Skip to main content

आजूबाजूच्या माणसांना खरंच आपण 'यंत्रा' सारखं वापरतोय का?..

 मानवी आयुष्यातील कष्ट कमी व्हावेत म्हणून मानवाने आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर मशीन्स व विविध यंत्रे तयार केलीत... निर्माण केलेल्या मशीन्स व यंत्रे इतक्या 'बुद्धिमान' होऊ लागल्यात की आता 'कृत्रिम' बुद्धिमत्तेमुळे मानवांना त्या सहज हाताळू शकतात व आवश्यकतेनुसार सूचना पण देऊ शकतात.. एक वेळ अशी येईल की सर्व माणसे अगदी 'तंतोतंत' मशीन व यंत्राप्रमाणे काम करायला लागतील... व आपणच निर्माण केलेले मशीन्स व यंत्रे आपल्यालाच मानवी संवेदना, प्रेम, काळजी, आपुलकी, स्नेह, जिव्हाळा, मैत्री, विश्वास, सुखदुःखाच्या अनुभूती या सर्वांचं 'महत्त्व' पटवून सांगतील... कित्येक दशानंतर माणसांनी यंत्रे तयार केलीत...की यंत्रांनी माणसं हा मात्र वादविवादाचा मोठा विषय ठरेल... हे जर खरंच थांबवण्याची माणसाला इच्छा असेल ..तर त्याने आपल्या आजूबाजूच्या माणसांना खरंच आपण 'यंत्रा' सारखं वापरतोय का?.. याचा विचार करायला हरकत नाही...😊😊 have a wonderful day  to all of you.. ©️ डॉ. जितेंद्र गांधी मानसिक आरोग्य कौन्सिलर मनोसंतुलन उपक्रम

आपुलाची वाद आपणाशी....

 तुकाराम महाराजांच्या एका अभंगांमध्ये असलेली ही पंक्ती  आपल्या आजच्या मानसिक अवस्थेला अगदी तंतोतंत प्रतिबिंबित करते. एकीकडे चूक की बरोबर, नीती की अनीती,  धर्म की अधर्म, पर्सनल की प्रोफेशनल, करियर की कुटुंब, बंधने की स्वातंत्र्य, संपत्ती की नैतिकता, पदप्रतिष्ठा की समाधान, वाद की सामोपचार, पैसा कि ज्ञानसाधना व कर्तव्य  की संधी अशा एक ना अनेक वादामध्ये आपण स्वतःला रोज अनुभवतो.


अशा सर्व वादांना सामोरे जाणारा आपला एकमेव जोडीदार म्हणजे आपलं मन (मेंदू)  निर्माण झालेल्या दैनंदिन वादामुळे थकतो, घाबरतो, चिंतातूर होतो, सैरावैरा होतो, बेचैन होतो, अस्वस्थ होतो व पर्यायाने आपले मानसिक संतुलन गमावून बसतो.

आणि म्हणूनच अश्या परिस्थितीमध्ये गरज असते योग्य त्या संवाद रुपी समुपदेशनाची ज्यामुळे मन (मेंदु) आपल्या भूमिका, परिस्थिती व निर्णय प्रक्रियेमध्ये स्थिर राहून मानसिक गुंते निर्माण होऊ देत नाही व कायम वादांमध्ये न अडकता संवादाच्या प्रक्रियेमध्ये सामील होतो. आयुष्यामध्ये निर्माण होणाऱ्या वादांना सामोरे जाण्यासाठी व मानसिक आरोग्य संवर्धनासाठी संवादही महत्त्वाचा असतो आणि म्हणूनच  संवादाच्या प्रक्रियेमध्ये  मदत हवी असल्यास  संपर्क साधू शकता...

©️ डॉ. जितेंद्र गांधी
मानसिक आरोग्य  समुपदेशन  व पुनर्वसन विषयतज्ञ
9420461580

Comments