Skip to main content

Posts

Showing posts from October, 2024

आजूबाजूच्या माणसांना खरंच आपण 'यंत्रा' सारखं वापरतोय का?..

 मानवी आयुष्यातील कष्ट कमी व्हावेत म्हणून मानवाने आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर मशीन्स व विविध यंत्रे तयार केलीत... निर्माण केलेल्या मशीन्स व यंत्रे इतक्या 'बुद्धिमान' होऊ लागल्यात की आता 'कृत्रिम' बुद्धिमत्तेमुळे मानवांना त्या सहज हाताळू शकतात व आवश्यकतेनुसार सूचना पण देऊ शकतात.. एक वेळ अशी येईल की सर्व माणसे अगदी 'तंतोतंत' मशीन व यंत्राप्रमाणे काम करायला लागतील... व आपणच निर्माण केलेले मशीन्स व यंत्रे आपल्यालाच मानवी संवेदना, प्रेम, काळजी, आपुलकी, स्नेह, जिव्हाळा, मैत्री, विश्वास, सुखदुःखाच्या अनुभूती या सर्वांचं 'महत्त्व' पटवून सांगतील... कित्येक दशानंतर माणसांनी यंत्रे तयार केलीत...की यंत्रांनी माणसं हा मात्र वादविवादाचा मोठा विषय ठरेल... हे जर खरंच थांबवण्याची माणसाला इच्छा असेल ..तर त्याने आपल्या आजूबाजूच्या माणसांना खरंच आपण 'यंत्रा' सारखं वापरतोय का?.. याचा विचार करायला हरकत नाही...😊😊 have a wonderful day  to all of you.. ©️ डॉ. जितेंद्र गांधी मानसिक आरोग्य कौन्सिलर मनोसंतुलन उपक्रम

'मानवनिर्मित' भीती...

लहानपणापासून आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची 'भीती' (fear) दाखवण्यात येते...किंवा आपल्या मनामध्ये किंबहुना ती 'निर्माण' करण्याचा प्रयत्न आपल्या घरातील मंडळी किंवा आपल्या आजूबाजूचे लोक 'अनावधानाने' करीत राहतात.... अंधाराची भीती, कुणीतरी पकडून घेऊन जाईल, तू पडशील लागेल, तू ऐकले नाहीस तर तुला मार पडेल, खूप अभ्यास कर नाहीतर आयुष्य 'खडतर' आहे...अशा एक ना अनेक भीती सदैव आपला 'पाठलाग' करीत असतात... पुढे मोठे झाल्यानंतर भीतीचे 'स्वरूप' बदलून वेगवेगळ्या प्रकारच्या भीती 'आपण' किंवा आपल्या आजूबाजूचे लोक तयार करीत असतात...चांगलं करिअर हवं, पाठीशी पैसा हवा, मोठ्या लोकांशी ओळखी मी आजारी पडेल का?, माझा अचानक एक्सीडेंट किंवा मृत्यू तर होणार नाही? या जगामध्ये माणसाने 'स्मार्ट' असावं, कुठल्या का मार्गाने होईना पण भरपूर यश, प्रसिद्धी व संपत्ती मिळवली पाहिजे...  यशाच्या आणि अपयशाच्या वेगवेगळ्या स्वरूपातल्या भीती 'सदैव' आपला पाठलाग करीत राहतात... माझ्या रिलेशनशिप मध्ये ब्रेकअप निर्माण होईल का? ती किंवा तो मला समजून घेईल का? त्याच्यासोबत ख...

प्रकाशाचा एक 'किरण'...

  एखाद्या खोलीमध्ये दोन दिवसापासून किंवा दोन महिन्यापासून कायमस्वरूपी 'अंधार' असेल आणि जर त्या अंधाराला 'दूर' करायचे असेल...तर त्या ठिकाणी अंधारातून प्रकाशाकडे जाण्यासाठी पुढच्या दोन महिने प्रकाशाची वाट बघावी लागणार नाही...ज्या क्षणी त्या खोलीमध्ये प्रकाशाचा एक 'किरण' दाखल होईल त्याच वेळेस त्या खोली मधला 'संपूर्ण' अंधार नाहीसा होईल...  आता खोलीतला तो अंधार दोन दिवसांचा आहे की... दोन महिन्यांचा...की दोन वर्षांचा त्याच्याशी त्या किरणाचा काहीही संबंध नाही...एक प्रकाशाचा किरण त्या अंधाराला दूर करण्यासाठी 'पुरेसा' ठरेल... हाच नियम आपल्याला पण लागू आहेत आपल्या आयुष्यामध्ये आपण किती दिवसांपासून...किती महिन्यांपासून...किती वर्षांपासून नकारात्मक विचाराच्या अंधारात जगत असलो तरी त्या नकारात्मक विचारांच्या अंधाराला नाहीसे करायचे असेल तर सकारात्मक विचारांचा एक किरण त्या संपूर्ण नकारात्मक विचारांना नष्ट करण्यास 'पुरेसा' ठरेल...  आज पासून मी माझ्या दैनंदिन आयुष्यामध्ये किमान एक तरी सकारात्मक विचाराचा किरण माझ्या मनामध्ये निर्माण करण्यास 'प्रयत्नशील...

आनंदाने 'उमलणे' हेच 'नैसर्गिक' मानवी जीवन होय...

  निसर्गामध्ये निर्माण झालेल्या एखाद्या झाडाच्या फुलाला आपला शेवट कुठे आणि कसा होईल?...हे सांगता येणारच नाही...किंबहुना ते ठरवता सुद्धा येणार नाही... देवाच्या पायाजवळ, एखाद्याच्या मृतदेहावर,  फुलण्याच्या अगोदरच तोडल्या जाईल, किंवा कुठेच उपयोग न होता झाडावरच उमलून गळून जाईल, एखाद्या वादळ-पावसाच्या तडाख्यामध्ये संपून जाईल किंवा उमलण्याच्या अगोदरच एखाद्या 'रोगराईने' संपून जाईल...  इतकी अनिश्चितता एका फुलाच्या आयुष्यामध्ये असेल तर मानवी जीवन त्यापेक्षा 'अधिकच' अनिश्चित असायला हवे आणि ते 'असतं' सुद्धा.. पण त्या इवल्याच्या फुलाकडून..शेवट कसाही, कधीही येऊ देत.. स्वतःचं स्वतःमध्ये उमलणं आणि बहरण हे तो शेवटच्या क्षणापर्यंत 'सोडत' नाही...  आपण सर्वांनी सुद्धा फुलांचा हा 'गुणधर्म' स्वीकाराला हरकत नाही.. शेवट कसाही, कधीही होऊ देत 'आज' मात्र स्वतःमध्ये स्वतः उमलून  बहरण 'विसरायचं' नाही.. 'भविष्याची' अजिबात चिंता न करता...आपलं स्वतःमध्ये आनंदाने 'उमलणे' हेच 'नैसर्गिक' मानवी जीवन होय...😊😊 have a wonderful day  to all of...