मानवी आयुष्यातील कष्ट कमी व्हावेत म्हणून मानवाने आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर मशीन्स व विविध यंत्रे तयार केलीत... निर्माण केलेल्या मशीन्स व यंत्रे इतक्या 'बुद्धिमान' होऊ लागल्यात की आता 'कृत्रिम' बुद्धिमत्तेमुळे मानवांना त्या सहज हाताळू शकतात व आवश्यकतेनुसार सूचना पण देऊ शकतात.. एक वेळ अशी येईल की सर्व माणसे अगदी 'तंतोतंत' मशीन व यंत्राप्रमाणे काम करायला लागतील... व आपणच निर्माण केलेले मशीन्स व यंत्रे आपल्यालाच मानवी संवेदना, प्रेम, काळजी, आपुलकी, स्नेह, जिव्हाळा, मैत्री, विश्वास, सुखदुःखाच्या अनुभूती या सर्वांचं 'महत्त्व' पटवून सांगतील... कित्येक दशानंतर माणसांनी यंत्रे तयार केलीत...की यंत्रांनी माणसं हा मात्र वादविवादाचा मोठा विषय ठरेल... हे जर खरंच थांबवण्याची माणसाला इच्छा असेल ..तर त्याने आपल्या आजूबाजूच्या माणसांना खरंच आपण 'यंत्रा' सारखं वापरतोय का?.. याचा विचार करायला हरकत नाही...😊😊 have a wonderful day to all of you.. ©️ डॉ. जितेंद्र गांधी मानसिक आरोग्य कौन्सिलर मनोसंतुलन उपक्रम
Fight or Flight...choice is
yours.....
ताण-तणावा ने वेढलेल्या मानवी आयुष्यात केव्हा, कुठे, कधी आणि
कुठल्या स्वरूपात ताण-तणाव निर्माण होईल हे सांगता येत नाही....आरोग्य,
व्यवसाय, नातेसंबंध, कौटुंबिक वा व्यवसायीक अशा वेगळ्या पातळीवर आपण सर्वजण
कमी-अधिक प्रमाणात ताणतणाव अनुभव करीत असतो... त्यासोबतच आपल्याला असलेले
ताण-तणाव आपण आपल्या परीने त्याचे योग्य समायोजनही (adjustment) करण्याचा
सुद्धा प्रयत्न करीत असतो... परंतु बऱ्याचदा आपले तान-तनाव जेव्हा आकस्मिक
अक्राळविक्राळ स्वरूप धारण करतात तेव्हा आपण घाबरून जातो किंबहुना गोंधळून
जातो... आणि होय ही अतिशय सामान्य बाब आहे... अशा परिस्थितीमध्ये
आपल्यासमोर मानसशास्त्रीय स्वरूपात दोनच पर्याय निर्माण होतात....पळ काढणे
(flight) किंवा संघर्ष करणे (fight)... निर्माण झालेले तान- तनाव
संपवण्यासाठी आपले शरीर पळ काढण्यासाठी वारंवार खूप सूचना करीत असतो...
तश्या प्रकारचे विविध हार्मोन्स सुद्धा आपल्या शरीरात निर्माण होत असतात...
मानसिक पातळीवर बोलायचे झाल्यास निर्णयप्रक्रिया कमजोर पडलेली असते....अशा
वेळेस आपण निवडलेल्या पर्यावरच पुढची दिशा ठरणार असेल तर योग्य निर्णय
घेणे क्रमप्राप्त ठरते....
सिंह मागे लागल्यास समोरासमोर झुंज वा संघर्ष
देणे हे शहाणपणाचे ठरणार नाही पण... पळ काढून प्रश्न सुटत नसतील तर झुंज
देण्यासाठी सुद्धा... आपलेच शरीर आपल्याला मदत करायला तयार राहतो..... व
त्यासाठी आवश्यक असणारे हार्मोन्स एकवटून आपल्याला झुंज देण्यासाठी मदत
करीत असतात... पळ आणि संघर्ष या दोन्ही पर्यायासाठी...शरीर आणि मानसिक
पातळीवर आवश्यक असणारे सर्व घटक आपल्या शरीरात व मानसिक प्रक्रियेत
सर्वांमध्येच उपलब्ध असतात.....
या दोन्हीं पर्यायांपैकी एकच पर्याय निवडणे
क्रमप्राप्त असल्यास आपला संघर्ष विरोधातून किंवा आक्रमकतेतुन निर्माण
होणारा नसेल व तो बचावात्मक व नैसर्गिक संघर्ष असल्यास अधिक उपयुक्त व
दीर्घकालीन स्वरूपाचा ठरेल....
अशा ताण-तणावाच्या परिस्थितीमध्ये
वैयक्तिकरीत्या मला संघर्ष (fight) करायला आवडेल...Let me know your choice
......
©️ डॉ. जितेंद्र गांधी
मानसिक आरोग्य समुपदेशन व पुनर्वसन विषयतज्ञ
9420461580
Comments
Post a Comment