Skip to main content

Posts

Showing posts from March, 2020

आजूबाजूच्या माणसांना खरंच आपण 'यंत्रा' सारखं वापरतोय का?..

 मानवी आयुष्यातील कष्ट कमी व्हावेत म्हणून मानवाने आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर मशीन्स व विविध यंत्रे तयार केलीत... निर्माण केलेल्या मशीन्स व यंत्रे इतक्या 'बुद्धिमान' होऊ लागल्यात की आता 'कृत्रिम' बुद्धिमत्तेमुळे मानवांना त्या सहज हाताळू शकतात व आवश्यकतेनुसार सूचना पण देऊ शकतात.. एक वेळ अशी येईल की सर्व माणसे अगदी 'तंतोतंत' मशीन व यंत्राप्रमाणे काम करायला लागतील... व आपणच निर्माण केलेले मशीन्स व यंत्रे आपल्यालाच मानवी संवेदना, प्रेम, काळजी, आपुलकी, स्नेह, जिव्हाळा, मैत्री, विश्वास, सुखदुःखाच्या अनुभूती या सर्वांचं 'महत्त्व' पटवून सांगतील... कित्येक दशानंतर माणसांनी यंत्रे तयार केलीत...की यंत्रांनी माणसं हा मात्र वादविवादाचा मोठा विषय ठरेल... हे जर खरंच थांबवण्याची माणसाला इच्छा असेल ..तर त्याने आपल्या आजूबाजूच्या माणसांना खरंच आपण 'यंत्रा' सारखं वापरतोय का?.. याचा विचार करायला हरकत नाही...😊😊 have a wonderful day  to all of you.. ©️ डॉ. जितेंद्र गांधी मानसिक आरोग्य कौन्सिलर मनोसंतुलन उपक्रम

एक मानसिक लढा कोरोनाशी.

साधारण दुसऱ्या महायुद्धानंतर आलेल्या आर्थिक-सामाजिक व राजकीय अस्थिरतेमुळे महायुद्धामध्ये सहभागी झालेल्या सैनिकांपेक्षा त्या देशातील सामान्य नागरिकांना प्रचंड मोठ्या प्रमाणात मानसिक आजार उद्भवले होते....आणि अल्पावधीतच हजारोच्या संख्येने निर्माण झालेल्या मानसिक रुग्णांना उपचारासाठी तातडीने मनोरुग्णालयाची निर्मिती करण्यात आली होती... ही ऐतिहासिक पार्श्वभूमी असली तरी आजच्या परिस्थितीला समर्पक भासत आहे....  कोरोना (COVID-19) नावाच्या विषाणूमुळे आपल्या सर्वांच्या आयुष्यात आमूलाग्र बदल झाल्याचे आपण सर्वजण अनुभवत आहोत... आपल्या आखीव-रेखीव आयुष्यात असे काहीतरी आगळेवेगळे होईल याची आपल्याला पुसटशीही कल्पना असू नये हे विशेष! .....   याचाच अर्थ असा की जगाचा भूतकाळ व वर्तमानकाळ लक्षात घेता भविष्यामध्ये सुद्धा अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या जागतिक स्तरावरच्या समस्यांना सामोरे जाण्याची मानसिक तयारी आपल्याला आजच करून घ्यावी लागेल... उदाहरणार्थ जगाने मुक्त अर्थव्यवस्था स्वीकारली त्याचा परिणाम आपल्यापर्यंत पोहोचणार नाही असे म्हणता म्हणता आपण सर्वजण आज मुक्त अर्थव्यवस्थेचा अविभाज्य घटक बनत गेलेलो आह...

गरज संपूर्ण मानसोपचाराची....

 आजची पोस्ट  माझ्या व्यावसायिक  स्तरावरच्या अनुभवावर आधारित आहे असून मानसिक आरोग्य क्षेत्रात समुपदेशन (counselling) व पुनर्वसन (rehabilitation) कार्यक्षेत्रात काम करताना आलेल्या अनुभवावर आधारित आहे....मानसिक रुग्णांमध्ये प्रामुख्याने १) न्यूरैटीक ( चिंता व तणावातून निर्माण होणारे सौम्य प्रकारचे मानसिक आजार)२) सायकॉटिक ( गंभीर स्वरूपाचे मानसिक आजार) ३) अडिक्शन (व्यसनाधीनता) ४) व्यक्तिमत्त्वाचे आजार (personality disorder) ५)  मेंदूच्या कार्यामध्ये बिघाड झाल्यामुळे निर्माण झालेली मानसिक आजार (ऑरगॅनिक ब्रेन डिसऑर्डर) अशा विविध आजारांचे मनोरुग्ण प्रामुख्याने मानसोपचार तज्ज्ञाकडून उपचार घेत असतात... साधारण तीन ते चार वर्ष घरगुती, धार्मिक, आयुर्वेदिक व इतर उपचार पद्धती करून आलेले मनोरुग्ण व त्यांचे कुटुंब लक्षणे हाताबाहेर गेल्या नंतर मानसोपचार तज्ञाकडे  धाव घेतात....   सहाजिकच तीन ते चार वर्षापासून सुरू झालेल्या मानसिक आजार आपल्या उच्च स्तरावर असल्यामुळे दीर्घकालीन मानसोपचाराची गरज असते... अशा परिस्थितीत सुरुवातीचे काही दिवस/महिने/ वर्ष उपचार घेतल्यानंतर मानसिक आ...

एक पोस्ट...खोडकर व चंचल मुलांच्या पालकांसाठी.......

९ वर्षीय विशाल (नाव बदललेले आहे) माझ्यासमोर आपल्या आई-वडिलांसोबत समुपदेशनासाठी बसला होता. विशालची आई अधिक चिंतातुर असल्यामुळे म्हणाली... मी याचं काय करू ते सांगा सर प्लीज? हा जर असाच त्रास देत राहिला तर आम्ही दोघांनी याला हॉस्टेलमध्ये पाठवण्याचा निर्णय घेतला आहे... दोन वर्षापासून आम्ही सर्व प्रयत्न करून बघितले अगदी मारून व सर्व प्रकारच्या शिक्षा देऊन पण यामध्ये काही बदल नाही...हे सर्व ऐकताना मी विशाल चे निरीक्षण करीत होतो... अगदी गोंधळलेल्या चेहऱ्यावर निर्विकार भाव असलेला व  त्याच्या संदर्भातील चाललेल्या  चर्चेचा विशेष परिणाम त्याच्यावर जाणवत नव्हता... असे असले तरी आतून अतिशय गोंधळलेला व  न्यूनगंड निर्माण झालेला विशाल मला अगदी स्पष्टपणे जाणवत होता...    गेल्या दोन वर्षापासून पालक म्हणून विशाल ची मानसिक स्थिती त्यांनी लक्षात न घेतल्यामुळे वा आल्यामुळे  विशालला  सतत मारहाण करणे, कोंडून ठेवणे, टाकून बोलणे व उपाशी ठेवणे अशा अनेक परंपरागत पालकत्वाच्या शिक्षेमुळे विशालच्या लक्षणांमध्ये  अजुनच भर पडली होती.. घरी जशी परिस्थिती होती तशी शा...

Readymade Parenting