मानवी आयुष्यातील कष्ट कमी व्हावेत म्हणून मानवाने आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर मशीन्स व विविध यंत्रे तयार केलीत... निर्माण केलेल्या मशीन्स व यंत्रे इतक्या 'बुद्धिमान' होऊ लागल्यात की आता 'कृत्रिम' बुद्धिमत्तेमुळे मानवांना त्या सहज हाताळू शकतात व आवश्यकतेनुसार सूचना पण देऊ शकतात.. एक वेळ अशी येईल की सर्व माणसे अगदी 'तंतोतंत' मशीन व यंत्राप्रमाणे काम करायला लागतील... व आपणच निर्माण केलेले मशीन्स व यंत्रे आपल्यालाच मानवी संवेदना, प्रेम, काळजी, आपुलकी, स्नेह, जिव्हाळा, मैत्री, विश्वास, सुखदुःखाच्या अनुभूती या सर्वांचं 'महत्त्व' पटवून सांगतील... कित्येक दशानंतर माणसांनी यंत्रे तयार केलीत...की यंत्रांनी माणसं हा मात्र वादविवादाचा मोठा विषय ठरेल... हे जर खरंच थांबवण्याची माणसाला इच्छा असेल ..तर त्याने आपल्या आजूबाजूच्या माणसांना खरंच आपण 'यंत्रा' सारखं वापरतोय का?.. याचा विचार करायला हरकत नाही...😊😊 have a wonderful day to all of you.. ©️ डॉ. जितेंद्र गांधी मानसिक आरोग्य कौन्सिलर मनोसंतुलन उपक्रम
आँबसेशन नावाचे भूत......
मेंदूमध्ये सतत विचार येणे अतिशय स्वाभाविक आहेत. परंतु आलेले विचार परत परत येणे व व्यक्ती ते थांबवण्यास असमर्थ ठरणे म्हणजेच आँबसेशन....अजूनच सोपी भाषेत सांगायचे झाल्यास विक्रम राजाच्या खांद्यावर ठराविक कालावधीनंतर परत परत मानगुटीवर येऊन बसणारे बेताल नावाचे भूत ...अगदी तशाच पद्धतीने व्यक्तीला विचाराचे आँबसेशन छळत असतात..... हे आँबसेशन तेव्हा अधिक गंभीर बनतात जेव्हा हे आँबसेशन व्यक्तीला काहीतरी कृती करायला बंधनकारक करतात.... आणि आँबसेशन नंतर त्याला प्रत्युत्तर म्हणून कृती (actions) असे हे दुष्टचक्र सुरू होते.... आँबसेशनला वेळीच न थांबवल्यास हेच आँबसेशन त्या व्यक्तीच्या आयुष्यातील कार्यक्षमतेचा भाग पूर्णपणे व्यापून टाकतात.... आँबसेशन एक वेळ विचाराचा भाग झाला की त्यावर कृती करणे भाग पडते व कृती न केल्यास व्यक्तीला चैन पडत नाही (so thoughts becomes actions and actions becomes compulsions)..... आणि हे चक्र सतत वेळ, काळ व प्रसंग यांचे कुठलेही बंधन न जुमानता सतत सुरू राहतात...... व्यक्तीला हे स्पष्टपणे माहीत असतं की आपण वारंवार करीत असलेले विचार (thought) व कृती (actionns) ह्या निरर्थक आहेत व त्याचा त्याचा काहीही उपयोग नाही.... तरीसुद्धा व्यक्ती आपले आँबसेशन थांबवु शकत नाही....
बऱ्याचदा आपल्या दैनंदिन आयुष्यात घडणार्या बऱ्याच गोष्टी व त्या संदर्भात निर्माण झालेले विचारांचे वलय येथूनच खऱ्या अर्थाने आँबसेशनची सुरुवात होते....आँबसेशनचे दृष्टचक्र वेळीच थांबवण्यासाठी प्राथमिक स्वरूपात व्यक्तीचे विचारचक्र तोडण्याची (थॉट ब्रेकिंग) गरज असते....कॉग्निटिव्ह बिहेवियर थेरपी चा उपयोग केल्यास रुग्णाला मोठ्या प्रमाणात आँबसेशनला अटकाव करता येतो..... गरज आहे वेळीच आपल्या विचार चक्राला समजण्याची.... त्याला थांबवण्याचे सामर्थ्य निर्माण करण्याची...... व त्याला अटकाव निर्माण करण्यासाठी उपलब्ध असलेल्या समुपदेशनाची.…
©️ डॉ. जितेंद्र गांधी
मानसिक आरोग्य समुपदेशन व पुनर्वसन विषयतज्ञ
9420461580
Comments
Post a Comment