Skip to main content

Posts

Showing posts from February, 2020

आजूबाजूच्या माणसांना खरंच आपण 'यंत्रा' सारखं वापरतोय का?..

 मानवी आयुष्यातील कष्ट कमी व्हावेत म्हणून मानवाने आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर मशीन्स व विविध यंत्रे तयार केलीत... निर्माण केलेल्या मशीन्स व यंत्रे इतक्या 'बुद्धिमान' होऊ लागल्यात की आता 'कृत्रिम' बुद्धिमत्तेमुळे मानवांना त्या सहज हाताळू शकतात व आवश्यकतेनुसार सूचना पण देऊ शकतात.. एक वेळ अशी येईल की सर्व माणसे अगदी 'तंतोतंत' मशीन व यंत्राप्रमाणे काम करायला लागतील... व आपणच निर्माण केलेले मशीन्स व यंत्रे आपल्यालाच मानवी संवेदना, प्रेम, काळजी, आपुलकी, स्नेह, जिव्हाळा, मैत्री, विश्वास, सुखदुःखाच्या अनुभूती या सर्वांचं 'महत्त्व' पटवून सांगतील... कित्येक दशानंतर माणसांनी यंत्रे तयार केलीत...की यंत्रांनी माणसं हा मात्र वादविवादाचा मोठा विषय ठरेल... हे जर खरंच थांबवण्याची माणसाला इच्छा असेल ..तर त्याने आपल्या आजूबाजूच्या माणसांना खरंच आपण 'यंत्रा' सारखं वापरतोय का?.. याचा विचार करायला हरकत नाही...😊😊 have a wonderful day  to all of you.. ©️ डॉ. जितेंद्र गांधी मानसिक आरोग्य कौन्सिलर मनोसंतुलन उपक्रम

इंडिया इज मोस्ट डीपरेस्ड (depressed) कंट्री इन द वर्ल्ड...

जागतिक आरोग्य संस्थेच्या नुकताच प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार भारत हा जगातील सर्वाधिक डिप्रेशन ग्रस्त रुग्णांचा देश म्हणून समोर आलेला आहे.... जगाला थक्क करून सोडणाऱ्या ह्या सर्वेक्षणा कडे आपले सर्वांचेच दुर्लक्ष असल्याचे स्पष्टपणे दिसत असताना.... डिप्रेशनला वेळीच प्रतिबंध, उपचार व पुनर्वसन न केल्यास आपणही डिप्रेशनला आमंत्रण दिल्यासारखेच होईल....    आपल्या घरामध्ये जवळपास कोणीही डिप्रेशनने ग्रस्त असल्यास सार्वजनिक मानसिक आरोग्य केंद्रात डिप्रेशनची औषध उपचार पूर्णपणे मोफत उपलब्ध आहेत गरज आहे योग्य ती मार्गदर्शनाची.... वेळीच उपचार घेतल्यास रुग्ण सर्वसामान्य आयुष्य जगू शकतो आणि म्हणूनच त्यासाठीच हा लेख प्रपंच...... डिप्रेशनची मुख्य लक्षणे पुढील प्रमाणे आहेत  (१) दिर्घकालीन दुःखि असल्याची जाणीव होत राहणे  (२) अगोदर ज्या गोष्टींमध्ये आनंद वाटायचा आता त्या गोष्टीमध्ये मन न रमणे  (3) आत्मविश्वास झपाट्याने कमी होणे  (४) मनात नेहमी अपराधीपणाची भावना येत राहतणे  (५) मानसिकदृष्ट्या आतुन पूर्णपने पोखरले गेल्याची भावना येणे  (६) स्वतःहा निरुपयो...

आयडेंटिटी क्रायसिस: एक सुवर्णसंधी.....

