मानवी आयुष्यातील कष्ट कमी व्हावेत म्हणून मानवाने आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर मशीन्स व विविध यंत्रे तयार केलीत... निर्माण केलेल्या मशीन्स व यंत्रे इतक्या 'बुद्धिमान' होऊ लागल्यात की आता 'कृत्रिम' बुद्धिमत्तेमुळे मानवांना त्या सहज हाताळू शकतात व आवश्यकतेनुसार सूचना पण देऊ शकतात.. एक वेळ अशी येईल की सर्व माणसे अगदी 'तंतोतंत' मशीन व यंत्राप्रमाणे काम करायला लागतील... व आपणच निर्माण केलेले मशीन्स व यंत्रे आपल्यालाच मानवी संवेदना, प्रेम, काळजी, आपुलकी, स्नेह, जिव्हाळा, मैत्री, विश्वास, सुखदुःखाच्या अनुभूती या सर्वांचं 'महत्त्व' पटवून सांगतील... कित्येक दशानंतर माणसांनी यंत्रे तयार केलीत...की यंत्रांनी माणसं हा मात्र वादविवादाचा मोठा विषय ठरेल... हे जर खरंच थांबवण्याची माणसाला इच्छा असेल ..तर त्याने आपल्या आजूबाजूच्या माणसांना खरंच आपण 'यंत्रा' सारखं वापरतोय का?.. याचा विचार करायला हरकत नाही...😊😊 have a wonderful day to all of you.. ©️ डॉ. जितेंद्र गांधी मानसिक आरोग्य कौन्सिलर मनोसंतुलन उपक्रम
डिअर सिग्मंड फ्रॉइड थँक यु सो
मच........
मानवी मेंदू, भावना, वर्तन, विचारचक्र, लैगिकता अशा अनेक गुढ
प्रश्नांची उत्तरे सुद्धा त्याच प्रमाणात गुढ असतील हे स्पष्टपणे सिद्ध
होते फ्रॉइडच्या एकूणच वेगवेगळ्या थिअरीरज कडे बघून.... मनोवैद्यकीय
क्षेत्रात काम करणाऱ्यांना फ्रॉइडच्या संशोधनाला समजून घेतल्याशिवाय
अद्यापही पुढे जाता आले नाही......
फ्रॉइडच्या अनेक संशोधना पैकी काही
निवडक संशोधन प्रत्येकाने समजून घेणे ही एक मानसिक आरोग्याची पायरीच
ठरेल.... उदा. (१) बालपणीच्या घटना आपल्या मनावर व पर्यायाने वर्तणुकीवर
दीर्घकालीन परिणाम करतात व आपल्या व्यक्तिमत्त्वाचा अविभाज्य भाग बनत असतात
(२) स्टडीज इन हिस्टेरिया (१९८५) या प्रसिद्ध संशोधनातून फ्रॉइडने प्रथमच
हे दर्शविण्याचा प्रयत्न केला की... प्रथम दर्शनी आपल्याला भेडसावणाऱ्या
शारीरिक समस्या व तक्रारी या मुळातच आपण दाबून टाकलेल्या भावनांचा
(repressed emotions) उद्रेक असतो. (३)अबोध मन/ मेंदू बाबत फ्रॉइडनचे
संशोधन थक्क करून सोडणारे आहेत. आपल्या वर्तनाचा, विचारचक्राचा व विशेषता
मानसिक आजाराची मूळ बिजे म्हणून अबोध मनाचा (unconscious mind) अभ्यास व
चिकित्सा करणे याला पर्यायी मानसोपराचा दर्जा प्राप्त करून दिला आहे .(४)
मानवी मेंदूची कार्यप्रणाली इड, इगो व सुपरइगो (ID, EGO, SUPEREGO) ह्या
आजही ही जगभर मानसशास्त्राच्या अभ्यासक्रमातील अविभाज्य भाग आहेत.(५)
माणसाची वाढ व विकास ही फक्त शारीरिक, मानसिक, बौद्धिक व सामाजिक नसून ती
मोठ्या प्रमाणात लैगिक (Oedipus complex) घटकांवर अवलंबून असते.(६) ड्रीम
एनालिसिस (dream analysis)वर केलेल्या संशोधनाचा पुढचा टप्पा आजही कोठल्याच
मानसशास्त्रातील संशोधकाने गाठलेला नाही.... यावरून फ्रॉईडच्या संशोधनाची
उंची लक्षात येते.
फ्रॉइडच्या संशोधनाला जगभरातून जेवढा प्रखर विरोध झाला
असेल तेवढा दुसऱ्या कुठल्याही संशोधनाच्या वाट्याला ते आले नसावे... आणि
म्हणूनच या विरोधा बरोबरच जगभर फ्राईड बाबत कुतुहूलही तेवढ्याच मोठ्या
प्रमाणात निर्माण झाले..... फ्राईड आज जगभरात अभ्यासला जातो तो केवळ
त्याच्या अद्भुत थिअरिज मुळे .....फ्राईडच्या थिअरिज मान्य करा किंवा
अमान्य पण फ्रॉईडला दुर्लक्षित करून आधुनिक मानसशास्त्र कधीच पूर्ण होणार
नाही.... फ्रॉईडला आजही आपण पूर्णपणे समजलो आहोत असे म्हणणे धाडसाचे
ठरेल.... पिढ्यानपिढ्या फ्राईडच्या थिअरिज आपण सर्वांना व पर्यायाने आधुनिक
मानसशास्त्राला दिशादर्शक ठरतील यात दुमत नाही....
फ्राईडच्या आठवणीत
W.H.Auden (१९७३) यांनी काही ओळी लिहिल्यात "If often he was wrong and,
at times absurd, to us he is no more a person now but a whole climate"
आणि म्हणूनच मानसिक आरोग्यातील एक अभ्यासक म्हणून .....फ्रॉईडला थँक्यू सो
मच म्हणने क्रमप्राप्त ठरते.....
©️ डॉ. जितेंद्र गांधी
मानसिक आरोग्य समुपदेशन व पुनर्वसन विषयतज्ञ
9420461580
Comments
Post a Comment