मानवी आयुष्यातील कष्ट कमी व्हावेत म्हणून मानवाने आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर मशीन्स व विविध यंत्रे तयार केलीत... निर्माण केलेल्या मशीन्स व यंत्रे इतक्या 'बुद्धिमान' होऊ लागल्यात की आता 'कृत्रिम' बुद्धिमत्तेमुळे मानवांना त्या सहज हाताळू शकतात व आवश्यकतेनुसार सूचना पण देऊ शकतात.. एक वेळ अशी येईल की सर्व माणसे अगदी 'तंतोतंत' मशीन व यंत्राप्रमाणे काम करायला लागतील... व आपणच निर्माण केलेले मशीन्स व यंत्रे आपल्यालाच मानवी संवेदना, प्रेम, काळजी, आपुलकी, स्नेह, जिव्हाळा, मैत्री, विश्वास, सुखदुःखाच्या अनुभूती या सर्वांचं 'महत्त्व' पटवून सांगतील... कित्येक दशानंतर माणसांनी यंत्रे तयार केलीत...की यंत्रांनी माणसं हा मात्र वादविवादाचा मोठा विषय ठरेल... हे जर खरंच थांबवण्याची माणसाला इच्छा असेल ..तर त्याने आपल्या आजूबाजूच्या माणसांना खरंच आपण 'यंत्रा' सारखं वापरतोय का?.. याचा विचार करायला हरकत नाही...😊😊 have a wonderful day to all of you.. ©️ डॉ. जितेंद्र गांधी मानसिक आरोग्य कौन्सिलर मनोसंतुलन उपक्रम
९ वर्षीय विशाल (नाव बदललेले आहे) माझ्यासमोर आपल्या
आई-वडिलांसोबत समुपदेशनासाठी बसला होता. विशालची आई अधिक चिंतातुर
असल्यामुळे म्हणाली... मी याचं काय करू ते सांगा सर प्लीज? हा जर असाच
त्रास देत राहिला तर आम्ही दोघांनी याला हॉस्टेलमध्ये पाठवण्याचा निर्णय
घेतला आहे... दोन वर्षापासून आम्ही सर्व प्रयत्न करून बघितले अगदी मारून व
सर्व प्रकारच्या शिक्षा देऊन पण यामध्ये काही बदल नाही...हे सर्व ऐकताना
मी विशाल चे निरीक्षण करीत होतो... अगदी गोंधळलेल्या चेहऱ्यावर निर्विकार
भाव असलेला व त्याच्या संदर्भातील चाललेल्या चर्चेचा विशेष परिणाम
त्याच्यावर जाणवत नव्हता... असे असले तरी आतून अतिशय गोंधळलेला व न्यूनगंड
निर्माण झालेला विशाल मला अगदी स्पष्टपणे जाणवत होता...
गेल्या दोन
वर्षापासून पालक म्हणून विशाल ची मानसिक स्थिती त्यांनी लक्षात न
घेतल्यामुळे वा आल्यामुळे विशालला सतत मारहाण करणे, कोंडून ठेवणे, टाकून
बोलणे व उपाशी ठेवणे अशा अनेक परंपरागत पालकत्वाच्या शिक्षेमुळे विशालच्या
लक्षणांमध्ये अजुनच भर पडली होती.. घरी जशी परिस्थिती होती तशी शाळेतही
जवळपास हीच समांतर परिस्थिती असल्यामुळे विशालच्या आजारपणात अजूनच भर पडत
होती.. या सर्व कारणांमुळे विशाल घरी व शाळेमध्ये नेहमी तणावग्रस्त
असायचा... ही सर्व केस स्टडी थोडक्यात सांगण्याचे कारण म्हणजे आपल्या
पाल्याची मानसिक स्थिती पालकांनी लक्षात न घेतल्यास वा आल्यास पालक आपल्या
पद्धतीने त्याला 'सुधारण्याचा' किंवा त्याला 'दुरुस्त' करण्याचा प्रयत्न
करतात व बरेच चुकीच्या पालकत्वाचे उपचार पद्धतीच्या वापर करून मुलांच्या
मानसिक व्यक्तिमत्वाच्या विकासावर दीर्घकालीन चुकीचे परिणाम करीत असतात...