मानसशास्त्रातील आयडेंटिटी क्रायसिस (Identity Crisis) संकल्पना माझ्यासाठी नेहमीच कुतूहलाचा विषय राहिलेला आहे..... एरिक एरिक्सन या मानसशास्त्रज्ञाने मिडलाइफ क्रायसिस नावाच्या संकल्पनेला जगासमोर आणले आणि तेव्हापासूनच जगभरात या विषयावर सतत चर्चा ,संशोधन व प्रशिक्षण सुरू आहे.... व्यक्तीला परिपक्वतेकडे जाताना बऱ्याच प्रश्नांची उत्तरे शोधावी लागतात... आणि गंमत म्हणजे हा प्रवास एकट्याला करावा लागतो... आपल्याला अवगत असलेले स्वतःबद्दलचे बहुतांशी ज्ञान व आजूबाजूला उपलब्ध असलेली परिस्थिती यामध्ये नेहमीच तफावत असते.... सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास स्वप्न आणि आणि वास्तव यात जेवढा फरक असतो तेवढाच........    आयडेंटिटी क्रायसिस अजूनच सोपी भाषेत समजून सांगायचे झाल्यास आपली स्वतःची जडणघडण व आपल्या आजूबाजूची असलेली कौटुंबिक, सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, बौद्धिक, व्यवसायिक वा वैयक्तिक प्राप्त परिस्थितीमध्ये असलेला द्वंद होय.... आयडेंटिटी क्रायसिस च्या दरम्यान व्यक्तीला खूप सारे प्रश्न निर्माण होतात किंबहुना असे प्रश्न तो स्वतः निर्माण करीत असतो ....    आयुष्यात निर्माण होणा...

रेडीमेड पालकत्व......

बालपणीचा काळ व्यक्तीच्या जडणघडणीतील सुवर्णकाळ असतो... याच काळात व्यक्तीची शारीरिक, मानसिक, बौद्धिक व सामाजिक वाढ व विकासाचे मोठे टप्पे तो पार करीत असतो.... पालक म्हणून सुद्धा आपला मुलगा किंवा मुलगी उत्तमरित्या घडावा याची मनोमन इच्छा व उपायोजना आपण सर्वच पालक करीत असतो.... भविष्यात येणाऱ्या स्पर्धेचे स्वरूप बघता आपल्या मुलांना आत्तापासूनच तयार करण्याकडे आपला कल असतो व त्या संदर्भातल्या सर्व उपायोजना व त्याची अंमलबजावणी आपण करीत असतो.... परंतु गेल्या काही काळापासून पाल्य, पालकत्व व एकूणच शिक्षण व्यवस्था याबाबत गंभीर प्रश्न समोर येताना दिसतात आणि त्याची मुळे शोधणे गरजेचे वाटतात...हल्लीच्या पालकत्वाची संकल्पना पूर्णपणे पाश्चिमात्य देशाच्या विचारसरणीवर आधारित होताना दिसत आहे.... मुलाच्या/ पाल्याच्या जन्माबरोबरच त्याची शाळा, शिक्षणाचे माध्यम, ट्युशन क्लास, स्पोर्ट क्लास, हॉबी क्लास या सर्व बाबतीतची उपलब्धता करून देण्याची व तो संपूर्ण कार्यक्रम राबवण्याची पालकांमध्ये शर्यतच असलेली लक्षात येत आहे.... पालक म्हणून आजूबाजूला उपलब्ध असलेले "बेस्ट पॅकेज" देऊन आपण ...

Obsessive compulsive Disorder

गरज कम्प्रेहेंसिव मेंटल हेल्थ सर्विसेसची (Need for comprehensive Mental Health Services)

10 ऑक्टोबर ....जागतिक मानसिक आरोग्य दिन... आजच्या दिवशी जागतिक स्तरावर मानसिक आरोग्य संदर्भातील निदान, उपचार, पुनर्वसन व जनजागृतीसाठी मोठ्या प्रमाणात वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले जातील... यावर्षी प्रेवेंशन ऑफ सुसाईड ही थीम जागतिक मानसिक आरोग्य संघटने कडून नुकतीच जाहीर करण्यात आलेली आहे... भारताच्या संदर्भात बोलायचे झाल्यास डिप्रेशन आणि सुसाईड याबाबतीत भारताने जागतिक अग्रक्रम राखलेला आहे.... मानसिक अनारोग्याच्या उच्चतम धोक्याच्या पातळीवर असणाऱ्या आपल्या देशाला, समाजाला व प र्यायाने आरोग्य प्रशासनाला याबाबतचे गांभीर्य नसावे ही शोकांतिकेची बाब आहे.... साधारण प्रत्येक 40 सेकंदांमध्ये कोणीतरी सुईसाईड (आत्महत्या) केल्याचे समोर येत आहे....  मानसिक आजार हे जितके जैविक (biological) असतात....त्यापेक्षा कित्येक पटीने ते मानसिक (psychological), प्रासंगिक (situational), आजूबाजूच्या वातावरणातून (surroundings) , व्यक्तिमत्त्वाच्या जडणघडणीतुन (personality factors) व भावनिक (emotional) प्रश्नांमुळे सुद्धा निर्माण होत असतात... उपलब्ध असलेल्या मानसिक आरोग्य उपचार प्रामुख्याने औषधोपचार (रासाय...

