निसर्गामध्ये निर्माण झालेल्या एखाद्या झाडाच्या फुलाला आपला शेवट कुठे आणि कसा होईल?...हे सांगता येणारच नाही...किंबहुना ते ठरवता सुद्धा येणार नाही... देवाच्या पायाजवळ, एखाद्याच्या मृतदेहावर, फुलण्याच्या अगोदरच तोडल्या जाईल, किंवा कुठेच उपयोग न होता झाडावरच उमलून गळून जाईल, एखाद्या वादळ-पावसाच्या तडाख्यामध्ये संपून जाईल किंवा उमलण्याच्या अगोदरच एखाद्या 'रोगराईने' संपून जाईल...
इतकी अनिश्चितता एका फुलाच्या आयुष्यामध्ये असेल तर मानवी जीवन त्यापेक्षा 'अधिकच' अनिश्चित असायला हवे आणि ते 'असतं' सुद्धा.. पण त्या इवल्याच्या फुलाकडून..शेवट कसाही, कधीही येऊ देत.. स्वतःचं स्वतःमध्ये उमलणं आणि बहरण हे तो शेवटच्या क्षणापर्यंत 'सोडत' नाही...
आपण सर्वांनी सुद्धा फुलांचा हा 'गुणधर्म' स्वीकाराला हरकत नाही.. शेवट कसाही, कधीही होऊ देत 'आज' मात्र स्वतःमध्ये स्वतः उमलून बहरण 'विसरायचं' नाही.. 'भविष्याची' अजिबात चिंता न करता...आपलं स्वतःमध्ये आनंदाने 'उमलणे' हेच 'नैसर्गिक' मानवी जीवन होय...😊😊 have a wonderful day to all of you..
*डॉ. जितेंद्र गांधी*
मानसिक आरोग्य कौन्सेलर
Mob-9420461580
Comments
Post a Comment