मानवी आयुष्यातील कष्ट कमी व्हावेत म्हणून मानवाने आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर मशीन्स व विविध यंत्रे तयार केलीत... निर्माण केलेल्या मशीन्स व यंत्रे इतक्या 'बुद्धिमान' होऊ लागल्यात की आता 'कृत्रिम' बुद्धिमत्तेमुळे मानवांना त्या सहज हाताळू शकतात व आवश्यकतेनुसार सूचना पण देऊ शकतात.. एक वेळ अशी येईल की सर्व माणसे अगदी 'तंतोतंत' मशीन व यंत्राप्रमाणे काम करायला लागतील... व आपणच निर्माण केलेले मशीन्स व यंत्रे आपल्यालाच मानवी संवेदना, प्रेम, काळजी, आपुलकी, स्नेह, जिव्हाळा, मैत्री, विश्वास, सुखदुःखाच्या अनुभूती या सर्वांचं 'महत्त्व' पटवून सांगतील... कित्येक दशानंतर माणसांनी यंत्रे तयार केलीत...की यंत्रांनी माणसं हा मात्र वादविवादाचा मोठा विषय ठरेल... हे जर खरंच थांबवण्याची माणसाला इच्छा असेल ..तर त्याने आपल्या आजूबाजूच्या माणसांना खरंच आपण 'यंत्रा' सारखं वापरतोय का?.. याचा विचार करायला हरकत नाही...😊😊 have a wonderful day to all of you.. ©️ डॉ. जितेंद्र गांधी मानसिक आरोग्य कौन्सिलर मनोसंतुलन उपक्रम
मानसशास्त्रातील आयडेंटिटी
क्रायसिस (Identity Crisis) संकल्पना माझ्यासाठी नेहमीच कुतूहलाचा विषय
राहिलेला आहे..... एरिक एरिक्सन या मानसशास्त्रज्ञाने मिडलाइफ क्रायसिस
नावाच्या संकल्पनेला जगासमोर आणले आणि तेव्हापासूनच जगभरात या विषयावर सतत
चर्चा ,संशोधन व प्रशिक्षण सुरू आहे.... व्यक्तीला परिपक्वतेकडे जाताना
बऱ्याच प्रश्नांची उत्तरे शोधावी लागतात... आणि गंमत म्हणजे हा प्रवास
एकट्याला करावा लागतो... आपल्याला अवगत असलेले स्वतःबद्दलचे बहुतांशी ज्ञान
व आजूबाजूला उपलब्ध असलेली परिस्थिती यामध्ये नेहमीच तफावत असते....
सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास स्वप्न आणि आणि वास्तव यात जेवढा फरक असतो
तेवढाच........
आयडेंटिटी क्रायसिस अजूनच सोपी भाषेत समजून सांगायचे
झाल्यास आपली स्वतःची जडणघडण व आपल्या आजूबाजूची असलेली कौटुंबिक, सामाजिक,
शैक्षणिक, राजकीय, बौद्धिक, व्यवसायिक वा वैयक्तिक प्राप्त परिस्थितीमध्ये
असलेला द्वंद होय.... आयडेंटिटी क्रायसिस च्या दरम्यान व्यक्तीला खूप सारे
प्रश्न निर्माण होतात किंबहुना असे प्रश्न तो स्वतः निर्माण करीत असतो
....
आयुष्यात निर्माण होणाऱ्या क्रायसिस मुळे निर्माण झालेल्या प्रश्नांची
उत्तरांची उकल होईपर्यंत व्यक्तीला चैन पडत नाही...... याचाच अर्थ अन्न,
वस्त्र, निवारा व शिक्षण यासारख्या मूलभूत मानवी गरजांची पूर्तता
झाल्यानंतर सुद्धा मानवी प्रश्नांची शृंखला संपत नाही..... वयाच्या एका
ठराविक टप्प्यानंतर अनेक प्रश्नांचा ढीग तयार होत राहतो... मी कोण आहे ?
...माझ्या आजूबाजूचे वातावरण असे का आहे ?...माझ्या जीवनाचे नेमके उद्देश व
मूल्य कोणती?... आयुष्यामध्ये आलेली संकट ही तणावपूर्ण का आहेत?... माझ्या
नातेसंबंधांमध्ये समस्या का आहेत? माझे व्यवसायिक व वैयक्तिक नातेसंबंध
परिपक्व का नाहीत?.... आजूबाजूला कुणालाही काहीही प्रॉब्लेम नसताना मलाच
प्रॉब्लेम का आहेत?..... प्राप्त परिस्थिती, व्यवस्था व व्यक्तीवर माझा रोष
असण्याचे कारण काय?.... मी समाधानी आयुष्य जगत नाही का?...माझा स्वतःचा
दृष्टीकोण नेमका कोणता ? मला माझ्या आयुष्य इंटरेस्टिंग का वाटत नाहीये
?... माझ्या आयुष्याचा नेमका अर्थ काय आहे?.... इतरांच्या तुलनेत माझे
आयुष्य किंवा माझी प्रगती मागे तर पडत नाहीये ना?.... अशा एक ना अनेक
प्रकारचे क्रायसिस व्यक्तिपरत्वे वा परिस्थितीपरत्वे बदलत राहतात.... पण
ढोबळ मानाने सर्वसाधारणपणे स्वतःचा अंतर्गत व बहिर्गत शोध घेण्याची चुळबूळ
व्यक्तीला अस्वस्थ करत राहते ....आयुष्यामध्ये आयडेंटिटी क्रायसिस येणे हे
अतिशय नॉर्मल आहे....
आयुष्यात आलेले क्रायसिस नेहमीच नकारात्मक नसतात....
खऱ्या अर्थाने आपल्याला समृद्ध करण्याची क्षमता अशाच प्रकारच्या क्रायसिस
मध्ये दडलेली असण्याची शक्यता असते..... आणि म्हणूनच आयुष्यात आलेल्या
क्रायसिस मुळे आपल्या आयुष्याला एक वेगळी दिशा मिळत राहते ....बऱ्याच
मानसशास्त्रीय संशोधनानुसार आयुष्यात आलेले आयडेंटिटी क्रायसिस यांचे योग्य
नियोजन न झाल्यास मानसिक स्वास्थ्य बिघडू शकण्याचे निष्कर्ष समोर आले
आहेत.... आयडेंटिटी क्रायसिस तणावपूर्ण (stressful) असू शकतात पण भावी
काळासाठी व्यक्तीला परिपक्व करण्याचे अतिशय महत्त्वाचं काम आयडेंटिटी
क्रायसिस घडवून आणत असतात.... आपल्या आयुष्याच्या परीपक्वतेसाठी निर्माण
होणाऱ्या क्रायसिसचा वापर मानसशास्त्रीयदृष्ट्या योग्य पद्धतीने करून घेणे
हे अधिक शहाणपणाचे ठरेल.... आणि होय.... या दरम्यान निर्माण होणाऱ्या वादळी
वाऱ्याचा सामना करण्यासाठी समुपदेशक तुमच्या मदतीला असतीलच.....
तेव्हा
तुमच्या आयुष्यात निर्माण होणाऱ्या क्रायसिस साठी.व त्याच्या नियोजनासाठी
बेस्ट ऑफ लक.....
©️ डॉ. जितेंद्र गांधी
मानसिक आरोग्य समुपदेशन व पुनर्वसन विषयतज्ञ
9420461580
Comments
Post a Comment