Skip to main content

आजूबाजूच्या माणसांना खरंच आपण 'यंत्रा' सारखं वापरतोय का?..

 मानवी आयुष्यातील कष्ट कमी व्हावेत म्हणून मानवाने आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर मशीन्स व विविध यंत्रे तयार केलीत... निर्माण केलेल्या मशीन्स व यंत्रे इतक्या 'बुद्धिमान' होऊ लागल्यात की आता 'कृत्रिम' बुद्धिमत्तेमुळे मानवांना त्या सहज हाताळू शकतात व आवश्यकतेनुसार सूचना पण देऊ शकतात.. एक वेळ अशी येईल की सर्व माणसे अगदी 'तंतोतंत' मशीन व यंत्राप्रमाणे काम करायला लागतील... व आपणच निर्माण केलेले मशीन्स व यंत्रे आपल्यालाच मानवी संवेदना, प्रेम, काळजी, आपुलकी, स्नेह, जिव्हाळा, मैत्री, विश्वास, सुखदुःखाच्या अनुभूती या सर्वांचं 'महत्त्व' पटवून सांगतील... कित्येक दशानंतर माणसांनी यंत्रे तयार केलीत...की यंत्रांनी माणसं हा मात्र वादविवादाचा मोठा विषय ठरेल... हे जर खरंच थांबवण्याची माणसाला इच्छा असेल ..तर त्याने आपल्या आजूबाजूच्या माणसांना खरंच आपण 'यंत्रा' सारखं वापरतोय का?.. याचा विचार करायला हरकत नाही...😊😊 have a wonderful day  to all of you.. ©️ डॉ. जितेंद्र गांधी मानसिक आरोग्य कौन्सिलर मनोसंतुलन उपक्रम

गरज संपूर्ण मानसोपचाराची....

 आजची पोस्ट  माझ्या व्यावसायिक  स्तरावरच्या अनुभवावर आधारित आहे असून मानसिक आरोग्य क्षेत्रात समुपदेशन (counselling) व पुनर्वसन (rehabilitation) कार्यक्षेत्रात काम करताना आलेल्या अनुभवावर आधारित आहे....मानसिक रुग्णांमध्ये प्रामुख्याने १) न्यूरैटीक ( चिंता व तणावातून निर्माण होणारे सौम्य प्रकारचे मानसिक आजार)२) सायकॉटिक ( गंभीर स्वरूपाचे मानसिक आजार) ३) अडिक्शन (व्यसनाधीनता) ४) व्यक्तिमत्त्वाचे आजार (personality disorder) ५)  मेंदूच्या कार्यामध्ये बिघाड झाल्यामुळे निर्माण झालेली मानसिक आजार (ऑरगॅनिक ब्रेन डिसऑर्डर) अशा विविध आजारांचे मनोरुग्ण प्रामुख्याने मानसोपचार तज्ज्ञाकडून उपचार घेत असतात... साधारण तीन ते चार वर्ष घरगुती, धार्मिक, आयुर्वेदिक व इतर उपचार पद्धती करून आलेले मनोरुग्ण व त्यांचे कुटुंब लक्षणे हाताबाहेर गेल्या नंतर मानसोपचार तज्ञाकडे  धाव घेतात....
 
सहाजिकच तीन ते चार वर्षापासून सुरू झालेल्या मानसिक आजार आपल्या उच्च स्तरावर असल्यामुळे दीर्घकालीन मानसोपचाराची गरज असते... अशा परिस्थितीत सुरुवातीचे काही दिवस/महिने/ वर्ष उपचार घेतल्यानंतर मानसिक आजाराच्या लक्षणांमध्ये घट होते... बहुतेक वेळा रुग्ण व कुटुंब थोड्याच कालावधीनंतर लक्षणांमध्ये घट झाल्यामुळे स्वतःहून औषधोपचार बंद करून  मोकळे होतात व परत काही दिवसांनी आजार वाढल्यामुळे मानसोपचार तज्ञाकडे धाव घेतात... एक प्रशिक्षित समुपदेशक म्हणून हा  नित्यक्रम मी  अनुभवल्यामुळे काही ठराविक बाबींची माहिती प्रत्येक व्यक्ती, मानसिक आजारी व्यक्ती व त्यांच्या कुटुंबापर्यंत पोहोचवणे गरजेचे वाटते.... 
 
