विवाह संस्थेचे दिवसेंदिवस विघटित होणारे स्वरूप व एकीकडे ती टिकून राहावी यासाठी आपली सर्वांची धडपड आपण रोजच अनुभवत असतो. मानवी गरजांची पूर्तता एवढेच कुटुंब संस्थेचे कार्य नसून मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून कुटुंब संस्थेचे कार्य अतिशय महत्त्वाचे मानले गेले आहे. स्वाभाविक व नैसर्गिक तत्वावर आधारित असणाऱ्या अशा कुटुंब संस्थेचे महत्त्वाचे घटक म्हणजे पती व पत्नी यांच्यामधील दिवसेंदिवस गुंते वाढताना दिसत आहे. पती-पत्नी मध्ये व्यक्तिगत व कौटुंबिक पातळीवर निर्माण झालेले गुंते यांना बरेच घटक जबाबदार असले तरी त्या सर्वांमध्ये मानसशास्त्रीय घटक सर्वात महत्त्वाचा ठरत असतो.
बारा वर्षीय अनिकेत (नाव बदललेले आहे) समुपदेशनासाठी त्याच्या शाळेमार्फत पाठविण्यात आला होता... शाळेमार्फत पाठविल्यामुळे त्याचे आई-वडील सुद्धा वेळ काढून त्याच्यासोबत उपस्थित होते... साधारणतः वर्गातील हुशार विद्यार्थ्यांपैकी एक असणारा अनिकेत गेल्या दोन वर्षापासून एका वेगळ्याच "जगात" वावरत असल्याचे त्याच्या शिक्षकांना जाणवले... गेल्या दोन वर्षापासून अभ्यासामध्ये टप्प्याटप्प्याने तो मागे पडत होता... शिकवताना वर्गात लक्ष न देणे, वर्ग शिक्षकांचे न ऐकणे, खिडकीतून सतत बाहेर बघत राहणे, इतरांशी हिंसक पद्धतीने वागणे, इतर मुलांना शिवीगाळ करणे,आपल्या ड्रेस व शालेय साहित्याची योग्य निगा न राखणे, चिडचिड करणे, वर्गात झोपणे, इतर विद्यार्थ्यांच्या खोड्या काढणे, दिलेला गृहपाठ पूर्ण न करणे अशा अनेक कारणामुळे शिक्षकांना त्याला मानसशास्त्रीय मदतीची गरज असल्याचे ओळखून समुपदेशनासाठी पाठविले होते... शाळेतील या सर्व बाबतीची पुसटशी कल्पना आई-वडिलांना होती...पण वयानुरूप हे सर्व व्यवस्थित होईल असे त्यांना वाटत होते...अचानक उद्भवलेल्या या प्रसंगामुळे ती दोघेही घाबरलेली व अस्वस्थ होती... समुपदेशन प्रक्...
Comments
Post a Comment