लहानपणापासून आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची 'भीती' (fear) दाखवण्यात येते...किंवा आपल्या मनामध्ये किंबहुना ती 'निर्माण' करण्याचा प्रयत्न आपल्या घरातील मंडळी किंवा आपल्या आजूबाजूचे लोक 'अनावधानाने' करीत राहतात.... अंधाराची भीती, कुणीतरी पकडून घेऊन जाईल, तू पडशील लागेल, तू ऐकले नाहीस तर तुला मार पडेल, खूप अभ्यास कर नाहीतर आयुष्य 'खडतर' आहे...अशा एक ना अनेक भीती सदैव आपला 'पाठलाग' करीत असतात...
पुढे मोठे झाल्यानंतर भीतीचे 'स्वरूप' बदलून वेगवेगळ्या प्रकारच्या भीती 'आपण' किंवा आपल्या आजूबाजूचे लोक तयार करीत असतात...चांगलं करिअर हवं, पाठीशी पैसा हवा, मोठ्या लोकांशी ओळखी मी आजारी पडेल का?, माझा अचानक एक्सीडेंट किंवा मृत्यू तर होणार नाही? या जगामध्ये माणसाने 'स्मार्ट' असावं, कुठल्या का मार्गाने होईना पण भरपूर यश, प्रसिद्धी व संपत्ती मिळवली पाहिजे...
यशाच्या आणि अपयशाच्या वेगवेगळ्या स्वरूपातल्या भीती 'सदैव' आपला पाठलाग करीत राहतात... माझ्या रिलेशनशिप मध्ये ब्रेकअप निर्माण होईल का? ती किंवा तो मला समजून घेईल का? त्याच्यासोबत खरोखरच मी माझं आयुष्य जगू शकतो का?..अशा अनेक वेगवेगळ्या प्रश्नांतून माणसं 'आयुष्यभर' सतत भीत राहतात.. आयुष्यामध्ये काही भीती 'स्वाभाविक' व 'नैसर्गिक' स्वरूपाची असते..व काही भीती 'मानवनिर्मित' असते..आजपासून मानवनिर्मित भीतीला मी 'बळी' न पडता माझ्या आयुष्यात असलेल्या नैसर्गिक व स्वाभाविक भीतीवर मात करण्याचा प्रयत्न करणार...
😊😊 have a wonderful day to all of you..
©️ *डॉ. जितेंद्र गांधी*
मानसिक आरोग्य कौन्सेलर
Mob-9420461580
Comments
Post a Comment