आनंदाची फॅक्टरी.... (Real source of Happiness)

माहिती, तंत्रज्ञान व आधुनिकतेचे वारे जोरदार वाहत असताना पुन्हा नव्याने किंबहुना अधिक जागरूकतेने सर्वाधिक गांभीर्याने चर्चा होत असेल तर ती बाब म्हणजे "आनंद" (happiness) होय.... जागतिक स्तरावर भौतिक सुविधांची रेलचेल असताना व त्या मनसोक्त उपभोक्ताना परत आनंदासाठी जगभर चर्चा होणे हे विशेष कौतुकाचे आहे.... मानसशास्त्रीय दृष्ट्या आनंद आणि आजूबाजूला असलेली परिस्थिती (environment) हा महत्त्वाचा घटक असला तरी तो एक मात्र निर्धारक घटक नसतो....आनंद निर्मितीची प्रक्रियाच मुळात नैसर्गिक असून ती कृत्रिमरीत्या तयार करता येणार नसल्याचे शहाणपण आपल्या सर्वांना होत आहे.....    जागतिक अर्थव्यवस्थेने आनंदाचे रूपांतरण अर्थकारणात केल्याचे स्पष्टपणे जाणवत असले तरी... मात्र त्याचे अंध अनुकरण आपण सर्वच करीत आलेलो आहोत.... आनंदाची निर्मिती बहिर्गत (external) नसून अंतर्गत (internal) असल्यामुळे ... ही अंतर्गत मानसशास्त्रीय प्रक्रिया आपण सर्वांनी शिकून आत्मसात करावी लागेल... आनंदाची निर्मिती ही उपजत व नैसर्गिक असल्यामुळे त्याला कुठल्याही उद्दीपकाची (stimulation) गरज नाही...    निसर्गाने वेगवेगळ्...

Obsessive Compulsive Disorder (OCD)

कुछ तो लोग कहेंगे......

कुछ तो लोग कहेंगे...... बालपणापासून आपण सर्वांनाच लिखित वा अलिखित बरेच सामाजिक संकेत (social norms) शिकवल्या जातात व ते पूर्ण करण्याची सक्ती आपण सर्वजण अनुभवत असतो...... सामाजिक संकेत हे सामाजिकीकरण्याच्या (socialization) प्रक्रियेमध्ये गरजेचे असले तरी त्याचा अवास्तव व अतिरेक वापर मानसिक त्रासदायक असू शकतो... पाळले जाणारे सामाजिक संकेत हे व्यक्तिमत्व विकासासाठी गरजेचे असले तरी बरेच सामाजिक संकेत हे दुजाभाव निर्माण करणारे, आत्मविश्वास कमी करणारे, बोचरे व विदारक पण असतात... पण सामाजिक संस्थेचा एक भाग म्हणून व्यक्ती, कुटुंब व पर्यायाने संपूर्ण समाज हे पाळत राहण्यामध्ये धन्यता मानीत असतो.... हे संकेत घरामध्ये, नातेवाईकांमध्ये, ऑफिसमध्ये व सामाजिक जीवनात सर्रास पाळल्या जातात व ते मोडल्यास होणार्‍या अग्निपरीक्षेस व्यक्ती वा कुटुंबाला सामोरे जाणे क्रमप्राप्त ठरते.......    आपण कसे रहावे...काय बोलावे... काय बोलू नये... काय खावे काय खाऊ नये... कुठले कपडे घालावे... कोणाशी बोलावे कोणाशी बोलू नये...कसे वागावे...कसे वागू नये.. मुलाने कसे वागावे व मुलींनी कसे वागावे या संदर्भातले बरेच ठोकता...

