मानवी आयुष्यातील कष्ट कमी व्हावेत म्हणून मानवाने आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर मशीन्स व विविध यंत्रे तयार केलीत... निर्माण केलेल्या मशीन्स व यंत्रे इतक्या 'बुद्धिमान' होऊ लागल्यात की आता 'कृत्रिम' बुद्धिमत्तेमुळे मानवांना त्या सहज हाताळू शकतात व आवश्यकतेनुसार सूचना पण देऊ शकतात.. एक वेळ अशी येईल की सर्व माणसे अगदी 'तंतोतंत' मशीन व यंत्राप्रमाणे काम करायला लागतील... व आपणच निर्माण केलेले मशीन्स व यंत्रे आपल्यालाच मानवी संवेदना, प्रेम, काळजी, आपुलकी, स्नेह, जिव्हाळा, मैत्री, विश्वास, सुखदुःखाच्या अनुभूती या सर्वांचं 'महत्त्व' पटवून सांगतील... कित्येक दशानंतर माणसांनी यंत्रे तयार केलीत...की यंत्रांनी माणसं हा मात्र वादविवादाचा मोठा विषय ठरेल... हे जर खरंच थांबवण्याची माणसाला इच्छा असेल ..तर त्याने आपल्या आजूबाजूच्या माणसांना खरंच आपण 'यंत्रा' सारखं वापरतोय का?.. याचा विचार करायला हरकत नाही...😊😊 have a wonderful day to all of you.. ©️ डॉ. जितेंद्र गांधी मानसिक आरोग्य कौन्सिलर मनोसंतुलन उपक्रम
इंडिया इज मोस्ट डीपरेस्ड (depressed) कंट्री इन द वर्ल्ड.... (India is most Depressed country in the world)
इंडिया इज मोस्ट डीपरेस्ड (depressed) कंट्री इन द वर्ल्ड.... जागतिक आरोग्य संस्थेच्या नुकताच प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार भारत हा जगातील सर्वाधिक डिप्रेशन ग्रस्त रुग्णांचा देश म्हणून समोर आलेला आहे.... जगाला थक्क करून सोडणाऱ्या ह्या सर्वेक्षणा कडे आपले सर्वांचेच दुर्लक्ष असल्याचे स्पष्टपणे दिसत असताना.... डिप्रेशनला वेळीच प्रतिबंध, उपचार व पुनर्वसन न केल्यास आपणही डिप्रेशनला आमंत्रण दिल्यासारखेच होईल.... आपल्या घरामध्ये जवळपास कोणीही डिप्रेशनने ग्रस्त असल्यास सार्वजनिक मानसिक आरोग्य केंद्रात डिप्रेशनची औषध उपचार पूर्णपणे मोफत उपलब्ध आहेत गरज आहे योग्य ती मार्गदर्शनाची.... वेळीच उपचार घेतल्यास रुग्ण सर्वसामान्य आयुष्य जगू शकतो आणि म्हणूनच त्यासाठीच हा लेख प्रपंच......
डिप्रेशनची मुख्य लक्षणे पुढील प्रमाणे आहेत
(१) दिर्घकालीन दुःखि असल्याची जाणीव होत राहणे
(२) अगोदर ज्या गोष्टींमध्ये आनंद वाटायचा आता त्या गोष्टीमध्ये मन न रमणे
(3) आत्मविश्वास झपाट्याने कमी होणे
(४) मनात नेहमी अपराधीपणाची भावना येत राहतणे
(५) मानसिकदृष्ट्या आतुन पूर्णपने पोखरले गेल्याची भावना येणे
(६) स्वतःहा निरुपयोगी असल्याची भावना पुन्हा पुन्हा निर्माण होणे
(७) आयुष्याला सामोरे जाण्याचे धाडस न होणे
(८) सदैव कंटाळवाणे वाटत राहणे
(९) अतिशय चिंतातुर राहणे
(१०) आपल्या स्वतःच्या भविष्याबद्दल असुरक्षित वाटणे
(११) आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या सर्व गोष्टी निरर्थक आहे असे वाटत राहने
(१२) आपले जीवन जगण्यासारखे राहिलेले नाही या पद्धतीचे भावनाविश्व निर्माण होणे
(१३) आपण स्वतःहा मरून जावे किंवा आत्महत्या करावी व आयुष्यातील सर्व विषय संपवावे अशी भावना निर्माण होणे
(१४)
चिडचिडेपणा वाढणे
(१५) वैफल्यग्रस्त होऊन हिंसक बनणे
(१6) लक्ष केंद्रित न करू शकने
(१७) विसराळूपणा वाढणे
(१८) झोपण्याची व जेवण्याची वेळ व पद्धतीत बदल होणे
(१९) काहीतरी भयंकर वाईट होईल असे स्वप्न पडने
(२०) चारचौघांमध्ये मिसळण्याची इच्छा न होणे
(२१) शैक्षणिक व्यावसायिक व वैयक्तिक कार्यक्षमता कमी होणे
(२२) लैंगिक कार्यक्षमता व इच्छा कमी होणे
(२३) वजन झपाट्याने वाढणे किंवा कमी होणे
(२४) शाळेमध्ये, ऑफिसमध्ये व इतर कार्यक्षमतेमध्ये सतत घट होणे
(२५) नेहमी थकल्यासारखे वाटणे
(२६) पाठदुखी, कंबरदुखी, डोकेदुखी अशा शारीरिक तक्रारी नेहमी अनुभवने (
२७) मनाला बरे वाटण्यासाठी व्यसनाचे माध्यम वापरणे व व्यसनाधीन होणे......
ह्यापैकी बहुतेक सिम्प्टम्स लक्षात आल्यास मानसोपचारचा सल्ला घेणे गरजेचे ठरते.... डिप्रेशनला वेळीच प्रतिबंध करण्यासाठी बरेच नैसर्गिक व मानसशास्त्रीय मार्ग सुद्धा उपलब्ध असून..... त्याबाबतची चर्चा पुढील भागात करणार आहोत...
©️ डॉ. जितेंद्र गांधी
मानसिक आरोग्य समुपदेशन व पुनर्वसन विषयतज्ञ
9420461580
Comments
Post a Comment