१) मानसोपचारतज्ञा च्या गोळ्या औषधी (pharmacological) व  ई. सी. टी (शॉक ट्रीटमेंटमुळे) मनोरुग्णांच्या लक्षणांमध्ये घट होते परंतु यामुळे संपुर्णपणे मानसिक आजार  पूर्णपणे बरा होत नाहीये..(लक्षणांमध्ये घट होणे व आजार पूर्णपणे बरा होणे यामध्ये खूप फरक आहे) 
२) मानसिक आजार जेवढे बायलॉजिकल (जैविक) असतात  तेवढेच ते सायकॉलॉजिकल (psychological) व सोशल (social) पण असतात 
३) न्युरैटीक  आजारांमध्ये औषधोपचार सोबत समुपदेशन व सायकोथेरपी खूप उपयोगी पडते परंतु ती बऱ्याच मानसिक रुग्णांना व कुटुंबाला मिळत नाही 
४) मानसिक आजार सोबत बरेच कौटुंबिक, सामाजिक, प्रासंगिक व आर्थिक प्रश्न निर्माण होत होतात त्याचे सरळ सरळ परिणाम मानसिक आजारी रुग्णांवर पडतात व त्याचे योग्य व्यवस्थापन हे औषधोपचार तेवढेच महत्त्वाचे असते 
५) मानसिक आजारी व्यक्तीला हाताळण्यासाठी कुटुंबाला विशेष प्रशिक्षणाची गरज असते ते बहुतांशी मिळताना दिसत नाहीये 
६) मानसोपचार तज्ज्ञांकडून औषधोपचार व ईसिटी उपचारानंतर मनोरुग्ण बहुतांशी वेळ घरातच व्यतीत करतो त्यामुळे तो आपले सामाजिक कौशल्य (social skills) गमावून बसतो व सामाजिक प्रवाहापासून दूर जातो... त्यामुळे गोळ्या औषधे घेऊन सुद्धा पेशंट घरामध्येच थांबणे पसंत करतो (अशावेळेस डे केअर सेंटरची गरज खूप महत्वाची आहे)... लक्षणांमध्ये घट झाल्यानंतर मनोरुग्णांसाठी समुपदेशन व पुनर्वसन सेवा मिळाल्यास त्यांच्या लक्षणांमध्ये  घट व सामाजिक स्वीकारा मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असते 
७) पाश्चिमात्य देशांमध्ये मानसोपचार तज्ञ, समुपदेशन व पुनर्वसन तज्ञ हे एकत्रित येऊन मनोरुग्णांना उपचार  करतात भारतामध्ये ती परिस्थिती अजूनही दिसत नाहीये
 ८) हे सर्व लिहिण्यास कारण की कुटुंबाला, मानसिक रुग्णांना परिपूर्ण मेंटल हेल्थ ट्रिटमेंट मिळणे हे अधिक गरजेचे आहे व तो त्यांचा अधिकारच आहे ...
९)बऱ्याच व्यक्ती आपल्या मानसिक आजाराची लक्षणे सुरू झाल्यानंतर सुद्धा समुपदेशक व मानसोपचार तज्ज्ञाकडे  जाण्यास घाबरतात आपला आजार वाढवून  घेतात 
१०) मानसिक आरोग्य क्षेत्रातील समुपदेशक हे विशेष प्रशिक्षित असतात व ते इतर समुपदेशनपेक्षा वेगळा अनुभव व उपचार पद्धती शिकलेले असतात... 
 
तेव्हा मानसिक आजारामध्ये परिपूर्ण उपचार पद्धतीची (comprehensive mental health treatment) गरज खूप  व्यापक व महत्त्वाची आहे.........
 
©️ डॉ. जितेंद्र गांधी
मानसिक आरोग्य  समुपदेशन  व पुनर्वसन विषयतज्ञ
9420461580

Comments

Popular posts from this blog

मुलांना सतत मारहाण करणारे आई-वडील....