इंडिया इज मोस्ट डीपरेस्ड (depressed) कंट्री इन द वर्ल्ड.... (India is most Depressed country in the world)

इंडिया इज मोस्ट डीपरेस्ड (depressed) कंट्री इन द वर्ल्ड.... जागतिक आरोग्य संस्थेच्या नुकताच प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार भारत हा जगातील सर्वाधिक डिप्रेशन ग्रस्त रुग्णांचा देश म्हणून समोर आलेला आहे.... जगाला थक्क करून सोडणाऱ्या ह्या सर्वेक्षणा कडे आपले सर्वांचेच दुर्लक्ष असल्याचे स्पष्टपणे दिसत असताना.... डिप्रेशनला वेळीच प्रतिबंध, उपचार व पुनर्वसन न केल्यास आपणही डिप्रेशनला आमंत्रण दिल्यासारखेच होईल.... आपल्या घरामध्ये जवळपास कोणीही डिप्रेशनने ग्रस्त असल्यास सार्वजनिक मानसिक आरोग्य केंद्रात डिप्रेशनची औषध उपचार पूर्णपणे मोफत उपलब्ध आहेत गरज आहे योग्य ती मार्गदर्शनाची.... वेळीच उपचार घेतल्यास रुग्ण सर्वसामान्य आयुष्य जगू शकतो आणि म्हणूनच त्यासाठीच हा लेख प्रपंच......    डिप्रेशनची मुख्य लक्षणे पुढील प्रमाणे आहेत  (१) दिर्घकालीन दुःखि असल्याची जाणीव होत राहणे  (२) अगोदर ज्या गोष्टींमध्ये आनंद वाटायचा आता त्या गोष्टीमध्ये मन न रमणे  (3) आत्मविश्वास झपाट्याने कमी होणे  (४) मनात नेहमी अपराधीपणाची भावना येत राहतणे  (५) मानसिकदृष्ट्या आतुन पूर्णपने पोखरले ग...

अंडरस्टॅंडिंग ऑफ कृष्णा : अ स्टेप टुवर्ड्स पॉझिटिव्ह मेंटल हेल्थ.. (Understanding of Krishna: A step towards Positive Mental Health))

अंडरस्टॅंडिंग ऑफ कृष्णा : अ स्टेप टुवर्ड्स पॉझिटिव्ह मेंटल हेल्थ......... तत्त्वज्ञानाने माणसाचे पोट भरत नाही हे खरे असले तरी उपाशीपोटी किंवा पोट भरल्यानंतर माणसाचं जीवन समृद्ध करण्यासाठी तत्वज्ञानची नितांत आवश्यकता असते....आणि म्हणूनच पर्यायाने तत्वज्ञान शिवाय माणूस जिवंत राहू शकेल पण समृद्ध राहणार नाही...... तत्वज्ञान भलेही भौतिक गरजांची पूर्तता करीत नसले तरी व्यक्ती, समाज व पर्यायाने राष्ट्राला मानसिक दृष्ट्या सदृढ करण्याचं काम नेहमी करत असतं.... जगात निर्माण झालेले बहुतां शी तत्वज्ञान हे मानवी उत्थानासाठी निर्माण झालेले असले तरी त्याचा उपयोग विध्वंसासाढी करायचा की विकासासाठी याची जबाबदारी तत्वज्ञान निर्माण करणाऱ्या पेक्षा ते पाळणाऱ्या अनुयायांची अधिक असते.... माणसाकडून निर्माण झालेले शास्त्र व सिद्धांत यालासुद्धा तत्वज्ञानाची जोड असायलाच हवी आणि म्हणूनच शास्त्र आणि तत्वज्ञान परस्पर पुरक असायला हवे.....    मानसशास्त्राच्या परस्परपूरक तत्वज्ञानाच्या बाबतीत बोलायचे झाल्यास कृष्णाने श्रीमद्भगवद्गीता मध्ये सांगितलेले तत्वज्ञान पॉझिटिव मेंटल हेल्थ च्या संदर्भात एक गाईडला...

Fight or Flight...choice is yours.....

