मानवी आयुष्यातील कष्ट कमी व्हावेत म्हणून मानवाने आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर मशीन्स व विविध यंत्रे तयार केलीत... निर्माण केलेल्या मशीन्स व यंत्रे इतक्या 'बुद्धिमान' होऊ लागल्यात की आता 'कृत्रिम' बुद्धिमत्तेमुळे मानवांना त्या सहज हाताळू शकतात व आवश्यकतेनुसार सूचना पण देऊ शकतात.. एक वेळ अशी येईल की सर्व माणसे अगदी 'तंतोतंत' मशीन व यंत्राप्रमाणे काम करायला लागतील... व आपणच निर्माण केलेले मशीन्स व यंत्रे आपल्यालाच मानवी संवेदना, प्रेम, काळजी, आपुलकी, स्नेह, जिव्हाळा, मैत्री, विश्वास, सुखदुःखाच्या अनुभूती या सर्वांचं 'महत्त्व' पटवून सांगतील... कित्येक दशानंतर माणसांनी यंत्रे तयार केलीत...की यंत्रांनी माणसं हा मात्र वादविवादाचा मोठा विषय ठरेल... हे जर खरंच थांबवण्याची माणसाला इच्छा असेल ..तर त्याने आपल्या आजूबाजूच्या माणसांना खरंच आपण 'यंत्रा' सारखं वापरतोय का?.. याचा विचार करायला हरकत नाही...😊😊 have a wonderful day to all of you.. ©️ डॉ. जितेंद्र गांधी मानसिक आरोग्य कौन्सिलर मनोसंतुलन उपक्रम
लेट्स स्टार्ट मेडीटेशन........
जगातील
जवळपास सर्वच धर्मातील एखाद्या गोष्टीवर जर एकमत व्हायचे तर.....ती गोष्ट
म्हणजे मेडिटेशन (ध्यान) असेल... बहुतेक सर्वच धर्मामध्ये मेडिटेशन चे
महत्त्व बऱ्यापैकी अधोरेखित केलेले आहे... धर्माच्या पलीकडे जाऊन सत्य
शोधण्याचा प्रयत्न करावयाचा असल्यास... अध्यात्मिक अभ्यासाची सुरवात देखील
मेडीटेशन पासूनच करावी लागेल... याचाच अर्थ सत्य शोधणारी एक पायवाट
म्हणून मेडिटेशनकडे येणे क्रमप्राप्त ठरेल..... मानवी मेंदूमध्ये अखंड
विचारांची (thoughts), कृतीची (actions), भावनांची (emotions) व पाच
ज्ञानेंद्रियाच्या माध्यमातून मिळणाऱ्या माहितीची कोट्यावधी न्यूरॉन्स सतत
देवाण-घेवाण करीत असतात... तसेच सेंट्रल नर्वस सिस्टमच्या माध्यमातून
शरीराच्या प्रत्येक अवयवांचे नियंत्रण करण्याचे कार्य सुद्धा मेंदूला
लीलया पार पाडावे लागते... अशा अखंड कार्यरत असणाऱ्या मेंदूला मेडिटेशन
(ध्यान) करायला भाग पाडने म्हणजे अग्निदिव्यच होय... आणि म्हणूनच मेडिटेशन
ची थेअरी समजून घेणे सोपे... पण प्रत्यक्षात मेंदूकडून ते करून घेणे
आव्हानात्मक ठरणार आहे...
मानवी मेंदूमध्ये अखंड निर्माण होणारे विचार,
कृती व भावनां आपल्याबरोबर प्रचंड मानसिक आवेग (mental force) तयार करीत
असतात... अशा नैसर्गिक निर्माण झालेल्या मानसिक आवेगाना समोरासमोर
प्रतिकार व प्रतिबंधित (repressed) केल्यास मानसिक द्वंद (psychological
conflict) निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.... अगदी भौतिक
शास्त्रा मध्ये न्यूटन ने सांगितलेल्या सिद्धांताप्रमाणे ( for every
action... there is an equal and opposite reaction) आणि म्हणूनच मानवी
मेंदूमध्ये निर्माण झालेले प्रत्येक भावना, कृती व विचारांच्या लहरी सरळ
सरळ प्रतिबंधित करणे मानसिक व शारीरिक आजाराचे कारण ठरेल..... मेडिटेशन
च्या बऱ्याच कौशल्यापैकी सर्वात महत्त्वाचे कौशल्य म्हणजे सर्वसमावेशकता
(inclusive) होय..उदाहरणार्थ हजारो नद्या ज्या पद्धतीने समुद्र आपल्या
अंतरंगात सामावून घेतो व कुठल्याही नदीस प्रतिबंधित करीत नाही. ...त्याच
पद्धतीने मेंदूमध्ये निर्माण होणाऱ्या प्रत्येक विचार, भावना व कृती बद्दल
आपणास सर्वसमावेशक बनावे लागेल..... येणाऱ्या प्रत्येक विचार, भावना व कृती
यांना आवड निवडीच्या (choices) कसोटीवर किंवा विश्लेषणात्मक (analytical)
पद्धतीने न बघता नैसर्गिक पद्धतीने समावून घेण्याचे कौशल्य विकसित करावे
लागेल....
प्रथमदर्शनी मेडिटेशन कठीण व निरर्थक वाटू शकेल... परंतु दूरगामी
मानसिक आरोग्य जपण्यासाठी याचा मोठा वापर आपल्याला करून घेता येईल....
हळूहळू ...क्रमशः ..संथ गतीने का होईना उपलब्ध असणाऱ्या बऱ्याच
मेडिटेशनच्या कौशल्यांना आपल्याला हस्तगत करावे लागेल ...
आणि म्हणूनच उशीर
न करता...लेट्स स्टार्ट इट...
©️ डॉ. जितेंद्र गांधी
मानसिक आरोग्य समुपदेशन व पुनर्वसन विषयतज्ञ
9420461580
Comments
Post a Comment