हे सर्व होत असताना विशाल चे क्लीनिकल डायग्नोसिस करण्यात आले व तो
ए.डी.एच.डी (Attention Deficit and Hyperactivity Disorder) ह्या मेंदूच्या
वैकासिक टप्प्यातील अतिशय कॉमन असलेला किशोरवयीन गटातील होणारा मानसिक
आजाराने विशाल ग्रस्त होता...
महत्वाचे म्हणजे एडीएचडी आजाराची प्राथमिक
लक्षणे आपण बघितल्यास ही केस स्टडी फक्त विशाल च्या कुटुंबापर्यंत मर्यादित
राहत नाही. सर्वसाधारण चित्र बऱ्याच कुटुंबामध्ये बऱ्याच अंशी समांतर
पद्धतीने असण्याची शक्यता नाकारता येत नाही.आपल्या पाल्यास ए.डी.एच.डी
असण्याची शक्यता असेल तर त्याचे योग्य समुपदेशन व मानसोपचार करून घेणे
बऱ्याच पालकांना माहिती नसल्यामुळे आपला मुलगा बिघडलाय कि काय? व त्या
संदर्भातील प्रचंड दबाव कौटुंबिक ताणतणाव बऱ्याच कुटुंबांमध्ये दिसतो.आणि
म्हणूनच आपण ए.डी.एच.डी या किशोरवयीन मानसिक आरोग्य संदर्भात प्रशिक्षण
घेणे पालक म्हणून अधिक गरजेचे वाटते. साधारण ७ ते १४ वर्षे वयोगटातमध्ये
प्रामुख्याने ही लक्षणे समोर येतात. स्वकेंद्रित वर्तन(self focused behavior)..सतत दुसऱ्यांच्या गोष्टींमध्ये हस्तक्षेप करणे (interrupting in
others activities)..आपली पाळी न येण्याची वाट बघणे (can not wait)
....दिलेला अभ्यासक्रम वा कृती अपुरी ठेवणे (can not finish the given task
or homework)...लक्ष केंद्रित न करता येणे (unable to concentrate)..
छोट्या छोट्या चुका करणे (doing small small mistake)..दिवा स्वप्न पाहणे
(day dreaming)... आपले सामान व इतर साहित्य व्यवस्थित न होणे (unorganized behavior).. सतत विसरणे (forgetfulness) ... हे सर्व गंभीर स्वरूपाचे
लक्षणे वाटत असतील तरी योग्य मानसोपचार (औषधोपचार, समुपदेशन व वेगवेगळ्या
मानसशास्त्रीय उपचार थेरपीमुळे ) ए.डी.एच.डी मुलांचा उपचार यशस्वीपणे
पुर्ण करता येतो आणि उपचारानंतर ही मुले अतिशय सर्वसामान्य जीवन जगू
शकतात...
महत्त्वाची बाब म्हणजे ही मुलं पुढच्या भविष्यामध्ये अतिशय
कुशाग्र बुद्धीचे किंवा एखाद्या विषयात विशेष प्राविण्य मिळवणारे ठरतात अशा
पद्धतीचे संशोधन ही समोर येत आहे... त्याच्यामुळे हा आजार जरी असला तरी
पालकत्वाच्या दृष्टिकोनातून ती एक मोठी सुवर्णसंधी आपल्यासमोर असू शकते...
गरज आहे आपल्या योग्य पालकत्वाची व योग्य समुपदेशन व मानसोपचाराची.. आज दोन
वर्षानंतर विशाल त्याच्या शाळेमध्ये किंवा कुटुंबामध्ये मोठ्या प्रमाणात
स्थिरावला असून त्याच्या इतर मनो-सामाजिक व वर्तनात्मक तक्रारी बरेच कमी
झाल्या आहेत... विशेष म्हणजे या समुपदेशन दरम्यान विशालच्या पालकांसोबतच
खूप अधिक समुपदेशनाची प्रक्रिया करावी )....
समुपदेशक म्हणून ही केस स्टडी
वैयक्तिक पातळीवर मला खूप समाधान देणारी ठरली.... विशालच्या उज्वल
भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा... आपल्या आजूबाजूलाही अशाच प्रकारचा "विशाल"
आढळून आल्यास त्याला योग्य मानसोपचार व समुपदेशन उपलब्ध करून देणे हे
आपले सर्वांचे कर्तव्य आहे.....
©️ डॉ. जितेंद्र गांधी
मानसिक आरोग्य समुपदेशन व पुनर्वसन विषयतज्ञ
9420461580
Comments
Post a Comment