Fight or Flight...choice is yours..... ताण-तणावा ने  वेढलेल्या मानवी आयुष्यात  केव्हा, कुठे, कधी आणि कुठल्या स्वरूपात ताण-तणाव निर्माण होईल हे सांगता येत नाही....आरोग्य, व्यवसाय, नातेसंबंध, कौटुंबिक वा व्यवसायीक अशा वेगळ्या पातळीवर आपण सर्वजण कमी-अधिक प्रमाणात ताणतणाव अनुभव करीत असतो... त्यासोबतच आपल्याला असलेले ताण-तणाव आपण आपल्या परीने त्याचे योग्य समायोजनही (adjustment) करण्याचा सुद्धा प्रयत्न करीत असतो... परंतु बऱ्याचदा आपले तान-तनाव जेव्हा आकस्मिक अक्राळविक्राळ स्वरूप धारण करतात तेव्हा आपण घाबरून जातो किंबहुना गोंधळून जातो... आणि  होय ही अतिशय सामान्य बाब आहे... अशा परिस्थितीमध्ये आपल्यासमोर मानसशास्त्रीय स्वरूपात दोनच पर्याय निर्माण होतात....पळ काढणे (flight) किंवा संघर्ष करणे (fight)... निर्माण झालेले तान- तनाव संपवण्यासाठी आपले शरीर पळ काढण्यासाठी वारंवार खूप सूचना करीत असतो... तश्या प्रकारचे विविध हार्मोन्स सुद्धा आपल्या शरीरात निर्माण होत असतात... मानसिक पातळीवर बोलायचे झाल्यास निर्णयप्रक्रिया कमजोर पडलेली असते....अशा वेळेस आपण निवडलेल्या पर्...

Meditation and mental health (लेट्स स्टार्ट मेडीटेशन)

लेट्स स्टार्ट मेडीटेशन........  जगातील जवळपास सर्वच धर्मातील एखाद्या गोष्टीवर जर एकमत व्हायचे तर.....ती गोष्ट म्हणजे मेडिटेशन (ध्यान) असेल... बहुतेक सर्वच धर्मामध्ये मेडिटेशन चे महत्त्व बऱ्यापैकी अधोरेखित केलेले आहे... धर्माच्या पलीकडे जाऊन सत्य शोधण्याचा प्रयत्न  करावयाचा असल्यास... अध्यात्मिक अभ्यासाची सुरवात देखील मेडीटेशन पासूनच  करावी लागेल... याचाच अर्थ सत्य शोधणारी  एक पायवाट म्हणून मेडिटेशनकडे येणे क्रमप्राप्त ठरेल..... मानवी मेंदूमध्ये अखंड विचारांची (thoughts), कृतीची (actions), भावनांची (emotions) व  पाच ज्ञानेंद्रियाच्या माध्यमातून मिळणाऱ्या माहितीची कोट्यावधी न्यूरॉन्स  सतत देवाण-घेवाण करीत असतात... तसेच सेंट्रल नर्वस सिस्टमच्या माध्यमातून शरीराच्या प्रत्येक अवयवांचे नियंत्रण करण्याचे कार्य सुद्धा  मेंदूला लीलया पार पाडावे लागते... अशा अखंड कार्यरत असणाऱ्या मेंदूला  मेडिटेशन (ध्यान) करायला भाग पाडने म्हणजे अग्निदिव्यच होय... आणि म्हणूनच मेडिटेशन ची थेअरी समजून घेणे सोपे... पण प्रत्यक्षात मेंदूकडून ते करून घेणे आव्ह...

Counselling and psychotherapy for anger management...

हॅव यू वॉश्ड यूवर डस्टबिन.....HAVE YOU WASHED YOUR BRAIN ....

