मानवी आयुष्यातील कष्ट कमी व्हावेत म्हणून मानवाने आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर मशीन्स व विविध यंत्रे तयार केलीत... निर्माण केलेल्या मशीन्स व यंत्रे इतक्या 'बुद्धिमान' होऊ लागल्यात की आता 'कृत्रिम' बुद्धिमत्तेमुळे मानवांना त्या सहज हाताळू शकतात व आवश्यकतेनुसार सूचना पण देऊ शकतात.. एक वेळ अशी येईल की सर्व माणसे अगदी 'तंतोतंत' मशीन व यंत्राप्रमाणे काम करायला लागतील... व आपणच निर्माण केलेले मशीन्स व यंत्रे आपल्यालाच मानवी संवेदना, प्रेम, काळजी, आपुलकी, स्नेह, जिव्हाळा, मैत्री, विश्वास, सुखदुःखाच्या अनुभूती या सर्वांचं 'महत्त्व' पटवून सांगतील... कित्येक दशानंतर माणसांनी यंत्रे तयार केलीत...की यंत्रांनी माणसं हा मात्र वादविवादाचा मोठा विषय ठरेल... हे जर खरंच थांबवण्याची माणसाला इच्छा असेल ..तर त्याने आपल्या आजूबाजूच्या माणसांना खरंच आपण 'यंत्रा' सारखं वापरतोय का?.. याचा विचार करायला हरकत नाही...😊😊 have a wonderful day to all of you.. ©️ डॉ. जितेंद्र गांधी मानसिक आरोग्य कौन्सिलर मनोसंतुलन उपक्रम
डॉ. अलका पवार वी विल आल्वेज
मिस यू.........बी.जे मेडिकल कॉलेज व महाराष्ट्र
मानसिक आरोग्य
संस्था पुणे येथे "कौन्सिलिंग आणि रीहीबिलेटेशन् इन मेंटल हेल्थ" प्रशिक्षण पूर्ण करण्या दरम्यान
डॉ. अलका पवार मॅडम यांची भेट झाली होती. मॅडम अतिशय शिस्तप्रिय व कडक स्वभावाचे
असल्यामुळे त्यांच्याशी जाऊन बोलणे किंवा संपर्क साधण्याची
प्रथमतः खूप भीती वाटायची.
पण नंतर जसा जसा कालावधी जात राहिला त्यांच्या स्वभावाबद्दल व त्यांच्या बद्दल माहिती होत गेली व एक आदरयुक्त
भीती निर्माण
होत गेली. माझ्या जडणघडणीमध्ये मॅडमचे
योगदान कधीच विसरू शकत नाही. मी जेव्हा कामाच्या
शोधात होतो आणि विशेष म्हणजे मला मानसिक आरोग्य
क्षेत्रातच काम करायचे होते तेव्हा सर्वात
अगोदर कुठलीही
पार्श्वभूमी नसताना
पहिली संधी दिली ती पवार मॅडमनी. महाराष्ट्र मानसिक
आरोग्य संस्था
येथील पुनर्वसन
विभाग व कौन्सलिंग विभागाची
जबाबदारी माझ्या
वर सोपवून
माझ्या पाठीशी
खंबीरपणे उभे राहिलेल्या पवार मॅडम मला आज खूप आठवत आहेत.. या दरम्यान
काम करताना
खूप सार्या
अडचणी येत असत परंतु पवार मॅडम पाठीशी असल्यामुळे
बऱ्याच अडचणी मधून आम्हाला
मॅडमच सोडवत असत. ज्या व्यक्तीला आपण एकेकाळी भीत होतो त्या व्यक्तीकडे आज आपण आपल्या
समस्या मोकळेपणाने
मांडू शकतो व समस्या
ती व्यक्ती
सोडवते.. त्यामुळे
मॅडमशी एक वेगळंच नातं तयार झालो होते. मॅडम च्या व्यक्तिमत्वामुळे त्यांच्या
सहकार्यामुळे आम्हाला
खूप काही शिकायला मिळालं.
बऱ्याच ठिकाणी
मला पुढे जाण्यासाठी व बोलण्यासाठी पवार मॅडम मला खूप आग्रह करत असत.आज पवार मॅडम आपल्या
मध्ये नाही आहेत ही कल्पनाच त्रासदायक
व मनाला वेदनादायक आहे. माणसं गेल्यानंतर
त्यांची योग्य व मोठी किंमत आपल्याला
मोजावी लागते हे ही तितकच खरं आहे.... मानसिक
आरोग्य क्षेत्रामध्ये पेशंटसाठी
त्यांच्या नातेवाईकांसाठी एकूणच समाजासाठी भरीव असं काम "कम्प्रेहेंसिवे मेंटल हेल्थ" चे मॉडेल उभं राहावं
यासाठी त्यांनी
आयुष्यभर काम केलं... येरवडा
येथील जागेत मानसिक आरोग्य
संस्थेच्या पुनर्वसनाच्या प्रकल्पाच्या उभारणीसाठी
दिवस-रात्र मेहनत करताना
मी मॅडमला
बघितलेले आहे... मानसिक आरोग्य
क्षेत्रामध्ये पुनर्वसन
केंद्र, डे केअर सेंटर उभारावे
व ते कार्यान्वित रहावे यासाठी मॅडमला
झटताना मी मॅडमला बघितले
आहे....काउन्सिलिंग आणि रेहाबिलिटेशन इन मेंटल हेल्थ सारखे कोर्सेस
जिवंत राहावे
व भरभराटीला
यावे यासाठी
मी मॅडमना
झटताना बघितले...
माझ्या सारख्या
अनेक विद्यार्थ्यांच्या, डॉक्टरांच्या मानसिक
रुग्णांच्या व त्यांच्या कुटुंबाच्या आयुष्यामध्ये पवार मॅडम चे योगदान विसरून
चालणार नाही. आज मॅडम नाहीये परंतु मॅडमच्या विचाराने
हीच प्रेरणा
मिळते की आपण मानसिक
आरोग्य क्षेत्रामध्ये स्वतःच्या
स्वार्थापलीकडे जाऊन पेशंटसाठी,
समाजासाठी व कुटुंबासाठी खूप काही करू शकतो व करण्याची गरज आहे... मॅडम तुम्ही दिलेली
प्रेरणा आम्हाला
निश्चितच समाजासाठी
काहीतरी काम करण्यासाठी प्रेरित
करत राहील. तुमचे योगदान
आम्ही कधीही विसरणार नाहीत. पवार मॅडम या आमच्यासोबत
कालपण होत्या...
आणि उद्या पण आमच्या
सोबत आमच्या
स्मृतीत व कर्तुत्ववात असणार आहेत... त्यांचं
नेहमी एक वाक्य वारवार
आठवतोय त्या म्हणायच्या.... की आपलं व कुटुंबाचा
पोट भरलं की... समाजासाठी
काही तरी करण्याची वेळ आली आहे असं समजायचं... मॅडम तुमच्या
स्मृतीस विनम्र
अभिवादन..
आपलाच एक विद्यार्थी
©️ डॉ. जितेंद्र गांधीमानसिक आरोग्य समुपदेशन व पुनर्वसन विषयतज्ञ9420461580
आपलाच एक विद्यार्थी
©️ डॉ. जितेंद्र गांधी
मानसिक आरोग्य समुपदेशन व पुनर्वसन विषयतज्ञ
9420461580
Comments
Post a Comment