आपल्या सर्वांच्या आयुष्यात निर्माण होणारे मान-अपमान हे मुळातच भ्रम निर्माण करणारे असतात...आपली इतरांना 'उपयोगिता' असल्यास आपल्याला मानसन्मान मिळतो... त्याचप्रमाणे आपण इतरांना जर गैरसोयीचे असेल तर बऱ्याचदा आपल्या वाट्याला अपमानाचे प्रसंग निर्माण होतात...यातही विशेष म्हणजे आपण सर्वांना खोटा का असेना मानसन्मान मिळत राहावा अशी आपली मनोमन इच्छा असते...परंतु त्याचप्रमाणे आपल्याला मिळालेल्या अपमानाच्या प्रसंगातून आपण निराश होतो, खचतो, चिडतो आयुष्यभर त्याप्रसंगाचा सूड घेण्याचा प्रयत्न करतो... कालांतराने आपल्या लक्षात येते की आपल्याला मिळालेला मान आणि अपमान दोन्हीही भ्रम असून आपणच त्या भ्रमाला वास्तविकतेचे रंग दिलेले आहे..आज पासून माझ्या वाटेला आलेल्या मान व अपमानाच्या प्रसंगांमध्ये मी मानसिक व भावनिकरित्या स्थिर राहील असा संकल्प घेत आहे 😊😊 have a wonderful day to all of you..
©️ डॉ. जितेंद्र गांधी
मानसिक आरोग्य कौन्सिलर
मनोसंतुलन उपक्रम
मानवी आयुष्यातील कष्ट कमी व्हावेत म्हणून मानवाने आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर मशीन्स व विविध यंत्रे तयार केलीत... निर्माण केलेल्या मशीन्स व यंत्रे इतक्या 'बुद्धिमान' होऊ लागल्यात की आता 'कृत्रिम' बुद्धिमत्तेमुळे मानवांना त्या सहज हाताळू शकतात व आवश्यकतेनुसार सूचना पण देऊ शकतात.. एक वेळ अशी येईल की सर्व माणसे अगदी 'तंतोतंत' मशीन व यंत्राप्रमाणे काम करायला लागतील... व आपणच निर्माण केलेले मशीन्स व यंत्रे आपल्यालाच मानवी संवेदना, प्रेम, काळजी, आपुलकी, स्नेह, जिव्हाळा, मैत्री, विश्वास, सुखदुःखाच्या अनुभूती या सर्वांचं 'महत्त्व' पटवून सांगतील... कित्येक दशानंतर माणसांनी यंत्रे तयार केलीत...की यंत्रांनी माणसं हा मात्र वादविवादाचा मोठा विषय ठरेल... हे जर खरंच थांबवण्याची माणसाला इच्छा असेल ..तर त्याने आपल्या आजूबाजूच्या माणसांना खरंच आपण 'यंत्रा' सारखं वापरतोय का?.. याचा विचार करायला हरकत नाही...😊😊 have a wonderful day to all of you.. ©️ डॉ. जितेंद्र गांधी मानसिक आरोग्य कौन्सिलर मनोसंतुलन उपक्रम
Comments
Post a Comment