एखाद्या खोलीमध्ये दोन दिवसापासून किंवा दोन महिन्यापासून कायमस्वरूपी 'अंधार' असेल आणि जर त्या अंधाराला 'दूर' करायचे असेल...तर त्या ठिकाणी अंधारातून प्रकाशाकडे जाण्यासाठी पुढच्या दोन महिने प्रकाशाची वाट बघावी लागणार नाही...ज्या क्षणी त्या खोलीमध्ये प्रकाशाचा एक 'किरण' दाखल होईल त्याच वेळेस त्या खोली मधला 'संपूर्ण' अंधार नाहीसा होईल...
आता खोलीतला तो अंधार दोन दिवसांचा आहे की... दोन महिन्यांचा...की दोन वर्षांचा त्याच्याशी त्या किरणाचा काहीही संबंध नाही...एक प्रकाशाचा किरण त्या अंधाराला दूर करण्यासाठी 'पुरेसा' ठरेल... हाच नियम आपल्याला पण लागू आहेत आपल्या आयुष्यामध्ये आपण किती दिवसांपासून...किती महिन्यांपासून...किती वर्षांपासून नकारात्मक विचाराच्या अंधारात जगत असलो तरी त्या नकारात्मक विचारांच्या अंधाराला नाहीसे करायचे असेल तर सकारात्मक विचारांचा एक किरण त्या संपूर्ण नकारात्मक विचारांना नष्ट करण्यास 'पुरेसा' ठरेल...
आज पासून मी माझ्या दैनंदिन आयुष्यामध्ये किमान एक तरी सकारात्मक विचाराचा किरण माझ्या मनामध्ये निर्माण करण्यास 'प्रयत्नशील' असेल... आणि हाच तुम्ही स्वतः 'निर्माण' केलेला सकारात्मक विचारांचा एक किरण...वर्षानुवर्ष आपण निर्माण केलेल्या नकारात्मक अंधाराला 'कायमस्वरूपी' दूर केल्याशिवाय राहणार नाही... तर मग तयार आहात का? आज दिवसभरामध्ये सकारात्मक विचाराचा एक 'किरण' स्वतःसाठी...स्वतःमध्ये निर्माण करण्यासाठी....
😊😊 have a wonderful day to all of you..
©️ *डॉ. जितेंद्र गांधी*
मानसिक आरोग्य कौन्सेलर
Mob-9420461580
Comments
Post a Comment