Skip to main content

आजूबाजूच्या माणसांना खरंच आपण 'यंत्रा' सारखं वापरतोय का?..

 मानवी आयुष्यातील कष्ट कमी व्हावेत म्हणून मानवाने आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर मशीन्स व विविध यंत्रे तयार केलीत... निर्माण केलेल्या मशीन्स व यंत्रे इतक्या 'बुद्धिमान' होऊ लागल्यात की आता 'कृत्रिम' बुद्धिमत्तेमुळे मानवांना त्या सहज हाताळू शकतात व आवश्यकतेनुसार सूचना पण देऊ शकतात.. एक वेळ अशी येईल की सर्व माणसे अगदी 'तंतोतंत' मशीन व यंत्राप्रमाणे काम करायला लागतील... व आपणच निर्माण केलेले मशीन्स व यंत्रे आपल्यालाच मानवी संवेदना, प्रेम, काळजी, आपुलकी, स्नेह, जिव्हाळा, मैत्री, विश्वास, सुखदुःखाच्या अनुभूती या सर्वांचं 'महत्त्व' पटवून सांगतील... कित्येक दशानंतर माणसांनी यंत्रे तयार केलीत...की यंत्रांनी माणसं हा मात्र वादविवादाचा मोठा विषय ठरेल... हे जर खरंच थांबवण्याची माणसाला इच्छा असेल ..तर त्याने आपल्या आजूबाजूच्या माणसांना खरंच आपण 'यंत्रा' सारखं वापरतोय का?.. याचा विचार करायला हरकत नाही...😊😊 have a wonderful day  to all of you.. ©️ डॉ. जितेंद्र गांधी मानसिक आरोग्य कौन्सिलर मनोसंतुलन उपक्रम

आनंदाची फॅक्टरी.... (Real source of Happiness)


माहिती, तंत्रज्ञान व आधुनिकतेचे वारे जोरदार वाहत असताना पुन्हा नव्याने किंबहुना अधिक जागरूकतेने सर्वाधिक गांभीर्याने चर्चा होत असेल तर ती बाब म्हणजे "आनंद" (happiness) होय.... जागतिक स्तरावर भौतिक सुविधांची रेलचेल असताना व त्या मनसोक्त उपभोक्ताना परत आनंदासाठी जगभर चर्चा होणे हे विशेष कौतुकाचे आहे.... मानसशास्त्रीय दृष्ट्या आनंद आणि आजूबाजूला असलेली परिस्थिती (environment) हा महत्त्वाचा घटक असला तरी तो एक मात्र निर्धारक घटक नसतो....आनंद निर्मितीची प्रक्रियाच मुळात नैसर्गिक असून ती कृत्रिमरीत्या तयार करता येणार नसल्याचे शहाणपण आपल्या सर्वांना होत आहे..... 
 
जागतिक अर्थव्यवस्थेने आनंदाचे रूपांतरण अर्थकारणात केल्याचे स्पष्टपणे जाणवत असले तरी... मात्र त्याचे अंध अनुकरण आपण सर्वच करीत आलेलो आहोत.... आनंदाची निर्मिती बहिर्गत (external) नसून अंतर्गत (internal) असल्यामुळे ... ही अंतर्गत मानसशास्त्रीय प्रक्रिया आपण सर्वांनी शिकून आत्मसात करावी लागेल... आनंदाची निर्मिती ही उपजत व नैसर्गिक असल्यामुळे त्याला कुठल्याही उद्दीपकाची (stimulation) गरज नाही... 
 
निसर्गाने वेगवेगळ्या रसायनांच्या (brain chemicals ex..dopamine, oxytocin, serotonin, and endorphins) माध्यमातून आपल्या मेंदूमध्ये आनंद निर्माण करणाऱ्या रसायनांची निर्मिती अगोदरच करून ठेवलेली आहे... आणि त्यासाठी गरज आहे त्याला रोज खतपाणी घालण्याची....शेअरिंग, मनसोक्त गप्पा, ताणतणावाचे नियोजन, शारीरिक व मानसिक व्यायाम, उत्तम पुस्तकाचे वाचन, गायन, संगीत, नाट्य, कला, सिनेमा, विनोद, मित्रमंडळी, सहली, व्यवसाय व कार्यालयीन कामाचे नियोजन, सकस आहार, पुरेशी झोप व आपल्याबद्दलची स्व जाणीव.... एवढेच पुरेसे आहे आनंदाच्या निर्मितीसाठी... 
 
©️ डॉ. जितेंद्र गांधी
मानसिक आरोग्य  समुपदेशन  व पुनर्वसन विषयतज्ञ
9420461580

Comments