मानवी आयुष्यातील कष्ट कमी व्हावेत म्हणून मानवाने आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर मशीन्स व विविध यंत्रे तयार केलीत... निर्माण केलेल्या मशीन्स व यंत्रे इतक्या 'बुद्धिमान' होऊ लागल्यात की आता 'कृत्रिम' बुद्धिमत्तेमुळे मानवांना त्या सहज हाताळू शकतात व आवश्यकतेनुसार सूचना पण देऊ शकतात.. एक वेळ अशी येईल की सर्व माणसे अगदी 'तंतोतंत' मशीन व यंत्राप्रमाणे काम करायला लागतील... व आपणच निर्माण केलेले मशीन्स व यंत्रे आपल्यालाच मानवी संवेदना, प्रेम, काळजी, आपुलकी, स्नेह, जिव्हाळा, मैत्री, विश्वास, सुखदुःखाच्या अनुभूती या सर्वांचं 'महत्त्व' पटवून सांगतील... कित्येक दशानंतर माणसांनी यंत्रे तयार केलीत...की यंत्रांनी माणसं हा मात्र वादविवादाचा मोठा विषय ठरेल... हे जर खरंच थांबवण्याची माणसाला इच्छा असेल ..तर त्याने आपल्या आजूबाजूच्या माणसांना खरंच आपण 'यंत्रा' सारखं वापरतोय का?.. याचा विचार करायला हरकत नाही...😊😊 have a wonderful day to all of you.. ©️ डॉ. जितेंद्र गांधी मानसिक आरोग्य कौन्सिलर मनोसंतुलन उपक्रम
हॅव यू वॉश्ड यूवर डस्टबिन.....
घरात वा
इतरत्र कचरा होऊ नये म्हणून म्हणून आपण सर्वजण डस्टबिन वापरतो....अगदी
कोपऱ्यात ठेवलेला... कोणालाही दिसू नये... किंवा आपल्या घराच्या दर्शनी
भागात तो असू नये... ह्याची आपण सर्वजण काळजी करीत असतो.....कचऱ्याची अविरत
व्यवस्था राखणारा डस्टबिन खूप महत्त्वाचा असला तरी त्याची स्वच्छता
करतांना आपण सर्वजण नाक मुरडत असतो....बाह्य जगातील असणाऱ्या डस्टबिनची ही
अवस्था असेल तर आपल्या मनाची निगा राखणाऱ्या मेंदूची (मनाची) काय अवस्था
असेल?... खऱ्या अर्थाने आपले मेंदू (मन) एखाद्या डस्टबिन प्रमाणेच आपण रोज
वापरीत असतो....
रोज अगणित विचार, प्रतिक्रीया, संवाद, अध्ययन, अनुभूती,
इच्छा, आकांक्षा भावना , संभाषण व वैचारिक विचार मंथन अशा एक ना अनेक
प्रकारच्या मानसिक हालचालींना आपल्या मेंदूला सतत सहन करावे लागतं... आणि
फक्त सहन करून चालत नाही....तर हे सर्व साठवणीत ठेवावं लागतं... कारण कुठली
माहिती महत्त्वाची आहे किंवा नाही याचा मेंदूला अभ्यास नसतो... त्यामुळे
निर्माण झालेल्या माहितीचे अविरत जतन करून ठेवण्याचे काम मेंदू करीत
राहतो... ठराविक कालावधीत घरातील डस्टबिन स्वच्छ न केल्यास त्यातून ज्या
पद्धतीने दुर्गंधी येते त्याच पद्धतीने मनाची योग्य निगा न राखल्यास त्याचे
दूरगामी परिणाम व्यक्तीच्या मानसिकतेवर पडीत असतात...
मेंदूला योग्य
मानसिक प्रशिक्षण देऊन... माहिती साठवून घेण्याच्या प्रक्रियेमध्ये बरेचसे
सकारात्मक बदल करून घेतल्या जाऊ शकतात....बऱ्याच वर्षापूर्वी घडून
गेलेल्या कटू आठवणींच्या वा वैयक्तिक अनुभवाच्या घटना, कृती, संवाद किंवा
प्रतिक्रिया आपल्याला आजही मानसिक त्रास देत असतील तर....गरज आहे आपल्या
मनाच्या (मेंदूच्या) डस्टबिनला परत एकवेळ स्वच्छ करण्याची....आणि होय एकदा
स्वच्छ करून चालणार नाही... ठराविक कालावधीनंतर आपल्या (मनाला) मेंदूला
सतत स्वच्छ व निरोगी ठेवत राहणे मानसिक आरोग्याची सुरुवात ठरेल....
सो जस्ट
आस्क युवरसेल्फ.....हॅव आय वॉश्ड माय डस्टबिन....
©️ डॉ. जितेंद्र गांधी
मानसिक आरोग्य समुपदेशन व पुनर्वसन विषयतज्ञ
9420461580
Comments
Post a Comment