हॅव  यू वॉश्ड यूवर डस्टबिन.. ... घरात वा इतरत्र कचरा होऊ नये म्हणून म्हणून आपण सर्वजण डस्टबिन वापरतो....अगदी कोपऱ्यात ठेवलेला... कोणालाही दिसू नये... किंवा आपल्या घराच्या दर्शनी भागात तो असू नये... ह्याची आपण सर्वजण काळजी करीत असतो.....कचऱ्याची अविरत व्यवस्था  राखणारा डस्टबिन खूप महत्त्वाचा असला तरी त्याची स्वच्छता करतांना आपण सर्वजण नाक मुरडत असतो....बाह्य जगातील असणाऱ्या डस्टबिनची ही अवस्था असेल तर आपल्या मनाची निगा राखणाऱ्या मेंदूची (मनाची)  काय अवस्था असेल?... खऱ्या अर्थाने आपले मेंदू (मन) एखाद्या डस्टबिन प्रमाणेच आपण रोज वापरीत असतो....    रोज अगणित विचार, प्रतिक्रीया, संवाद, अध्ययन, अनुभूती, इच्छा, आकांक्षा भावना , संभाषण व वैचारिक विचार मंथन अशा एक ना अनेक प्रकारच्या मानसिक हालचालींना आपल्या मेंदूला सतत सहन करावे लागतं... आणि फक्त सहन करून चालत नाही....तर हे सर्व साठवणीत ठेवावं लागतं... कारण कुठली माहिती महत्त्वाची आहे किंवा नाही याचा मेंदूला अभ्यास नसतो... त्यामुळे निर्माण झालेल्या  माहितीचे अविरत जतन करून ठेवण्याचे काम मेंदू करीत ...

डिअर सिग्मंड फ्रॉइड थँक यु सो मच.......Dear Sigmund Freud... thank you so much..........

डिअर सिग्मंड फ्रॉइड थँक यु सो मच........    मानवी मेंदू, भावना, वर्तन, विचारचक्र, लैगिकता अशा अनेक  गुढ प्रश्नांची उत्तरे सुद्धा त्याच प्रमाणात गुढ असतील हे स्पष्टपणे सिद्ध होते फ्रॉइडच्या एकूणच वेगवेगळ्या थिअरीरज  कडे बघून.... मनोवैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्यांना फ्रॉइडच्या संशोधनाला समजून घेतल्याशिवाय अद्यापही पुढे जाता आले नाही......  फ्रॉइडच्या अनेक संशोधना पैकी काही निवडक संशोधन प्रत्येकाने समजून घेणे  ही एक मानसिक आरोग्याची पायरीच ठरेल.... उदा. (१) बालपणीच्या घटना आपल्या मनावर व पर्यायाने वर्तणुकीवर दीर्घकालीन परिणाम करतात व आपल्या व्यक्तिमत्त्वाचा अविभाज्य भाग बनत असतात (२) स्टडीज इन हिस्टेरिया (१९८५) या प्रसिद्ध संशोधनातून फ्रॉइडने प्रथमच हे दर्शविण्याचा प्रयत्न केला की... प्रथम दर्शनी आपल्याला भेडसावणाऱ्या शारीरिक समस्या व तक्रारी या मुळातच आपण दाबून टाकलेल्या भावनांचा (repressed emotions) उद्रेक असतो. (३)अबोध मन/ मेंदू बाबत फ्रॉइडनचे संशोधन थक्क करून सोडणारे आहेत. आपल्या वर्तनाचा, विचारचक्राचा व विशेषता मानसिक आजाराची मूळ ब...

EMOTIONAL MANAGEMENT (इमोशनल मॅनेजमेंट)

इमोशनल मॅनेजमेंट...... माणसाच्या मानसशास्त्रीय प्रमुख लक्षणांमध्ये व्यक्तीची भावनाप्रधानता (emotional being)  हे सर्वात महत्त्वाचे लक्षण मानले गेले पाहिजे. माणसाच्या जगण्याचे व अस्तित्वाचे महत्त्वाचे घटक त्या व्यक्तीच्या भावनाकोशात दडून असतात. मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून एकूणच व्यक्तिमत्वाच्या विश्लेषणमध्ये त्या व्यक्तीच्या इमोशनल घटकांना दुर्लक्षित करून चालणार नाही. भीती (fear) राग (anger) दुःख (sadness) आनंद(happiness) कीळसपणा (disgust) आश्चर्य (surprise) व विश्वास (trust) अशा विविध भावनांच्या मिश्रणातून आपण सर्वजण आपले भावविश्वाचे जाळे विणत असतो. आपले  इमोशन्स आपले आयुष्य  मोठ्या प्रमाणात "ड्राईव्ह" करतात की काय?  हेही आपण अनुभवत असतो.  भावनाच्या या नैसर्गिक व वातावरण निर्मित प्रक्रियेत त्याचे योग्य व्यवस्थापनामुळे आपण अधिक आनंदी , निखळ  व निरोगी आयुष्य जगू शकतो असे संशोधनाअंती मान्य झाल्यामुळे जगभरात " इमोशनल मॅनेजमेंट",  "इमोशनल इंटेलिजन्स", "इमोशनल डायटिंग" असे अनेक मानसशास्त्रीय संकल्पनांनी जन्म घेतला व त्याचा जोमाने ...

