललेले आहे) समुपदेशनासाठी त्याच्या शाळेमार्फत पाठविण्यात आला होता... शाळेमार्फत पाठविल्यामुळे त्याचे आई-वडील सुद्धा वेळ काढून त्याच्यासोबत उपस्थित होते... साधारणतः वर्गातील हुशार विद्यार्थ्यांपैकी एक असणारा अनिकेत गेल्या दोन वर्षापासून एका वेगळ्याच "जगात" वावरत असल्याचे त्याच्या शिक्षकांना जाणवले...  गेल्या दोन वर्षापासून अभ्यासामध्ये टप्प्याटप्प्याने तो मागे पडत होता... शिकवताना वर्गात लक्ष न देणे, वर्ग शिक्षकांचे न ऐकणे, खिडकीतून सतत बाहेर बघत राहणे, इतरांशी हिंसक पद्धतीने वागणे, इतर मुलांना शिवीगाळ करणे,आपल्या ड्रेस व शालेय साहित्याची योग्य निगा न राखणे, चिडचिड करणे, वर्गात झोपणे, इतर विद्यार्थ्यांच्या खोड्या काढणे, दिलेला गृहपाठ पूर्ण न करणे अशा अनेक कारणामुळे शिक्षकांना त्याला मानसशास्त्रीय मदतीची गरज असल्याचे ओळखून समुपदेशनासाठी पाठविले होते...  शाळेतील या सर्व बाबतीची पुसटशी कल्पना आई-वडिलांना होती...पण वयानुरूप हे सर्व व्यवस्थित होईल असे त्यांना वाटत होते...अचानक उद्भवलेल्या या प्रसंगामुळे ती दोघेही घाबरलेली व अस्वस्थ होती... समुपदेशन प्रक्...

आजूबाजूच्या माणसांना खरंच आपण 'यंत्रा' सारखं वापरतोय का?..

 मानवी आयुष्यातील कष्ट कमी व्हावेत म्हणून मानवाने आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर मशीन्स व विविध यंत्रे तयार केलीत... निर्माण केलेल्या मशीन्स व यंत्रे इतक्या 'बुद्धिमान' होऊ लागल्यात की आता 'कृत्रिम' बुद्धिमत्तेमुळे मानवांना त्या सहज हाताळू शकतात व आवश्यकतेनुसार सूचना पण देऊ शकतात.. एक वेळ अशी येईल की सर्व माणसे अगदी 'तंतोतंत' मशीन व यंत्राप्रमाणे काम करायला लागतील... व आपणच निर्माण केलेले मशीन्स व यंत्रे आपल्यालाच मानवी संवेदना, प्रेम, काळजी, आपुलकी, स्नेह, जिव्हाळा, मैत्री, विश्वास, सुखदुःखाच्या अनुभूती या सर्वांचं 'महत्त्व' पटवून सांगतील... कित्येक दशानंतर माणसांनी यंत्रे तयार केलीत...की यंत्रांनी माणसं हा मात्र वादविवादाचा मोठा विषय ठरेल... हे जर खरंच थांबवण्याची माणसाला इच्छा असेल ..तर त्याने आपल्या आजूबाजूच्या माणसांना खरंच आपण 'यंत्रा' सारखं वापरतोय का?.. याचा विचार करायला हरकत नाही...😊😊 have a wonderful day  to all of you.. ©️ डॉ. जितेंद्र गांधी मानसिक आरोग्य कौन्सिलर मनोसंतुलन उपक्रम

इमोशनल मॅनेजमेंट म्हणजे काय?

माणसाच्या मानसशास्त्रीय प्रमुख लक्षणांमध्ये व्यक्तीची भावनाप्रधानता (emotional being)  हे सर्वात महत्त्वाचे लक्षण मानले गेले पाहिजे. माणसाच्या जगण्याचे व अस्तित्वाचे महत्त्वाचे घटक त्या व्यक्तीच्या भावनाकोशात दडून असतात.  मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून एकूणच व्यक्तिमत्वाच्या विश्लेषणमध्ये त्या व्यक्तीच्या इमोशनल घटकांना दुर्लक्षित करून चालणार नाही. भीती (fear) राग (anger) दुःख (sadness) आनंद(happiness) कीळसपणा (disgust) आश्चर्य (surprise) व विश्वास (trust) अशा विविध भावनांच्या मिश्रणातून आपण सर्वजण आपले भावविश्वाचे जाळे विणत असतो.  आपले  इमोशन्स आपले आयुष्य  मोठ्या प्रमाणात "ड्राईव्ह" करतात की काय?  हेही आपण अनुभवत असतो. भावनाच्या या नैसर्गिक व वातावरण निर्मित प्रक्रियेत त्याचे योग्य व्यवस्थापनामुळे आपण अधिक आनंदी , निखळ  व निरोगी आयुष्य जगू शकतो असे संशोधनाअंती मान्य झाल्यामुळे जगभरात " इमोशनल मॅनेजमेंट",  "इमोशनल इंटेलिजन्स", "इमोशनल डायटिंग" असे अनेक मानसशास्त्रीय संकल्पनांनी जन्म घेतला व त्याचा जोमाने प्रचार व प्रसार पण मोठ्या प्रमाणात करण्यात आ...