बारा वर्षीय अनिकेत (नाव बदललेले आहे) समुपदेशनासाठी त्याच्या शाळेमार्फत पाठविण्यात आला होता... शाळेमार्फत पाठविल्यामुळे त्याचे आई-वडील सुद्धा वेळ काढून त्याच्यासोबत उपस्थित होते... साधारणतः वर्गातील हुशार विद्यार्थ्यांपैकी एक असणारा अनिकेत गेल्या दोन वर्षापासून एका वेगळ्याच "जगात" वावरत असल्याचे त्याच्या शिक्षकांना जाणवले...  गेल्या दोन वर्षापासून अभ्यासामध्ये टप्प्याटप्प्याने तो मागे पडत होता... शिकवताना वर्गात लक्ष न देणे, वर्ग शिक्षकांचे न ऐकणे, खिडकीतून सतत बाहेर बघत राहणे, इतरांशी हिंसक पद्धतीने वागणे, इतर मुलांना शिवीगाळ करणे,आपल्या ड्रेस व शालेय साहित्याची योग्य निगा न राखणे, चिडचिड करणे, वर्गात झोपणे, इतर विद्यार्थ्यांच्या खोड्या काढणे, दिलेला गृहपाठ पूर्ण न करणे अशा अनेक कारणामुळे शिक्षकांना त्याला मानसशास्त्रीय मदतीची गरज असल्याचे ओळखून समुपदेशनासाठी पाठविले होते...  शाळेतील या सर्व बाबतीची पुसटशी कल्पना आई-वडिलांना होती...पण वयानुरूप हे सर्व व्यवस्थित होईल असे त्यांना वाटत होते...अचानक उद्भवलेल्या या प्रसंगामुळे ती दोघेही घाबरलेली व अस्वस्थ होती... समुपदेशन प्रक्...

आजूबाजूच्या माणसांना खरंच आपण 'यंत्रा' सारखं वापरतोय का?..

 मानवी आयुष्यातील कष्ट कमी व्हावेत म्हणून मानवाने आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर मशीन्स व विविध यंत्रे तयार केलीत... निर्माण केलेल्या मशीन्स व यंत्रे इतक्या 'बुद्धिमान' होऊ लागल्यात की आता 'कृत्रिम' बुद्धिमत्तेमुळे मानवांना त्या सहज हाताळू शकतात व आवश्यकतेनुसार सूचना पण देऊ शकतात.. एक वेळ अशी येईल की सर्व माणसे अगदी 'तंतोतंत' मशीन व यंत्राप्रमाणे काम करायला लागतील... व आपणच निर्माण केलेले मशीन्स व यंत्रे आपल्यालाच मानवी संवेदना, प्रेम, काळजी, आपुलकी, स्नेह, जिव्हाळा, मैत्री, विश्वास, सुखदुःखाच्या अनुभूती या सर्वांचं 'महत्त्व' पटवून सांगतील... कित्येक दशानंतर माणसांनी यंत्रे तयार केलीत...की यंत्रांनी माणसं हा मात्र वादविवादाचा मोठा विषय ठरेल... हे जर खरंच थांबवण्याची माणसाला इच्छा असेल ..तर त्याने आपल्या आजूबाजूच्या माणसांना खरंच आपण 'यंत्रा' सारखं वापरतोय का?.. याचा विचार करायला हरकत नाही...😊😊 have a wonderful day  to all of you.. ©️ डॉ. जितेंद्र गांधी मानसिक आरोग्य कौन्सिलर मनोसंतुलन उपक्रम

इमोशनल मॅनेजमेंट म्हणजे काय?

माणसाच्या मानसशास्त्रीय प्रमुख लक्षणांमध्ये व्यक्तीची भावनाप्रधानता (emotional being)  हे सर्वात महत्त्वाचे लक्षण मानले गेले पाहिजे. माणसाच्या जगण्याचे व अस्तित्वाचे महत्त्वाचे घटक त्या व्यक्तीच्या भावनाकोशात दडून असतात.  मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून एकूणच व्यक्तिमत्वाच्या विश्लेषणमध्ये त्या व्यक्तीच्या इमोशनल घटकांना दुर्लक्षित करून चालणार नाही. भीती (fear) राग (anger) दुःख (sadness) आनंद(happiness) कीळसपणा (disgust) आश्चर्य (surprise) व विश्वास (trust) अशा विविध भावनांच्या मिश्रणातून आपण सर्वजण आपले भावविश्वाचे जाळे विणत असतो.  आपले  इमोशन्स आपले आयुष्य  मोठ्या प्रमाणात "ड्राईव्ह" करतात की काय?  हेही आपण अनुभवत असतो. भावनाच्या या नैसर्गिक व वातावरण निर्मित प्रक्रियेत त्याचे योग्य व्यवस्थापनामुळे आपण अधिक आनंदी , निखळ  व निरोगी आयुष्य जगू शकतो असे संशोधनाअंती मान्य झाल्यामुळे जगभरात " इमोशनल मॅनेजमेंट",  "इमोशनल इंटेलिजन्स", "इमोशनल डायटिंग" असे अनेक मानसशास्त्रीय संकल्पनांनी जन्म घेतला व त्याचा जोमाने प्रचार व प्रसार पण मोठ्या प्रमाणात करण्यात आ...