मानवी आयुष्यातील कष्ट कमी व्हावेत म्हणून मानवाने आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर मशीन्स व विविध यंत्रे तयार केलीत... निर्माण केलेल्या मशीन्स व यंत्रे इतक्या 'बुद्धिमान' होऊ लागल्यात की आता 'कृत्रिम' बुद्धिमत्तेमुळे मानवांना त्या सहज हाताळू शकतात व आवश्यकतेनुसार सूचना पण देऊ शकतात.. एक वेळ अशी येईल की सर्व माणसे अगदी 'तंतोतंत' मशीन व यंत्राप्रमाणे काम करायला लागतील... व आपणच निर्माण केलेले मशीन्स व यंत्रे आपल्यालाच मानवी संवेदना, प्रेम, काळजी, आपुलकी, स्नेह, जिव्हाळा, मैत्री, विश्वास, सुखदुःखाच्या अनुभूती या सर्वांचं 'महत्त्व' पटवून सांगतील... कित्येक दशानंतर माणसांनी यंत्रे तयार केलीत...की यंत्रांनी माणसं हा मात्र वादविवादाचा मोठा विषय ठरेल... हे जर खरंच थांबवण्याची माणसाला इच्छा असेल ..तर त्याने आपल्या आजूबाजूच्या माणसांना खरंच आपण 'यंत्रा' सारखं वापरतोय का?.. याचा विचार करायला हरकत नाही...😊😊 have a wonderful day to all of you.. ©️ डॉ. जितेंद्र गांधी मानसिक आरोग्य कौन्सिलर मनोसंतुलन उपक्रम
विवाह संस्थेचे दिवसेंदिवस विघटित होणारे स्वरूप व एकीकडे ती टिकून राहावी यासाठी आपली सर्वांची धडपड आपण रोजच अनुभवत असतो. मानवी गरजांची पूर्तता एवढेच कुटुंब संस्थेचे कार्य नसून मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून कुटुंब संस्थेचे कार्य अतिशय महत्त्वाचे मानले गेले आहे. स्वाभाविक व नैसर्गिक तत्वावर आधारित असणाऱ्या अशा कुटुंब संस्थेचे महत्त्वाचे घटक म्हणजे पती व पत्नी यांच्यामधील दिवसेंदिवस गुंते वाढताना दिसत आहे. पती-पत्नी मध्ये व्यक्तिगत व कौटुंबिक पातळीवर निर्माण झालेले गुंते यांना बरेच घटक जबाबदार असले तरी त्या सर्वांमध्ये मानसशास्त्रीय घटक सर्वात महत्त्वाचा ठरत असतो. मुळातच स्त्री आणि पुरुष फक्त लिंगभेद या बाबतीतच विभिन्न असून त्या दोघांचे भावनिक (emotional),मानसिक (psychological) व्यक्तिमत्व परत्वे (personality pattern), वर्तनात्मक (behavioral), दृष्टिकोण (attitude and perception) व मानसिक मान्यता (psychological belief system) या सर्व बाबतीत भिन्नता ...