आपल्या घरातील प्रेशर कुकर हा आपल्या सर्वांच्याच आयुष्याचा अविभाज्य घटक असला पाहिजे.कमी वेळात, ऊर्जेत व श्रमात काम करणारा. ठराविक वेळेत उच्च तापमान तयार करणारा व वेळोवेळी शिट्टी (whistle) देऊन आपल्या अंतर्गत तापमानाची अचूक माहिती देणारे त्याचं शास्त्र खूपच महत्त्वाचं आहे. मला हा प्रेशर कुकर आपलाच प्रतिबिंब वाटतो. अगदी त्याच्याच प्रमाणे कमी वेळात, ऊर्जेत व श्रमात अधिकाधिक कार्यक्षम बनणे हेच आपल्या जीवनाचे ध्येय झालेले आहे. प्रेशर कुकर प्रमाणेच आपण सुद्धा रोज वेगवेगळ्या ताण-तणावांना समोरे जात असतो व वेळोवेळी आपल्या मानसिक स्तरावर सुद्धा आपली खुप दमछाक होत असते.
मानसिक स्थरावर वाढलेला ताण तणाव, रोजची घालमेल, मनाची अस्वस्थता व नातेसंबंधातील दमछाक अशा वेगवेगळ्या मानसिक अग्निपरीक्षेतून जात असतांना आपल्यालापण मानसिक स्तरावर मनाच्या असमतोलाची सिम्प्टम्स (लक्षणे) जाणवायला सुरुवात होते. ही लक्षणे म्हणजे मानसिक आरोग्य स्तरावरच्या अंतर्गत ताण-तणावाच्या सूचना देणाऱ्या शिट्ट्याच असतात त्या! पण आपण चक्क त्याकडे दुर्लक्ष करीत असतो. त्याचाच परिणाम म्हणून आपण आपले मानसिक आरोग्य व त्याचे संतुलन गमावून बसतो.
याचाच अर्थ म्हणजे प्रेशर कुकर च्या आयुष्यातील उच्च तापमान असो वा आपल्या आयुष्यातील मानसिक स्तरावरचे ताणतणाव याचे योग्य नियोजन करणे क्रमप्राप्त आहे. आणि म्हणूनच इतर कामांमध्ये गुंतलो असलो तरी आपण कुकरच्या शिट्टी कडे लक्ष देऊन असतो त्याचप्रमाणे आपण सुद्धा वैयक्तिक स्तरावर इतर कामामध्ये गुरफटून गेलो असलो तरी सुद्धा आपण आपल्या मानसिक स्तरावरच्या ताणतणावाच्या शिट्टी कडे लक्ष ठेवणे बंधनकारक आहे.
जेव्हा आपले ताणतणाव अपेक्षेपेक्षा जास्त वाढू लागल्यास किंवा त्याचे नियोजन करण्यास असमर्थता येत असल्यास तात्पुरत्या स्वरूपात का होईना मानसशास्त्रीय मदत घेणे खूप फायद्याचे ठरेल. आणि म्हणूनच प्रेशर कुकर प्रमाणेच आपल्या अंतर्गत ताणतणावाचे नियोजन केल्यास ह्या दोन्ही शिट्ट्या आनंदायक ठरतील यात दुमत नाही...
Nice Article Sir
ReplyDeleteतनावा मुळे मानसिक वर्तनात होणारे बदल हे वेळीच समजले नाही तर .......
आयुष्याची शिट्टी वाजली च म्हणून समजा.....