Ghost of obsession......... (आँबसेशन नावाचे भूत......).

  आँबसेशन नावाचे भूत...... मेंदूमध्ये सतत विचार येणे अतिशय स्वाभाविक आहेत . परंतु आलेले विचार परत परत येणे व व्यक्ती ते थांबवण्यास असमर्थ ठरणे म्हणजेच आँबसेशन .... अजूनच सोपी भाषेत सांगायचे झाल्यास विक्रम राजाच्या खांद्यावर ठराविक कालावधीनंतर परत परत मानगुटीवर येऊन बसणारे बेताल नावाचे भूत ... अगदी तशाच पद्धतीने व्यक्तीला विचाराचे आँबसेशन छळत असतात ..... हे आँबसेशन तेव्हा अधिक गंभीर बनतात जेव्हा हे आँबसेशन व्यक्तीला काहीतरी कृती करायला बंधनकारक करतात .... आणि   आँबसेशन नंतर त्याला   प्रत्युत्तर म्हणून कृती (actions) असे हे दुष्टचक्र सुरू होते .... आँबसेशनला वेळीच न थांबवल्यास हेच   आँबसेशन त्या व्यक्तीच्या आयुष्यातील कार्यक्षमतेचा भाग पूर्णपणे व्यापून टाकतात .... आँबसेशन एक वेळ विचाराचा भाग झाला की त्यावर कृती करणे भाग पडते व कृती न केल्यास व्यक्तीला चैन पडत नाही (so thoughts becomes actions and actions becomes compulsions)..... आणि हे चक्र सतत वेळ , काळ व   प्रसंग यांचे कुठलेही बंधन न जुमानता सतत सुरू राहतात ...... व्यक्तीला हे स्पष्टपणे माहीत असतं की आप...

रागाचे मानसशास्त्र व व्यवस्थापन.....COUNSELLING AND PSYCHOTHERAPY IN ANGER MANAGEMENT...

  रागाचे मानसशास्त्र व व्यवस्थापन....... व्यक्तीला राग येणं ही नैसर्गिक बाब आहे . राग येत नाही असा एकही व्यक्ती भूतलावर सापडणार नाही . रागाचा दुसरा गुणधर्म म्हणजे   ही उस्फुर्त मानसिक प्रतिक्रिया असते . राग व्यक्त करताना मानसिक व शारीरिक स्तरावर विलक्षण प्रतिक्रिया व हालचाली दिसून येतात . प्रथमदर्शनी राग ही नैसर्गिक किंवा उस्फूर्तपणे घडणारी एक मानसिक प्रक्रिया असली तरी रागाचे मानसशास्त्र जाणून घेणे अतिशय रंजक ठरेल . जेव्हा व्यक्तीला आपण स्वतःहा   रिजेक्टेड  (rejected) , अनप्लेझंट  (unpleasant)   , यूसलेस  (useless) , अनसक्सेसफुल  (unsuccessful)  असल्याची खात्री करून घेतो किंवा व्यक्ती जर भयंकर मानसिक , शारीरिक , क्लेशदायक , भीतीदायक   व आशारहित परिस्थितीशी झगडत असेल , आणि अशा परिस्थितीशी दोन हात करत असताना त्यातून आपण जेव्हा बाहेर पडू शकत नाही याची खात्री होते   किंबहुना हे सर्व सहन करत असताना निर्माण झालेलं मानसिक दुखणं हेच मुळात   रागाचे   अंतर्गत मानसशास्त्रीय कारण ठरते . मानसशास्त्राच्या पुस्तकांमध्ये anger is s...