मानवी आयुष्यातील कष्ट कमी व्हावेत म्हणून मानवाने आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर मशीन्स व विविध यंत्रे तयार केलीत... निर्माण केलेल्या मशीन्स व यंत्रे इतक्या 'बुद्धिमान' होऊ लागल्यात की आता 'कृत्रिम' बुद्धिमत्तेमुळे मानवांना त्या सहज हाताळू शकतात व आवश्यकतेनुसार सूचना पण देऊ शकतात.. एक वेळ अशी येईल की सर्व माणसे अगदी 'तंतोतंत' मशीन व यंत्राप्रमाणे काम करायला लागतील... व आपणच निर्माण केलेले मशीन्स व यंत्रे आपल्यालाच मानवी संवेदना, प्रेम, काळजी, आपुलकी, स्नेह, जिव्हाळा, मैत्री, विश्वास, सुखदुःखाच्या अनुभूती या सर्वांचं 'महत्त्व' पटवून सांगतील... कित्येक दशानंतर माणसांनी यंत्रे तयार केलीत...की यंत्रांनी माणसं हा मात्र वादविवादाचा मोठा विषय ठरेल... हे जर खरंच थांबवण्याची माणसाला इच्छा असेल ..तर त्याने आपल्या आजूबाजूच्या माणसांना खरंच आपण 'यंत्रा' सारखं वापरतोय का?.. याचा विचार करायला हरकत नाही...😊😊 have a wonderful day to all of you.. ©️ डॉ. जितेंद्र गांधी मानसिक आरोग्य कौन्सिलर मनोसंतुलन उपक्रम
बालपणीचा काळ व्यक्तीच्या जडणघडणीतील सुवर्णकाळ असतो.याच काळात व्यक्तीची शारीरिक, मानसिक, बौद्धिक व सामाजिक वाढ व विकासाचे मोठे टप्पे तो पार करीत असतो. पालक म्हणून सुद्धा आपला मुलगा किंवा मुलगी उत्तमरित्या घडावा याची मनोमन इच्छा व उपायोजना आपण सर्वच पालक करीत असतो.भविष्यात येणाऱ्या स्पर्धेचे स्वरूप बघता आपल्या मुलांना आत्तापासूनच तयार करण्याकडे आपला कल असतो व त्या संदर्भातल्या सर्व उपायोजना व त्याची अंमलबजावणी आपण करीत असतो.परंतु गेल्या काही काळापासून पाल्य, पालकत्व व एकूणच शिक्षण व्यवस्था याबाबत गंभीर प्रश्न समोर येताना दिसतात आणि त्याची मुळे शोधणे गरजेचे वाटतात. हल्लीच्या पालकत्वाची संकल्पना पूर्णपणे पाश्चिमात्य देशाच्या विचारसरणीवर आधारित होताना दिसत आहे. मुलाच्या/ पाल्याच्या जन्माबरोबरच त्याची शाळा, शिक्षणाचे माध्यम, ट्युशन क्लास, स्पोर्ट क्लास, हॉबी क्लास या सर्व बाबतीतची उपलब्धता करून देण्याची व तो संपूर्ण कार्यक्रम राबवण्याची पालकांमध्ये शर्यतच असलेली लक्षात येत आहे.पालक म्हणून आजूबाजूला उपलब्ध असलेले "बेस्ट पॅकेज" देऊन आप...