विवेकवाद आधारित मानसशास्त्रीय उपचार प्रक्रिया (REBT)ही
जगभरामध्ये मानसिक प्रश्नांवर मोठ्या प्रमाणात उपचार करणारी
मानसशास्त्रीय उपचार प्रणाली असून सौम्य प्रकारच्या मानसिक आजारावर अतिशय
प्रभावी ठरते. भीती (fobia), न्यूनगंड (inferiority complex), नैराश्य
(depression), ताणतणाव (stress), नातेसंबंध तणाव (relationship problem) व
चिंता (anxiety) अशा अनेक मानसिक समस्यावर REBT खूप उपयोगी ठरते.
अमेरिकन
मानसशास्त्रज्ञ अल्बर्ट एलिस यांनी या थेरपीचा शोध लावला असून सर्वसामान्य
लोकांना या उपयुक्त असणाऱ्या मानसशास्त्रीय उपचार प्रणाली ची माहिती व्हावी
यासाठी हा लेख प्रपंच. उपचारादरम्यान खालील बऱ्याच मुद्द्यांवर समुपदेशक
(mental health counselor) व मानसिक प्रश्नांनी ग्रस्त असलेल्या
व्यक्तींमध्ये दीर्घकालीन चर्चा घडून येते व व्यक्तीच्या सध्याच्या मानसिक
स्थिती मध्ये भावनिकदृष्ट्या (emotional), वैचारिकदृष्ट्या (cognitive) व
कृतीयुक्त (behavioral) बदल घडवून आणण्याचा प्रयत्न केला जातो. मुळातच ही
उपचार प्रक्रिया टप्प्याटप्प्याने घडून येणारी असून त्यातील पहिला स्व-
विश्लेषणाचा टप्पा आपल्याशी शेअर करीत आहे.
सत्र क्रमांक-१ (स्व विश्लेषण)
(1)
माझ्या मानसिक मान्यता (my beliefs) मी तपासून घेतलेल्या आहेत.
(2) माझा
दृष्टिकोन (my views) मी तपासून घेतलेला आहे.
(3) माझा आयुष्याबद्दलचा व स्वतःबद्दलचा पूर्वानुभव (past experiwnce)
त्रासदायक आहे.
(4)
माझ्यातील अतार्किक मानसिक मान्यता (illogical beliefs) मला त्रासदायक ठरत
आहे. (5) दुसऱ्यांना माझ्या अपयशाचे दोष देणे
माझ्या विचारसरणीचा महत्त्वाचा भाग बनलेला आहे.
(6) माझ्या आजूबाजूला घडणाऱ्या घटनांचे विश्लेषण नकारात्मक पद्धतीने माझ्याकडून होत आहे.
(7)
दुसऱ्या लोकांकडून मिळालेल्या वागणुकीमुळे माझी निराश होण्याची प्रवृत्ती
दिवसेंदिवस वाढत आहे.
(8) प्रत्येक प्रयत्नांमध्ये मला शंभर
टक्के यश मिळालेच पाहिजे असे मला वाटते.
(9) माझ्या आयुष्यातील
अडचणीमुळे मी मागे पडलोय व पडतोय असे मला वाटत राहते.
(10) माझा आनंद दुसऱ्या बऱ्याच गोष्टींवर अवलंबून आहे.
(11) माझा आनंद मी स्वतः निर्माण करू शकत नाही.
(12)
दुसर्यांकडुन मान्यता मिळणे (recognition) मला महत्त्वाचे वाटते.
(13) मला बऱ्याच गोष्टींचा पश्चाताप आहे.
(14) बऱ्याच गोष्टींमध्ये मी निराशा अनुभवलेली आहे.
(15)
माझे भूतकाळातील अनुभव अतिशय त्रासदायक आहेत.
(16) मी
माझे भूतकाळ बदलू शकत नाही व विसरू पण शकत नाही.
(17)
मी स्वतःच्या विचार प्रणालीमुळे बराच त्रस्त झालेला/ झालेली आहे.
(18) मला माझी विचारणारी बदलणे गरजेची वाटत आहे.
(19) मला एक नवीन विचारसरणी निर्माण करण्याची गरज आहे.
(20) मी स्वतः माझ्या विचारांमध्ये सकारात्मक व गरजेचे बदल घडवून आणण्यासाठी मला मानसशास्त्रीय मदतीची गरज आहे.
सुरुवातीला
मानसिक रूग्णांवर वापरण्यात येणारी ही थेरपी कालांतराने सर्वसामान्य
नागरिकांसाठी सुद्धा उपयोगात येत गेली. या थेरपीच्या वापरामुळे व
उपयोगामुळे व्यक्तीचे मानसिक आरोग्य सुधारण्यास खूप मोठी मदत होते हे
संशोधनाअंती सुद्धा मान्य झालेले आहे. आणि म्हणूनच मानसिक सुदृढतेसाठी REBT
प्रशिक्षण घेणे काळाची गरज आहे...
©️ डॉ. जितेंद्र गांधी
मानसिक आरोग्य समुपदेशन व पुनर्वसन विषयतज्ञ
9420461580
Comments
Post a Comment