आपल्या मनाला (मेंदूला ) दोन प्रकारचे स्टोअर्स (भंडार) असतात पहिले म्हणजे बोधात्मक मन (conscious mind) व दुसरे म्हणजे अबोध मन (unconscious mind). बोधात्मक मनामध्ये असलेली माहिती आपल्याला ज्ञात असते परंतु अबोध मनामध्ये आपणच संचय केलेली माहिती त्याबाबत आपण अनभिज्ञ असतो.
बऱ्याचदा आपल्या आयुष्यात आलेल्या विविध दुःखदायक, त्रासदायक, निराशावादी घटना, त्रासदायक व्यक्तीमत्वे, सहवास, शाब्दिक संभाषण, नातेसंबंध, कटू आठवणी या सर्व त्रासदायक बाबी आपला अंतर्गत म्हणजेच अबोध मन (मेंदू) दाबून टाकण्याचा प्रयत्न करीत असतो. त्यालाच मनाचा डिफेन्स मेकॅनिझम असे म्हणतात.
आपल्या मनाला त्रासदायक, दुःखदायक असणार्या घटना आपलं मन (मेंदू) नेहमीच दाबून टाकण्याचा (supress) प्रयत्न करीत असतो कारण त्या आठवणी वा घटनां सोबत राहणे मानसिक त्रासदायक ठरत. नेहमीच सप्रेस (मनाने दाबून टाकलेली अंतर्गत दुःखदायक बाब, घटना आपल्याला आत्मिक शांतता प्रदान करेलच असं नाही).
अंतर्गत मानाच्या अबोध मनाने दाबून टाकलेली दुःखदायक बाब, घटना वा प्रतिक्रिया त्याचे व्यवस्थित मनोव्यवस्थापन न झाल्यास तिचा भरणा व्यक्तीच्या सबकॉन्शियस माईंड मध्ये होत राहतो. आपल्याला असणारे बरेच मानसिक तक्रारी व आजार त्यामुळेच निर्माण होतात उदा. सतत चिंता करणे (anxiety or feeling anxious), भीती (phobia), नैराश्य (depression) न्यूनगंड (inferiority complex), नातेसंबंधात ताण तणाव, असुरक्षित वाटत राहणे (feeling insecure) अशा अनेक बाबतीत मानसिक तक्रारी निर्माण करण्याची क्षमता ही आपल्या अबोध मनातूनच निर्माण होत असते.
आपल्या वाट्याला आलेल्या मानसशास्त्रीय त्रासदायक, भीतीदायक, निराश घटना, त्रासदायक व्यक्ति वा व्यक्तिमत्वे, आठवणी, त्रासदायक संभाषण, लैंगिक छळ वा अपमानास्पद वागणूक, आयुष्यात आलेले अपयश अशा अनेक बाबी आपल्या मनाच्या अबोध मनामध्ये स्टोअर्स होत राहतात. आणि म्हणूनच अंतर्गत अबोध मनाची स्वच्छता राखणे मानसिक आरोग्यासाठी खूप गरजेचे असते.
वर्षानुवर्ष साठवून ठेवलेल्या वरील सर्व बाबी स्वच्छ करताना मानसिक स्तरावर थोडासा त्रास निर्माण होऊ शकतो परंतु दीर्घकालीन मानसिक आरोग्यासाठी ते खूप लाभदायक ठरू शकेल यात शंका नाही.
अंतर्गत अबोध मनाच्या स्वच्छतेसाठी मदत हवी असल्यास मदतही मागू शकता..
डॉ. जितेंद्र गांधी
Mob- 9420461580
Comments
Post a Comment