मानवी आयुष्यातील कष्ट कमी व्हावेत म्हणून मानवाने आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर मशीन्स व विविध यंत्रे तयार केलीत... निर्माण केलेल्या मशीन्स व यंत्रे इतक्या 'बुद्धिमान' होऊ लागल्यात की आता 'कृत्रिम' बुद्धिमत्तेमुळे मानवांना त्या सहज हाताळू शकतात व आवश्यकतेनुसार सूचना पण देऊ शकतात.. एक वेळ अशी येईल की सर्व माणसे अगदी 'तंतोतंत' मशीन व यंत्राप्रमाणे काम करायला लागतील... व आपणच निर्माण केलेले मशीन्स व यंत्रे आपल्यालाच मानवी संवेदना, प्रेम, काळजी, आपुलकी, स्नेह, जिव्हाळा, मैत्री, विश्वास, सुखदुःखाच्या अनुभूती या सर्वांचं 'महत्त्व' पटवून सांगतील... कित्येक दशानंतर माणसांनी यंत्रे तयार केलीत...की यंत्रांनी माणसं हा मात्र वादविवादाचा मोठा विषय ठरेल... हे जर खरंच थांबवण्याची माणसाला इच्छा असेल ..तर त्याने आपल्या आजूबाजूच्या माणसांना खरंच आपण 'यंत्रा' सारखं वापरतोय का?.. याचा विचार करायला हरकत नाही...😊😊 have a wonderful day to all of you.. ©️ डॉ. जितेंद्र गांधी मानसिक आरोग्य कौन्सिलर मनोसंतुलन उपक्रम
10 ऑक्टोबर ....जागतिक मानसिक आरोग्य दिन... आजच्या दिवशी जागतिक स्तरावर मानसिक आरोग्य संदर्भातील निदान, उपचार, पुनर्वसन व जनजागृतीसाठी मोठ्या प्रमाणात वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले जातील... यावर्षी प्रेवेंशन ऑफ सुसाईड ही थीम जागतिक मानसिक आरोग्य संघटने कडून नुकतीच जाहीर करण्यात आलेली आहे... भारताच्या संदर्भात बोलायचे झाल्यास डिप्रेशन आणि सुसाईड याबाबतीत भारताने जागतिक अग्रक्रम राखलेला आहे.... मानसिक अनारोग्याच्या उच्चतम धोक्याच्या पातळीवर असणाऱ्या आपल्या देशाला, समाजाला व पर्यायाने आरोग्य प्रशासनाला याबाबतचे गांभीर्य नसावे ही शोकांतिकेची बाब आहे.... साधारण प्रत्येक 40 सेकंदांमध्ये कोणीतरी सुईसाईड (आत्महत्या) केल्याचे समोर येत आहे....
मानसिक आजार हे जितके जैविक (biological) असतात....त्यापेक्षा कित्येक पटीने ते मानसिक (psychological), प्रासंगिक (situational), आजूबाजूच्या वातावरणातून (surroundings) , व्यक्तिमत्त्वाच्या जडणघडणीतुन (personality factors) व भावनिक (emotional) प्रश्नांमुळे सुद्धा निर्माण होत असतात... उपलब्ध असलेल्या मानसिक आरोग्य उपचार प्रामुख्याने औषधोपचार (रासायनिक गोळ्या औषधे) व इसिटी (शॉक ट्रीटमेंट) यावर भरभरून आधारित आहे... आजही मानसिक आरोग्य संदर्भात कम्प्रेहेंसिव मेंटल हेल्थ सर्विसेस कोणीही उपलब्ध करून देण्यास उत्सुक नाहीत... मनोरुग्णांना व संपूर्ण कुटुंबाला एकाच छताखाली औषधोपचार, कौन्सिलिंग, सायकोथेरपी, ग्रुप थेरपी, फॅमिली थेरपी, रेहाबिलिटेशन थेरपी, ऑक्युपेशनल थेरपी, स्ट्रेस मॅनेजमेंट अशा एक ना अनेक उपचार पद्धती मिळणे हा त्यांचा अधिकार आहे....परंतु वर्षानुवर्षे फक्त गोळ्या औषधे व ईसिटी मुळे साध्य होणारे परिणाम आपल्या समोर आहे.... आणि म्हणूनच गरज आहे मानसिक आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्यांनी व्यवसायिकता सांभाळून संवेदनशील बनण्याची ....
©️ डॉ. जितेंद्र गांधी
मानसिक आरोग्य समुपदेशन व पुनर्वसन विषयतज्ञ
9420461580
Comments
Post a Comment