मानवी आयुष्यातील कष्ट कमी व्हावेत म्हणून मानवाने आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर मशीन्स व विविध यंत्रे तयार केलीत... निर्माण केलेल्या मशीन्स व यंत्रे इतक्या 'बुद्धिमान' होऊ लागल्यात की आता 'कृत्रिम' बुद्धिमत्तेमुळे मानवांना त्या सहज हाताळू शकतात व आवश्यकतेनुसार सूचना पण देऊ शकतात.. एक वेळ अशी येईल की सर्व माणसे अगदी 'तंतोतंत' मशीन व यंत्राप्रमाणे काम करायला लागतील... व आपणच निर्माण केलेले मशीन्स व यंत्रे आपल्यालाच मानवी संवेदना, प्रेम, काळजी, आपुलकी, स्नेह, जिव्हाळा, मैत्री, विश्वास, सुखदुःखाच्या अनुभूती या सर्वांचं 'महत्त्व' पटवून सांगतील... कित्येक दशानंतर माणसांनी यंत्रे तयार केलीत...की यंत्रांनी माणसं हा मात्र वादविवादाचा मोठा विषय ठरेल... हे जर खरंच थांबवण्याची माणसाला इच्छा असेल ..तर त्याने आपल्या आजूबाजूच्या माणसांना खरंच आपण 'यंत्रा' सारखं वापरतोय का?.. याचा विचार करायला हरकत नाही...😊😊 have a wonderful day to all of you.. ©️ डॉ. जितेंद्र गांधी मानसिक आरोग्य कौन्सिलर मनोसंतुलन उपक्रम
साधारण दुसऱ्या महायुद्धानंतर आलेल्या आर्थिक-सामाजिक व राजकीय अस्थिरतेमुळे महायुद्धामध्ये सहभागी झालेल्या सैनिकांपेक्षा त्या देशातील सामान्य नागरिकांना प्रचंड मोठ्या प्रमाणात मानसिक आजार उद्भवले होते....आणि अल्पावधीतच हजारोच्या संख्येने निर्माण झालेल्या मानसिक रुग्णांना उपचारासाठी तातडीने मनोरुग्णालयाची निर्मिती करण्यात आली होती... ही ऐतिहासिक पार्श्वभूमी असली तरी आजच्या परिस्थितीला समर्पक भासत आहे.... कोरोना (COVID-19) नावाच्या विषाणूमुळे आपल्या सर्वांच्या आयुष्यात आमूलाग्र बदल झाल्याचे आपण सर्वजण अनुभवत आहोत... आपल्या आखीव-रेखीव आयुष्यात असे काहीतरी आगळेवेगळे होईल याची आपल्याला पुसटशीही कल्पना असू नये हे विशेष! .....
याचाच अर्थ असा की जगाचा भूतकाळ व वर्तमानकाळ लक्षात घेता भविष्यामध्ये सुद्धा अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या जागतिक स्तरावरच्या समस्यांना सामोरे जाण्याची मानसिक तयारी आपल्याला आजच करून घ्यावी लागेल... उदाहरणार्थ जगाने मुक्त अर्थव्यवस्था स्वीकारली त्याचा परिणाम आपल्यापर्यंत पोहोचणार नाही असे म्हणता म्हणता आपण सर्वजण आज मुक्त अर्थव्यवस्थेचा अविभाज्य घटक बनत गेलेलो आहोत.... प्राथमिक चर्चेत कोरोनाचे शारीरिक परिणाम यावर प्रचंड चर्चा झाली व हळूहळू दबक्या आवाजात का होईना आता त्याची मानसिक घटकावरील वैयक्तिक व सामूहिक परिणामाची चर्चा आपण करायला लागलो आहोत... चर्चेचा उपक्रम स्तुत्य असला तरी तो अल्पावधी पुरताच आहे...
आत्ताच्या डिजिटल प्रसारमाध्यमांमुळे कोरोना आपल्या सर्वांच्या सुप्त (conscious) व असुप्त (unconscious) मनाच्या/ मेंदूच्या डीएनए चा अविभाज्य घटक बनलेला आहे...आता प्रश्न उरतो की ह्या बाबतीत मानसिक स्तरावर आपण काय खबरदारी व काळजी घ्यायला पाहिजे ..
.(१) वैयक्तिक स्तरावर कोरोना संदर्भातील भीती, अस्थिरता व अस्वस्थता अनुभवत असाल तर ती स्वीकारून कुटुंबाला व हितचिंतकांना कबुली द्या
(२) कोरोनाशी संदर्भात असलेल्या सर्व भावनिक व व्यावहारिक स्तरावरच्या हालचालींना आपल्या वैयक्तिक ताण-तणाव नियोजनाचा भाग बनवा
(३) कोरोना ही वस्तुस्थिती असून त्याबाबत अधिकाधिक अपडेट राहणे टाळा... तसे केल्यास आपल्या अस्वस्थेत भरच पडणार आहे
(४ )कोरोना संदर्भातील नकारात्मक भावनांना वाव न देण्याचे प्रशिक्षण आत्मसात करा
(५) कौटुंबिक पातळीवर कोरोना संदर्भात सकारात्मक चर्चा घडवून आणा
(६) सामूहिक पातळीवर "स्वमदत गटाची" स्थापना करू शकल्यास तोही चांगला उपक्रम करू शकेल
(७) वैयक्तिक व कौटुंबिक पातळीवर कोरोना संदर्भातील भीती (fobia) काळजी (anxiety), व अस्वस्थता (restlessness) हाताळण्यास असमर्थ असल्यास समुपदेशक व मानसोपचार यांचा सल्ला घेणे हा पर्याय उपलब्ध आहे....
(८) कोरोना संदर्भात व्हाट्सअप, टीव्ही व इतर माध्यमांपासून लांब राहण्याचा प्रयत्न करा....
आणि म्हणूनच कोरोनाशी लढा हा फक्त शारीरिक स्तरावरचा जिंकून चालणार नाही तर तो मानसिक स्तरावर सुद्धा जिंकावा लागेल... आणि म्हणूनच वैयक्तिक, कौटुंबिक व सामूहिक "डिझास्टर मॅनेजमेंट" मध्ये मानसिक आरोग्याचा समावेश होणे गरजेचे आहे ....
©️ डॉ. जितेंद्र गांधी
मानसिक आरोग्य समुपदेशन व पुनर्वसन विषयतज्ञ
9420461580
Comments
Post a Comment